March 2014 | आगळं! वेगळं !!!

हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा



हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
आज जयनाम संवत्सर शके 1936 चैत्र शुध्द प्रतिपदा सोमवार दि.31 मार्च 2014 हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या  सर्वांना शुभेच्छा!
गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त. आजच्या या शुभमुहूर्तावर मी माझा नविन उपक्रम मनाली ई पब्लिकेशन्सची सुरुवात केली आहे. आणि या प्रकाशनाद्वारे माझे पहिले ई-पुस्तक पॉलिटिकाया वात्रटिका संग्रहाचे प्रकाशन केले आहे.

मी यापूर्वी जाहिर केल्याप्रमाणे हे पुस्तक माझ्या ब्लॉगच्या सदस्यांना सप्रेम भेट म्हणून पाठविले आहे. तसेच आजपासून नविन होणाऱ्या सभासदांना नोंदणी करताच ते लगेचच भेट मिळणार आहे.

झेंडा



झेंडा
भ्रष्टाचाराच्या विरोधात लाल झेंडा
जाहिर सभेत फडकवायचा असतो
नांदेड एक्सप्रेसला हिरवा दाखविताना
मात्र तो गुंडाळून ठेवायचा असतो

शाईनिंग



शाईनिंग
वर्तमानपत्राच्या कागदावर
राजकीय नेत्यांच्या तोंडावर
सर्वसामान्य मतदारांच्या बोटावर
सगळीकडे शाईचीच इनिंग सुरु आहे
जरी असेल रंग काळा तरी
शेवटी तिच शाईनिंग करत आहे

नकली मिठाई से सावधान



नकली मिठाई से सावधान
आम्ही सकाळीच दिल्ली स्थित मुख्यालयात पोहोचलो. कार्यकर्ते नेतेमंडळींचे अवागमन आणि लगबग सुरु होती. एवढ्यात मुख्यालयाच्या बाहेर पण कंपाऊंडच्या आतच असलेल्या एका मोठ्या रंगीबेरंगी छत्रीखाली लावलेल्या एका स्टॉलकडे आमचे लक्ष गेले. कुतूहल जागे झाल्यामुळे स्टॉलजवळ जाऊन पाहिले तो काय?
साक्षात जस्सीअंकल तेथे बसलेले होते. त्यांच्यापुढे एक फोल्डींग टेबल मांडलेला होता. त्या टेबलवर जमिनीपर्यंत येईल असे आच्छादन घालून त्यावर मिठाई मांडलेली होती. आणि त्या टेबलवर जे आच्छादन टाकलेले होते त्याच्या दर्शनी बाजूस एक बॅनर लावलेला होता. त्यावर लिहले होते, जस्सीअंकल बाडमेरवाले। सुध देसी घी की असली मिठाई मिलनेका एकमात्र केंद्रत्याखाली लिहले होते खरीदने से पहले असली और नकली मिठाई की पहचान अवस्स करे नकली माल से सावधान
एवढे वाचून आम्ही बुचकळ्यात पडलो. आणि जस्सीअंकलशी बातचीत सुरु केली.
नमस्ते जस्सीअंकल, हे काय नविनच?
लगता है महाराष्ट्रसे आये हो।
बरोब्बर ओळखलतं अंकल.
देखो अगर तुम्हे मिठाई खरीदनी है तो सिर्फ यहाँ पर ही खरीदो, क्यों की मेरे इस स्टॉलपरही असली मिठाई मिलती है ।
पण अंकल तुम्ही कार्यालयाच्या आत स्टॉल लावण्याऐवजी बाहेर का लावलाय?
मैं कहाँ बाहर गया हूँ? मैं तो अभीभी कंपाऊंड के अंदरही हूँ कंपाऊंड की दिवार पे तो नहीं बैठा हूँ ना? जस्सीअंकलनी एका दमात आपली पोझीशन क्लिअर केली.
का, तुम्हाला आत स्टॉल लावायला जागा दिली नाही का?
वैसे मुझे अंदर तो जगह दी गई थी लेकिन वो मुझे पसंद नहीं आई। यहीं जगह मुझे पसंद है।
मग चांगलं फर्निचर वगैरे बनवून स्टॉल लावायचं होता ना. जस्सीअंकलना आम्ही नसता सल्ला देण्याचा प्रयत्न केला.
नाम मत निकालो फर्निचर का। मुझे सख्त नफरत है उससे। फर्निचरचे नांव काढताच जस्सीअंकल गरम झाले.
क्यों अंकल, फर्निचरसे तुम्हे इतनी नफरत क्यों है?
आम्हाला वाटलं जस्सीअंकल आता बहुदा वो एक बडी लंबी कहानी है बरखुरदारअसं फिल्मी स्टाईलमध्ये फ्लॅशबॅकमध्ये जाऊन बोलतील पण तसं काही झालं नाही.
देखो, फर्निचर को कोई भी अपनी अपनी मर्जीसे कहींभी एडजेस्ट कर सकते है। और काम होने के बाद या पसंद नहीं आया तो बदल भी देते है। और इतना ही नहीं दुसरा नया फर्निचर आने के बाद पुराने फर्निचर को किसी कोने में भी फेक देते है। जस्सीअंकल फर्निचरवचा राग व्यक्त करत बोलते झाले.
जस्सीअंकल पण आतमध्ये अजून काही मिठाईचे स्टॉल्स आहेत की.
देखो भाई, आजकल यहाँ नकली मिठाई बेचनेवाले बहुत सारे लोग आ रहे है। लेकिन बरसोंसे मैं और लालजीभाई ऐसे सिर्फ दो ही पुराने लोग है जो असली मिठाई बेचते है।
जस्सीअंकल आमच्या महाराष्ट्रात तुमच्यासारखी सुध देसी घी ची असली मिठाई कुणाकडे मिळेल? नागपूरला की बीडला?
अरे भाई उसका फैसला तो तुम्हें खुद स्वाद चखकर करना है। हम क्या बताये?
जस्सीअंकलच्या चातुर्याला प्रणाम करुन आम्ही तेथून मिठाई न घेताच बाहेर पडलो.

