ऑनलाईन जाहिरातींची वाढती लोकप्रियता
ऑनलाईन जाहिरातींची वाढती लोकप्रियता
ऑनलाईन जाहिरातींची बाजारपेठ मार्च पर्यंत २ हजार ९३८ कोटी
रुपयांवर जाण्याचा अंदाज इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि आयएमआरबी
इंटरनॅशनल यांनी संयुक्तपणे प्रसिध्द केलेल्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला
आहे.
ऑनलाईन जाहिरातीमध्ये डिस्प्ले, मोबाईल, सोशल मिडीया,
ई-मेल आणि व्हिडीओ जाहिरातींचा समावेश असून ही बाजारपेठ वार्षिक २० टक्के वाढीची
नोंद करीत यंदाच्या मार्चमध्ये २ हजार ६५० कोटी रुपयांवर गेली आहे; परंतु
अन्य सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेटस, सोशल मिडीया तसेच अन्य गोष्टींचा वाढता वापर
लक्षात घेता ही बाजारपेठ पुढील वर्षाच्या मार्च महिन्यात २,९३८ कोटी रुपयांवर
जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही बाजारपेठ १,७५०
कोटी रुपयांची होती.
>> वार्षिक २० टक्के वाढीची नोंद >> मार्चमध्ये गाठली २२६० कोटी रुपयांची पातळी>> मोबाईलवरील जाहिरातीत दुप्पट वाढसहज इंटरनेटची उपलब्धता, वेगवेगळ्या गरजांमुळे मोबाइलचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मोबाईल जाहिरातींवरील खर्च त्यानुसार वाढला आहे. २०११-१२ या वर्षातील११५ कोटी रुपयांच्या खर्चात दुपटीने वाढ होऊन तो नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात २३० कोटी रुपयांवर गेला आहे. मोबाइल फोन्स आणि टॅब्लेटवरील जाहिरात खर्चाचे प्रमाण ७ टक्क्यांवरुन (२०११-१२) १० टक्क्यांवर (२०१२-१३) झाले.
येत्या चार वर्षाच्या कालावधीत ऑनलाईन जाहिरातींची बाजारपेठ
सरासरी ४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात ऑनलाईन
जाहिरातीमध्ये सर्च आणि डिस्प्ले जाहिरातींचा वाटा सर्वाधिक होता; परंतु
२०१२-१३ आर्थिक वर्षात हा वाटा मोबाईल, सोशल आणि व्हिडिओ जाहिरातींच्या चढत्या
आलेखाप्रमाणे घटला असल्याचे दिसून आले आहे.
संदर्भ : दै. दिव्यमराठी
या बातमीवरुन ऑनलाईन जाहिरातींची वाढती लोकप्रियता व
वेगाने विस्तारीत होत जाणाऱ्या ऑनलाईन जाहिरात क्षेत्राची कल्पना यावी. या
प्रगतीमध्ये ऑनलाईन जाहिराती प्रदर्शित करणाऱ्या ब्लॉग्सचा सहभाग विशेष लक्षणीय व उल्लेखनीय आहे.
0 Comments:
Post a Comment