November 2014 | आगळं! वेगळं !!!

व्हॉटसअॅप ग्रुपमधे पोस्ट केलेला मेसेज कोणी कोणी वाचला?



व्हॉटसअॅप वापरणारे जवळपास सर्वजण आपापल्या आवडीनुसार कोणत्या ना कोणत्या ग्रुपचे सदस्य असतात. आणि ते ग्रुपमधे आपलेही मेसेज पोस्ट करत असतात, पण त्यांनी पोस्ट केलेले मेसेज ग्रुपमधे कोणी वाचले की नाही हे मात्र समजत नाही.

पण आता व्हॉटसअॅप ग्रुपमधे तुम्ही जेव्हा काही मेसेज पाठवाल तेव्हा तो कोणी कोणी वाचला याची माहिती तुम्हाला मिळू शकेल. 

त्यासाठी तुम्ही ग्रुपमधे पाठविलेल्या मेसेजवर टच करुन तो मेसेज थोडासा दाबून ठेवा, त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरील पट्टीमधे i चे चिन्ह दिसेल त्यावर टच करताच तुमचा मेसेज कोणाकोणाला डिलीव्हर झाला आहे (Deliverd to), आणि तो कोणी कोणी वाचला आहे (Seen by) त्याचा तपशील दिसेल. 

त्याचबरोबर त्यामधील (Seen by) मधील कॉन्टॅक्टवर टच करुन Delivered व  Read चा टाईमसुध्दा तुम्ही पाहू शकाल.

सर्व ईमेल खात्यासाठी एकच अॅप


सध्याच्या काळात बहुतांश लोकांची जीमेल, याहू, आऊटलूक इत्यादी विविध सर्व्हिस प्रोव्हायडर्सची ईमेल अकाऊंटस् असतात. त्यांचा अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनवर वापर करताना आत्तापर्यंत स्मार्टफोनधारकांना गुगलच्या ईमेल अकाऊंटसाठी Gmail आणि याहू, आऊटलूक यासारख्या इतर ईमेल्सच्या अकाऊंटसाठी Email अशा दोन स्वतंत्र अॅप्लीकेशन्सचा वापर करावा लागत होता.

पण अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनधारकांची ही अडचण दूर करण्यासाठी गुगलने आता त्यांच्या Gmail या अॅप्लीकेशनमध्ये काही नविन सुविधा समाविष्ट केल्या आहेत. नविन सुविधा याप्रमाणे 




What's New
● All the features you love with a fresh new look and feel.
● One app for all your email. Check and send email from Yahoo Mail, Outlook.com and all other email accounts right from the Gmail app.
● Improved tablet layout that includes faster switching between inbox categories and accounts.
● Additional improvements if you're using Android Lollipop, like hiding sensitive lockscreen notifications.


या नविन सुविधे अंतर्गत सेटींग्ज मेनूमध्ये अॅड अकाऊंट या पर्यायावर क्लिक करताच  गुगल व पर्सनल (IMPA/POP) असे पर्याय समोर येतील. तुमचे गुगलवर एकापेक्षा अधिक अकाऊंटस् असतील तर पहिला गुगल हा पर्याय निवडून जीमेलचे आणखीन अकाऊंटस् अॅड करता येतील.



त्याव्यतिरिक्त तुमचे याहू, आऊटलूक, एओएल मेल अशी जी पर्सनल अकाऊंटस यात अॅड करायची असतील त्यासाठी दुसरा म्हणजे पर्सनल पर्याय निवडून तुम्हाला इतर ईमेल्सची अकाऊंट या जीमेल अॅप्लीकेशनमध्ये समाविष्ट करता येतील. 

गुगलने दिलेल्या या नविन सुविधेमुळे स्मार्टफोनधारकांना त्यांची गुगल, याहू, आउटलूक इत्यादी एकाहून अनेक ईमेल खाती Gmail या एकाच अॅप्लीकेशमधून वापरता येणे आता शक्य झाले आहे.

लाल दिव्यांची स्वप्ने



होय नाहीच्या गोंधळात
उरकला आहे एक टप्पा
चर्चेपुरत्याच उरल्या आहेत
आता नैतिकतेच्या गप्पा

इकडे सगळ्या चॅनेल्सवर
चर्चेवर चर्चा घडत आहेत
तिकडे मात्र प्रत्येकाला लाल
दिव्यांची स्वप्ने पडत आहेत

मराठी सचिनचे इंग्रजी आत्मकथन



सचिनच्या प्लेईंग इट माय वे या आत्मकथनाच्या इंग्रजी पुस्तकाचे काही भारतीय भाषांसोबत मराठीतही भाषांतर प्रकाशित करण्याचा निर्णय प्रकाशकांनी घेतला आहे.

एका दृष्टीने मराठी भाषिकांवर हा एक प्रकारे उपकारच झाला म्हणायचा. मराठी मातीत जन्मलेल्या, माय मराठी भाषा बोलत मोठा झालेल्या सचिनला आपले आत्मकथन लिहायला इंग्रजीचा आधार घेण्याची गरज का पडावी? विचार, आचार, बोलणे मराठीत पण आत्मकथन इंग्रजीत! इंग्रजी भाषेविषयी केवढं प्रेम!

