गुगल प्लेवरील खरेदी अधिक सुलभ
आत्तापर्यंत गुगल प्लेवरील आवडलेले अॅप्स, बुक्स इत्यादी खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा गुगल गिफ्ट व्हाऊचर असे मर्यादित पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड अथवा गुगल गिफ्ट व्हाऊचर नाहीत अशा मोबाईल धारकांना एखादे आवडलेले पुस्तक किंवा अॅप्लीकेशन विकत घेण्याची इच्छा असली तरी ते खरेदी करु शकत नव्हते.
पण आता गुगल प्लेवरील अॅप्स, बुक्स खरेदी करण्याच्या पर्यायात आणखी एक भर पडली आहे. आयडिया सेल्युलर कंपनीने गुगलशी यासंदर्भात करार केला आहे. त्यामुळे जे मोबाईल धारक आयडियाचे ग्राहक आहेत, त्यांना गुगल प्लेवरील खरेदीसाठी आयडिया कॅरियर या पर्यायाचा वापर करुन खरेदी करता येणार आहे.
त्यासाठी गुगल प्लेचे लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन मोबाईलवर असणे आवश्यक आहे. अकाऊंट मधून पेमेंट ऑप्शन येथून हा आयडिया कॅरियरचा पर्याय निवडता येईल. त्यानंतर एक मेसेज पाठविण्याची विचारणा केली जाईल. (हा मेसेज क्रमांक टोल फ्री आहे) त्याला होकार द्यावा. मोबाईलचे व्हेरिफिकेशन होताच, आपणांस हा पर्याय येथून पुढे गुगल प्लेवरील खरेदीसाठी उपलब्ध होईल. हा पर्याय प्रीपेड व पोस्टपेड या दोन्ही प्रकारच्या ग्राहकांकरिता उपलब्ध आहे.
या नविन सुविधेमुळे आवडीचे अॅप्लिकेशन इच्छा असूनही खरेदी करता येत नाही, ही मोबाईलधारकांची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.
0 Comments:
Post a Comment