कर्नाटकांत ‘भ्रष्टाचारा’ ची खांदेपालट
कर्नाटकांत ‘भ्रष्टाचारा’ ची खांदेपालट
कर्नाटक मध्ये सत्तापरिवर्तन झाले; भाजप
आणि जेडीएस दुसऱ्या स्थानानर गेले आणि येडियुरप्पांचाही फुगा फुटला. कर्नाटकात ते होणे
अपेक्षितच होते. भाजप मधील अंतर्गत कलहाच्या दररोज बाहेर येणाऱ्या बातम्या आणि भ्रष्टाचारांच्या
नवनविन कहाण्या ऐकून राज्यातील लोक कंटाळले होते.
आता मात्र बरे झाले, दगडापेक्षा वीट मऊ! या न्यायाने तेथील लोकांनी स्विकारलेला नविन पर्याय हा या सगळ्या गोष्टींना
एक सक्षम पर्याय आहे. भ्रष्टाचार शिरोमणी म्हणून केंद्रात ख्याती पावलेल्या; सर्वच बाबतीतील समृध्द अनुभव गाठीशी असलेल्या काँग्रेसला लोकांनी पर्याय
म्हणून स्विकारले आहे.
त्यामुळे आता भाजपमधील अंतर्गत मतभेद व कलह जसे जाहिरपणे
बाहेर येत होते किंवा मिडीयाला हाताशी धरुन आणले जात होते; तसे
यापुढे घडताना दिसणार नाही. काँग्रेसमध्ये अश्या गोष्टींना थारा नाही. ‘गॉडमदर’च्या हाती एकसूत्री
कारभार असल्याने उठ म्हणले की उठायचे आणि बस म्हणले की बसायचे अशा शिस्तीत वाढलेली
जेष्ठ मंडळी आता कर्नाटकचा राज्यशकट हाकणार आहेत.
आणि आता
रहाता राहिला दुसरा मुद्दा भ्रष्टाचाराचा. या प्रांतातील भाजपचे अननुभवी सुभेदार
तो झाकण्यात अपयशी ठरले यावरुन यातील काँग्रेसइतका अनुभव भाजपच्या गाठीशी नव्हता हे
स्पष्ट झाले. आता स्वातंत्र्यापासून अपवादात्मक काळ
सोडता कायम हाती असलेली केंद्रातील सत्ता, हाती असलेली सीबीआय सारखी तपास यंत्रणा,
अवहालातही हवे तसे बदल करण्याची हातोटी अशी सर्व बलस्थाने व अनुभव पाठीशी असलेली
काँग्रेस कर्नाटकचा राज्य कारभार पहाणार आहे. त्यामुळे तेथील जनतेला आता सत्तापक्षातील
अंतर्गत कलह आणि भ्रष्टाचाराच्या बाहेर येणाऱ्या कहाण्यापासून मुक्ती मिळेल अशी
आशा करायला हरकत नाही.
***
0 Comments:
Post a Comment