अपरोक्ष होणारे मोबाईल कॉल्स कसे टाळावेत | आगळं! वेगळं !!!

अपरोक्ष होणारे मोबाईल कॉल्स कसे टाळावेत

HOW TO STOP UNWANTED OUTGOING CALLS

काही वेळेला आपणांवर असा प्रसंग येतो की, नाईलाजास्तव का होईना पण आपला मोबाईल काही काळ दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याची पाळी येते. पण त्या काळात त्या व्यक्तीने किंवा इतरांनी आपल्या मोबाईलवरुन कॉल्स करु नयेत अशी आपली मनोमन इच्छा असते. पण समोरच्या व्यक्तीला तसे स्पष्ट सांगण्याचे धाडस आपल्याला होत नाही, किंवा तसे सांगून त्याची नाराजी ओढवून घेणे आपल्याला परवडणार नसते.
प्रसंगानुसार काही काळ मोबाईल तर दुसऱ्याच्या स्वाधीन करायचा आहे, पण लॉक करुन दिला तर समोरच्या व्यक्तीवर विश्वास नाही हे स्पष्ट होते, ते टाळायचे आहे. आणि समोरची व्यक्ती अशी आहे की, तिला बॅलन्स कमी आहे, नेटवर्क प्रॉब्लेम आहे अशा सबबी सांगून उपयोग होणार नाही.
मग अशा परिस्थीत एक अशी युक्ती करावी लागेल, की जी कुणाच्याही लक्षात येणार नाही. आणि आपल्या मोबाईल वरुन आपल्या अपरोक्ष कॉल्सही होणार नाहीत. आता येथे जी ट्रीक सांगितली आहे, ती  सॅमसंग कंपनीच्या हँडसेटवर टेस्ट केलेली आहे.
ट्रीक
मेनू मधून सेटींग्जमध्ये जा. त्यातून अप्लीकेशन सेटींग्जमध्ये जाऊन कॉल हा पर्याय निवडा. त्यातील ऑल कॉल्स पर्याय निवडून शो माय नंबर पर्याय निवडा. त्यात 1) बाय नेटवर्क, 2) सेन्ड व 3) हाईड असे तीन पर्याय दिसतील. त्यापैकी हाईड पर्याय चेक करा व सेव्ह करा.
Menu > Settings>Application Settings>Call>All Calls>Show My Number>1)By Network 2)Send 3)Hide>Check Hide and Save.
आता या मोबाईलवरुन तुम्ही कोणत्याही क्रमांकावर कॉल लावण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नेटवर्कचा कोणताही संदेश ऐकू येणार नाही, तर फक्त एरर टोन ऐकू येईल आणि मोबाईलच्या स्क्रीनवर Service Not Allowed असा संदेश दिसून कॉल डिसकनेक्ट होईल.
या मोबाईल वरुन कॉल्स का करता येत नाहीत याचा कुणीही शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी, सेटींग्ज मध्ये केलेल्या या बदलामुळे कॉल्स लागत नाहीत हे इतरांच्या लक्षात येणे कठीणच आहे.
आपले काम झाल्यावर व मोबाईल पुन्हा आपल्या ताब्यात घेतल्यानंतर पूर्ववत By Network हा पर्याय चेक करुन सेव्ह करायला विसरु नका.


टीप : या ट्रीकचा आणखीन एक उपयोग स्वतःसाठीसुध्दा करता येऊ शकेल. समजा तुमच्या मोबाईलवर फ्री कॉल्सचा एखादा पॅक सुरु आहे, पण मधूनच उपटणारे व्हॅलेंटाईन डे सारखे ब्लॅक आऊट डेज आपल्या लक्षात येत नाहीत. आणि त्यादिवशी फ्री समजून केलेल्या कॉल्सचे पडलेले बिल पाहून आपणाला हळहळ वाटते. तर अशा ब्लॅक आऊट डे दिवशी स्वतः कडून किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून सुध्दा अनावधानाने कॉल्स होऊ नयेत यासाठी सुध्दा याचा कल्पकतनेने उपयोग करता येऊ शकेल.

0 Comments:

Post a Comment