ज्या महाराष्ट्रात तो वाढला, ज्या महाराष्ट्रात मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी आंदोलने होतात, दुकानाच्या पाट्या इंग्रजीत लिहल्या तर त्यावर दगडफेक होते, त्या महाराष्ट्रात रहाणाऱ्या सचिनला आत्मकथन लिहताना मराठी भाषेचा विसर पडावा ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

मराठी माणसांनी मोठे केलेला, मराठी क्रिकेटपटू म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी डोक्यावर घेतलेला तो सेलिब्रेटी. त्याच्या या मराठी भाषेच्या दुराव्याविषयी त्याच्याविरोधात कोण बोलणार? कोण आंदोलन करणार? आणि ते होणारही नाही, कारण आंदोलनात, निदर्शनात केवळ सर्वसामान्यांना टार्गेट केले जाते, सचिनसारख्या सेलिब्रेटींना नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

मराठी माणसाला अभिमान वाटेल अश्या सचिनसारख्या सेलिब्रेटीकडून मराठी भाषेची केली गेलेली ही उपेक्षा, मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांना निश्चितच अपेक्षित नसणारी अशी आहे.

त्याचे आत्मकथन सर्वप्रथम मराठी भाषेत प्रसिध्द होऊन, नंतर त्याचे इतर भारतीय व परकीय भाषेत अनुवाद प्रसिध्द झाले असते तर मराठी माणसांना त्याचा अधिक अभिमान वाटला असता.

सचिनवर प्रेम करणारा क्रिकेटप्रेमी रसिक समाजाच्या विविध स्तरात आहे. सचिनच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक त्यांना असणे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे सचिनने आत्मकथन लिहलयं म्हणल्यावर ते वाचण्याची इच्छा त्याच्या मराठी भाषिक चाहत्यांनाही झाली असणार, पण इंग्रजी भाषेच्या अडचणीमुळे त्यांचा हिरमोडही नक्कीच झाला असणार.

पण त्यांचा विचार सचिनने पुस्तक लिहताना केलेलाच नाही, चाहत्यांचाही नाही अन् मायमराठीचाही नाही. कोणता वाचकवर्ग डोळ्यासमोर ठेवून त्याने पुस्तक लिहले हे त्यालाच ठाऊक. शेवटी प्रकाशकांनाच मराठी माणसांची दया आली असावी (त्यांचा धंदा होणार हा भाग वेगळा), आता त्यांनी ही अडचण दूर करण्याचे ठरविले आहे.

आणि त्यामुळेच आता मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या मराठी भाषिक सचिनने इंग्रजीतून लिहलेले आत्मकथन आता अनुवादित करुन पुन्हा मराठीत आणले जाणार आहेत. सचिनसारख्या मराठी माणसाने इंग्रजीतून हे पुस्तक लिहल्यामुळे करावा लागत असलेला हा महाद्रविडी प्राणायम! मराठी सेलिब्रेटींचे मराठी भाषेविषयीचे प्रेम किती हे यातून स्पष्ट व्हायला हरकत नाही.


एमआयएम पक्षावर बंदी घालावी का?


ओवेसीच्या एमआयएम पक्षावर बंदी घालावी का? ही मागणी सध्या मिडीयातून चर्चेत आहे. चिथावणीखोर, प्रक्षोभक व जातीयवाद भडकवणारी भाषणे ही या पक्ष्याची ओळख आहे. असे असूनही, या पक्षावर कडक कारवाई करण्याविषयीचे ठोस धोरण आजवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने न स्विकारल्यामुळे, त्यांनीच अप्रत्यक्षपणे या पक्षाला खतपाणी घातल्याचे स्पष्ट होते. एमआयएमच्या भाषणामुळे मुस्लीम मते हिंदुत्ववादी पक्षांना मिळण्याऐवजी आपल्याला मिळतील असा हेतू त्यामागे असावा. पण तो हेतू सफल न होता, मुस्लीम मतदार काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून दूरावला गेला, आणि त्यांची पारंपारिक मतेही थेट एमआयएम पक्षाकडे गेली.

त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला आता तो पक्ष जातियवादी आहे याचा साक्षात्कार झाला, आणि त्यातून ही मागणी पुढे आली असावी. राज ठाकरे, प्रवीण तोगडीया यांच्यासारख्या नेत्यांना प्रवेशबंदी, भाषणबंदी किंवा काय भाषण करावे व करु नये याविषयी बंधने घातली जातात हे आपण आजपर्यंत पहात आहोत, मात्र ओवेसींना यासारखे कायदे नियम लागू केले जात नाहीत. मुस्लीमांचे लांगूलचालन म्हणजे धर्मनिरपेक्षता अशी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मते धर्मनिरपेक्षतेची व्याख्या असावी.

याचसोबत हिंदूत्ववादी संघटनाही डावपेचात कमी पडत आहेत असे दिसते. याचे कारण असे की, राज ठाकरे, प्रविण तोगडीया इत्यादी नेत्यांवर देशाच्या विविध प्रांतात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये, कोर्टामध्ये तक्रारी, गुन्हे, दावे दाखल केले जातात त्यामागे पध्दतशीरपणे डावपेच आखले गेलेले असतात. देशाच्या विविध भागात कोर्टकचेऱ्यांच्या चकरा मारुन या नेत्यांना कसे जेरीस आणता येईल हा हेतू त्यामागे असतो. असे डावपेच आखण्याच्या कौशल्यचा अभाव हिंदूत्ववादी संघटनामध्ये दिसून येतो.