* * *

नविन ई-पुस्तक भेट मिळवा


नविन ई-पुस्तक भेट मिळवा

माझे प्रकाशनाच्या मार्गावर असलेले ई-पुस्तक पॉलिटिका अल्पावधीतच प्रसिध्द होत आहे. हे पुस्तक मी माझ्या ब्लॉगवर नविन नोंदणी करणाऱ्या सदस्यांना सप्रेम भेट देण्याचे ठरविले आहे.
त्यासाठी आपण एवढेच करा,
शेजारील Subscribe to our mailing list नोंदणी करण्याच्या बॉक्समध्ये आपला वैध ईमेल पत्ता द्या व Subscribe वर क्लिक करा.
त्यानंतर आपला मेल बॉक्स तपासून पहा. त्यात Please Confirm Subscription या नावाने आलेला ईमेल दिसेल त्यातील Yes, subscribe me to this list या लिंकवर क्लिक करा.
माझे पॉलिटिका ई-पुस्तक प्रकाशित होताच नविन नोंदणी केलेल्या सदस्यांना पाठविले जाईल.

कॅन्डीडसी पोर्टेबिलीटी





कॅन्डीडसी पोर्टेबिलीटी
कॅन्डीडसी पोर्टेबिलीटीकडे
इच्छुक आता वळत आहेत कारण
पक्ष बदलला तरी उमेदवारी कायम
ही मस्त सुविधा त्यात मिळत आहे

पक्षांतराचा ज्वर



पक्षांतराचा ज्वर
नाराजीची लागण झाल्याने सर्वत्र
पक्षांतराचा ज्वर चढायला लागला
बंडखोरीची साथ येण्याच्या भितीने
नेत्यांचा घोर वाढायला लागला

‘नमो’ थाळी



नमो थाळी
एके पाठोपाठ नमो थाळी
आता लाखोंत मिळायला लागली
पंचतारांकित भोजनांमुळे पक्षांची भूक
भागण्याऐवजी वाढायला लागली

तिकीटाचे पॅकेज



तिकीटाचे पॅकेज
निवडणूकीच्या तोंडावर नेतेमंडळी
नाराजांना निमंत्रणे धाडायला लागली
प्रवेशासोबतच तिकीटाची पॅकेजेस
निष्ठावंतांनाही भुरळ पाडायला लागली

वाराणसी यात्रा



वाराणसी यात्रा
नमोला नामोहरम करण्यासाठी
एके करणार वाराणसी यात्रा
काशी विश्वेश्वराला कौल मागण्याऐवजी
बोलविली मात्र आमचीच जत्रा

आमची 'खास' थाळी



आमची 'खास' थाळी
पार्टी फंड गोळा करण्याचा
'आम' भोजनालयाचा नवा फंडा
दहा हजाराची 'एके' थाळी बघून
'आम' आदमी मात्र पुरता थंडा

लाल फितीची शिस्त





लाल फितीची शिस्त

गोठलेल्या गारपीटग्रस्तांची मढी
सरणांवर गेली तरी विलाज नाही
नियमानुसारच मिळेल त्यांना मदत

कुणी घाई करायचं काम नाही
कुणासाठीही नियम धाब्यावर बसवायला
हे काही आदर्शचं बांधकाम नाही

तिसऱ्याचा लाभ



तिसऱ्याचा लाभ
मोदीवर लक्ष आहे म्हणत
सेनाच खरी लक्ष्य आहे
दोघांच्या संघर्षात सत्ता मात्र
तिसऱ्याचेच भक्ष्य आहे

‘हात’ बल



हातबल
उमेदवार शोधून शोधून
घड्याळ झाले हतबल
हातकणंगलेत वाढले अखेर
काँग्रेसचेच हातबल

स्टंटबाजी



स्टंटबाजी
व्यर्थ गेली राजकारणात हयात
'आप'ल्यासमोर मस्तक टेकावे
स्टंटबाजी कशी करायची असते
ते फक्त केजरीवालकडूनच शिकावे


आघाड्यांची दुकाने



आघाड्यांची दुकाने

सत्तेच्या भागीदारीची गणिते
आता जुळायला लागली
 येताच निवडणूकीची दिवाळी
आघाड्यांची दुकाने उघडायला लागली

आदर्श सभा



आदर्श सभा
राहुल गांधींच्या सभेत
अशोक चव्हाण मागे दिसले
लगेचच ओरडले विरोधक
भ्रष्टाचाराला पाठीशी घातले

बात हजम नहीं हुई




बात हजम नहीं हुई

पंचतारांकित भोजन

फक्त दोघांनाच रुचले

बात हजम न झाल्याने

महायुतीला नाही पचले



'महा'राज युती



'महा'राज युती

लोकसभेचे रण सोडा
मोदींना दिल्लीत धाडा
'महा'राज युती साठी
उघडा आहे आमचा वाडा

नाराज अजूनी




नाराज अजूनी

सदाभाऊंनी माढा गटवले, 
जानकरांना बारामतीत पाठवले,
महायुतीने प्रकरण मिटवले, 
पण नाराज अजूनी आठवले

प्रत्येकांचं दिसतयं




प्रत्येकांच दिसतयं

आपलं ठेवावं झाकून
दुसऱ्यांच बघावं वाकून
जनता हसतेय आता
प्रत्येकांच दिसतयं ते बघून