Home » Archives for February 2014
जेनेरिक औषधांची माहिती मिळवा
सध्या जेनेरिक औषधांबद्दल, त्यांच्या
कमी किंमतीबद्दल बरीच चर्चा होत आहे. डॉक्टर आपल्याला जी औषधे लिहून देतात ती
ब्रँडेड असतात. त्यामुळे या औषधांच्या किंमतीही जेनेरिक औषधांच्या पेक्षा अनेक
पटीने जास्त असतात. अर्थातच त्यामुळे ही ब्रँडेड औषधे अतिशय महाग पडतात. कमी
किंमतीमुळे जेनेरिक औषधे हलकी व जास्त किंमतीमुळे ब्रँडेड औषधे भारी असा एक गैरसमज
आहे. पण ब्रँडेड औषधा इतकीच जेनेरिक औषधेही प्रभावी असतात. त्यामुळे त्यांच्या
प्रभावीपणाबद्दल आणि उपयुक्ततेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही असे अलिकडेच
वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेल्या लेखातून स्पष्ट करण्यात आले आहे.
ब्रँडेड औषधात असणाऱ्या तशाच कंटेन्टसची पर्यायी जेनेरिक
औषधे ही कितीतरी पटीने कमी किंमतीत उपलब्ध होऊ शकतात. पण ही पर्यायी जेनेरिक औषधे
कोणती आणि त्याची माहिती कुठे मिळू शकेल? अशी माहिती वेबसाईटवर
उपलब्ध होईल,
आणि
आता तर अशी माहिती आपल्याकडे अँड्रॉईड मोबाईल फोन असेल तर त्यावरही मिळणे सहज शक्य
झाले आहे.
यासाठी गुगल प्लेवर विविध अॅप्लीकेशन्स उपलब्ध आहेत.
त्यापैकी MyDawaai व
HKPlus ही
दोन अॅप्लीकेशन्स डाऊनलोड करुन घ्यावीत. यातील My Dawaai या
अॅप्लीकेशन मध्ये जेनेरिक औषधांची माहिती ऑफलाईन पहाता येते. तर HK Plus या अॅप्लीकेशनमधून
ऑनलाईन माहिती पहाता येते.
या दोन्ही अॅप्लीकेशनद्वारे आपण सर्च केलेल्या ब्रँडेड
औषधांच्या किंमती, त्याचे उत्पादक, किंमत किती
गोळ्यांसाठी किंवा पातळ औषध असेल तर किती मिलीसाठी या माहितीसह दिसतात. तसेच
त्याला पर्याय असणारी औषधेही किंमतीसह (ब्रँडेड किंमतीपेक्षा किती टक्के कमी
पटीने) उपलब्ध आहेत हेही आपण पाहू शकतो. HK Plus या ऑनलाईन
अॅप्लीकेशनद्वारे तर त्या औषधातील कंटेन्ट चे उपयोग, त्याचे साईड
इफेक्टस अशी माहितीही मिळू शकते.
* * *
अल्टीमेटम लागू
पटेल : नरुभाईला क्लिनचिट, गुप्तभेटीची
पेरलेली ‘ती’ बातमी आणि
सर्व पर्याय खुल्लेचा इशारा बरोब्बर जमलं की नाही टायमिंग?
पवार : होय, टायमिंग अचूक जुळलयं खरं. पण त्या
महायुतीवाल्यांनी आपल्याला त्यांच्याकडे जागा नाही म्हणून जो गोंधळ घातला, तो न घालता ते थोडं शांत राहिले असते तर
सस्पेन्स अजून वाढला असता.
पटेल : होय त्यांनी शांत रहा आणि पाहाची
भूमिका घ्यायला पाहिजे होती खरी, पण नेमकं काय झालं कुणास ठाऊक? माझा सर्व
पर्याय खुले आहेतचा बाईट स्क्रीनवर सुरू होता आणि खाली पट्टीमध्ये राष्ट्रवादीला
महायुतीत स्थान नाहीची स्ट्रीप पळत होती. सगळाच पचका झाला. बाबा आणि कंपनीच्या
पोटात उठणाऱ्या गोळ्याचं परिवर्तन गुदगुल्यात झालं असेल.
पवार : मला ठाऊक आहे ना महायुतीत काय घडलं ते.
तेथे फक्त ‘स्वाभिमान’ आडवा आला,
नाहीतर कविवर्य रामदास तर आनंदात तयार होते. आणि बाकीचेही ‘ना ना करते
प्यार तुम्हीसे कर बैठे’ म्हणाले असते.
पटेल
:
चला
कसा का असेना अल्टीमेटम लागू पडला म्हणायचा.
पवार
:
हो
तर, माणिकबाळ ‘बावीस सव्वीस’चा डोस
प्यायलाच तयार नव्हतं. गुळण्या करुन बाहेर
काढून टाकायचा बेटा. आता डोस कसा गिळतो ते बघावं लागेल. आणि बाबाही पी बाळा
काकांच्या हातून एवढा डोस पी बघू माझं शहाणं बाळ ते असं म्हणून आपल्याला डोस
पाजायला मदत करतात का ते ही पहावं लागेल.
पटेल
:
आणि
त्यानंतरही डोस प्यायला तयार नसेल तर?
पवार
:
तर
जास्त कडवट लागत असेल असं समजून मग डोस थोडा ‘पातळ’ करावा लागेल.
* * *