रिमाईंडर्स मिळवा SMS द्वारे
Get Reminders by SMS
कुटुंबातील व नातेवाईकामधील प्रिय व्यक्तिंचे वाढदिवस,
लग्नाचा वाढदिवस, बिलांचे पेमेंट, हप्ते
भरणे एक ना अनेक अशा कितीतरी गोष्टी अगदी वेळच्या वेळी न विसरता होणे फार गरजेचे
असते, अन्यथा वाढदिवसा दिवशी अभिनंदन केले नाही म्हणून आठवण न ठेवल्याचे निमित्त
होऊन प्रियजनांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ येऊ शकते. किंवा वेळेवर बिल अथवा
हप्ता न भरल्यास प्रसंगी नुकसानही
होण्याची भिती असते.
असे होऊ नये यासाठी बहुतेक सर्वजण मोबाईलमधील रिमाईंडर
सुविधेचा वापर करतात. आणि तो करायलाच पाहिजे. पण काही प्रसंगी जर हँडसेट रिसेट
झाला किंवा गमावला तर त्या मोबाईल हँडसेटमध्ये सेव्ह केलेली सर्व रिमाईंडर्स निरुपयोगी
ठरतात.
म्हणून याच्या जोडीला अतिरिक्त म्हणून इंटरनेटवरील आणखी
एका मोफत सुविधेचा उपयोग आपण करुन घ्यायला पाहिजे. त्यासाठी गुगल कॅलेंडर हा एक
चांगला पर्याय नेटवर उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करुन आपण आपले रिमांईंडर्स
आपल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे मोफत मिळवू शकतो.
त्यामुळे मोबाईल हँडसेटचा भविष्यात जरी काही प्रॉब्लेम
झाला तरीही आपला मोबाईल क्रमांक तोच असल्यामुळे गुगल कॅलेंडरकडून आपल्याला
रिमारईंडर्सचे एसएमएस निरंतर मिळतच राहतील आणि आवश्यक ती कामे वेळच्या वेळी करुन होणारे
संभाव्य नुकसान टाळता येईल.
गुगलच्या मुख्य पृष्ठावर वरील बाजूस अनेक पर्याय दिसतात
तेथेच हा कॅलेंडरचा पर्याय उपलब्ध आहे. गुगलच्या आपल्या अकाउंटमध्ये लॉगीन होऊन या
पर्यायाचा आपण उपयोग करुन घेऊ शकतो. आपल्या पसंतीनुसार रिमाईंडर साठी SMS, Email असे पर्याय निवडून रिमाईंडर वेळेवर किंवा वेळेपूर्वी काही मिनीट, तास,
दिवस, आठवडा असे पर्याय वापरुन सेट करु शकता.
0 Comments:
Post a Comment