विविध क्लाऊड स्टोअरेज अकाऊंटस् एकत्रित वापरा
तुमचे गुगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स, वनड्राईव्ह यासारख्या एकापेक्षा अनेक क्लाऊड स्टोअरेज सर्व्हिसेसमध्ये अकाउंटस् आहेत. आणि ही सगळी अकाऊंटस् स्वतंत्रपणे मॅनेज करताना तुम्हाला बरीच कसरत करावी लागते, त्यामुळे तुमची दमछाक होते.
कधी कधी तुम्हाला एका क्लाऊड स्टोअरेज मधून दुसऱ्या क्लाऊड स्टोअरेजमध्ये काही फाईल ट्रान्स्फर करण्याची गरज भासते. तेव्हा तुम्हाला त्या त्या अकाऊंटमध्ये स्वतंत्रपणे लॉगीन व्हावे लागते आणि त्यानंतर त्या फाईल्स पीसीवर डाऊनलोड करुन पुन्हा दुसऱ्या क्लाऊड स्टोअरेजमध्ये अपलोड कराव्या लागतात.
या कटकटीमुळे तुम्ही वैतागला आहात. आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी एकदाच लॉगीन होऊन एकाच ठिकाणाहून करता आल्या असत्या तर बरे झाले असते, असा विचार तुमच्या मनात येत असणे साहजिकच आहे.
तुमच्या कल्पनेमधला विचार आता प्रत्यक्षात आला आहे. वेगवेगळ्या क्लाऊड स्टोअरेजमधील फाईल्स आता एकाच ठिकाणाहून मॅनेज करणे शक्य झाले आहे. त्यासाठी मल्टक्लाऊड हा वेबबेस्ड फाईल मॅनेज सर्व्हिस चा पर्याय उपलब्ध झाला आहे. शिवाय तो सुरक्षित,विश्वसनीय व मोफत आहे असा दावा या सर्व्हिस प्रोव्हाडरकडून करण्यात आला आहे.
- मल्टक्लाऊड काय आहे?
मल्टक्लाऊड ही एक तुमचे विविध क्लाऊड स्टोअरेजवरील सर्व अकाऊंटस एकाच ठिकाणावरुन मॅनेज करणारी वेबबेस्ड सर्व्हिस आहे. सोप्या भाषेत ऑनलाईन क्लाऊड स्टोअरेज मॅनेजर आहे.
- मल्टक्लाऊड सर्व्हिस सध्या खालील विविध क्लाऊड स्टोअरेजसाठी सपोर्ट करते
Amazon S3, Google Drive, Box, Dropbox, SugarSync, OneDrive, Copy, BaiDu, FTP/SFTP, WebDav, Cubby, CloudMe, WEB.DE, MyDrive, Yandex, HiDrive, Bitcasa
- विविध क्लाऊड स्टोअरेज मध्ये फाईल ट्रान्सफर
एखादी फाईल पीसीवर डाऊनलोड करुन न घेता, सरळ एका क्लाऊड स्टोअरेजमधून दुसऱ्या क्लाऊड स्टोअरेजमध्ये वळविणे किंवा स्थानांतरीत करणे शक्य झाले आहे. उदा. तुम्ही गुगल ड्राईव्हवरील एखादी फाईल कॉपी करुन सरळ वनड्राईव्ह वर पेस्ट करु शकता.
- पॉवर ऑफ असतानाही फाईल ट्रान्सफर शक्य
मल्टक्लाऊड background of transmission technology यासारखे टेक्नॉलॉजी वापरते, त्यामुळे पीसी चालू ठेवण्याची गरज नाही. ट्रान्सफर करण्याची फाईल तुम्ही फक्त कॉपी पेस्ट करा, मल्टक्लाऊड सर्व्हर पुढील प्रक्रिया करेल तुमचा पीसी बंद असला तरी देखील.
- शेड्युल ट्रान्सफर
तुम्हाला काही फाईल्सचा बॅकअप वेळोवेळी आणि नियमीतपणे घेणयाची गरज पडत असेल, तर मल्टक्लाऊड मध्ये शेड्युल ट्रान्सफरचीही सोय आहे. त्यायोगे तुम्ही दैनिक, साप्ताहीक, मासिक किंवा तुमच्या गरजेनुसार हव्या त्या वेळेस आणि नियमीतपणे डाटा ट्रान्सफर करु शकता. आणि ती प्रक्रिया पार पडल्यानंतर तुम्हाला ईमेलने सूचना दिली जाते.
- क्लाऊड फाईल मॅनेजर
विविध क्लाऊड ड्राईव्हवरील फाईल्स एकत्रितपणे मॅनेज करण्यासाठी क्लाऊड फाईल मॅनेजर उपयुक्त आहे. अपलोड, डाऊनलोड, कट, कॉपी, पेस्ट, मूव्ह, डिलीट, रिनेम, न्यू फोल्डर इत्यादी क्रिया विंडोज एक्सप्लोरर प्रमाणे या फाईल मॅनेजरच्या माध्यामतून पार पाडता येतात.
- अधिक मोफत जागा
प्रत्येक क्लाऊड स्टोअरेज सर्व्हिस प्रत्येक अकाऊंटसाठी ठराविक प्रमाणात थोडीशीच मोफत जागा देते. मात्र त्या एकत्रितपणे वापरल्यास भरपूर मोठी जागा मोफत उपलब्ध होऊ शकते. उदा. तुमचे ड्रॉपबॉक्सवर पाच अकाऊंटस असतील तर प्रत्येकी दोन जीबी प्रमाणे दहा जीबी मोफत जागा वापरण्याचा लाभ मल्टक्लाऊडच्या माध्यमातून तुम्हाला घेता येईल.
तेव्हा या मोफत ऑनलाईन क्लाऊड स्टोअरेज मॅनेजर सेवेचा उपयोग करुन पहायला हरकत नाही. मल्टक्लाऊड वेबसाईटच्या होमपेजवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
0 Comments:
Post a Comment