HTML CODE चे टेस्टिंग कसे करावे?
अनेक वेळा असा प्रसंग येतो की, आपल्या ब्लॉगवर एखादे नविन विजेट
जोडताना, त्यामध्ये काही किरकोळ बदल करावे लागतात. उदा. आपल्या ब्लॉगचे नांव,
आपल्या ब्लॉगची लिंक किंवा आपल्या Twitter, Facebook, Google+ इ.
सोशल साईटच्या लिंक्स आणि आपल्या ब्लॉगचे RSS Feed लिंक,
किंवा इतर काही मजकूर इत्यादी इत्यादी.
मग मूळ विजेटच्या HTML कोडमध्ये आपण केलेले बदल
हे बरोबर झालेले आहेत की नाहीत? याची खात्री ते विजेट आपल्या
ब्लॉगवर जोडण्याआधी आपण करुन घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी एका सोप्या पध्दतीची माहिती
आज आपण येथे करुन घेणार आहोत.
HTML कोड टेस्ट करण्यासाठी या साईटवर जा. तेथील बॉक्समध्ये तुम्ही बदल केलेला HTML विजेट कोड कॉपी करुन पेस्ट करा आणि Test The HTML Code या बटणावर क्लिक करा. त्यानंतर एका नविन उघडलेल्या विंडोमध्ये तुमच्या
कोडचा टेस्ट रिझल्ट म्हणजे ते विजेट कसे दिसणार त्याचा प्रिव्ह्यू प्रदर्शित होईल.
आता यातील तुम्ही बदल केलेल्या लिंक्सवर माऊसचा कर्सर नेऊन किंवा क्लिक करुन
कोडमध्ये तुम्ही केलेले बदल अचूक आहेत याची तुम्ही खात्री करुन घेऊ शकता.
Clear Text Box या बटणावर क्लिक करुन तुमचा सध्याचा कोड क्लिअर करुन
पुन्हा दुसरा कोड त्या बॉक्समध्ये कॉपी पेस्ट करु शकता.
आणि मग हे अचूक बदल केलेले विजेट तुमच्या ब्लॉगवर लावण्यात
आता तुम्हाला काहीच अडचण येणार नाही.
चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.
ReplyDeleteआपल्या भेटीबद्दल व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद कांचनताई!
Delete