February 2013 | आगळं! वेगळं !!!

रिमाईंडर्स मिळवा SMS द्वारे


Get Reminders by SMS
कुटुंबातील व नातेवाईकामधील प्रिय व्यक्तिंचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस,  बिलांचे पेमेंट, हप्ते भरणे एक ना अनेक अशा कितीतरी गोष्टी अगदी वेळच्या वेळी न विसरता होणे फार गरजेचे असते, अन्यथा वाढदिवसा दिवशी अभिनंदन केले नाही म्हणून आठवण न ठेवल्याचे निमित्त होऊन प्रियजनांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ येऊ शकते. किंवा वेळेवर बिल अथवा हप्ता न  भरल्यास प्रसंगी नुकसानही होण्याची भिती असते.
असे होऊ नये यासाठी बहुतेक सर्वजण मोबाईलमधील रिमाईंडर सुविधेचा वापर करतात. आणि तो करायलाच पाहिजे. पण काही प्रसंगी जर हँडसेट रिसेट झाला किंवा गमावला तर त्या मोबाईल हँडसेटमध्ये सेव्ह केलेली सर्व रिमाईंडर्स निरुपयोगी ठरतात.
म्हणून याच्या जोडीला अतिरिक्त म्हणून इंटरनेटवरील आणखी एका मोफत सुविधेचा उपयोग आपण करुन घ्यायला पाहिजे. त्यासाठी गुगल कॅलेंडर हा एक चांगला पर्याय नेटवर उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करुन आपण आपले रिमांईंडर्स आपल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे मोफत मिळवू शकतो.
त्यामुळे मोबाईल हँडसेटचा भविष्यात जरी काही प्रॉब्लेम झाला तरीही आपला मोबाईल क्रमांक तोच असल्यामुळे गुगल कॅलेंडरकडून आपल्याला रिमारईंडर्सचे एसएमएस निरंतर मिळतच राहतील आणि आवश्यक ती कामे वेळच्या वेळी करुन होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल.


गुगलच्या मुख्य पृष्ठावर वरील बाजूस अनेक पर्याय दिसतात तेथेच हा कॅलेंडरचा पर्याय उपलब्ध आहे. गुगलच्या आपल्या अकाउंटमध्ये लॉगीन होऊन या पर्यायाचा आपण उपयोग करुन घेऊ शकतो. आपल्या पसंतीनुसार रिमाईंडर साठी SMS, Email असे पर्याय निवडून रिमाईंडर वेळेवर किंवा वेळेपूर्वी काही मिनीट, तास, दिवस, आठवडा असे पर्याय वापरुन सेट करु शकता.

Backlink Signature - प्रतिक्रियेखालील सही


Backlink Signature - प्रतिक्रियेखालील सही


आपण जेव्हा कधी दुसऱ्या एखाद्या ब्लॉगवर प्रतिक्रिया नोंदविता, तेव्हा त्याखाली तुमच्या ब्लॉगची Backlink Signature सही त्याखाली करणे फायदेशीर ठरते. त्या लिंकवर क्लिक करणारे वाचक तुमच्या ब्लॉगवर येतात. म्हणजेच तुमच्या ब्लॉगच्या वाचकसंख्येत वाढ होण्यास मदतच होते.

ही सही (Backlink Signature)कशी करायची ते आता पाहू.
खाली दिलेला कोड कॉपी करुन नोटपॅडमध्ये पेस्ट करा.

<a href ='http://nathtel.blogspot.com/' title ='आगळं!वेगळं!!!-जरा हटके'> आगळं!वेगळं!!!</a>

  • यातील http://nathtel.blogspot.com/ लिंकऐवजी तुमच्या ब्लॉगची लिंक टाका. टायटल टॅगमध्ये आगळं!वेगळं!!!-जरा हटके ऐवजी तुमच्या ब्लॉगचे नांव टाका आणि त्यापुढे कॅचलाईन टाका.
  • आता ही नोटपॅड फाईल encoding UTF-8 या पर्यायाने सेव्ह करा.
आगळं!वेगळं!!! या लिंकवर माऊस नेल्यास कॅचलाईनसह नांव दिसते हे खालील उदाहरणावरुन लक्षात येईल.

आगळं!वेगळं!!!

तुम्ही जेव्हा कधी प्रतिक्रिया नोंदवाल तेव्हा त्याखाली या नोटपॅड फाईल मध्ये सेव्ह केलेला कोड कॉपी पेस्ट करा.

अपरोक्ष होणारे मोबाईल कॉल्स कसे टाळावेत

HOW TO STOP UNWANTED OUTGOING CALLS

काही वेळेला आपणांवर असा प्रसंग येतो की, नाईलाजास्तव का होईना पण आपला मोबाईल काही काळ दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याची पाळी येते. पण त्या काळात त्या व्यक्तीने किंवा इतरांनी आपल्या मोबाईलवरुन कॉल्स करु नयेत अशी आपली मनोमन इच्छा असते. पण समोरच्या व्यक्तीला तसे स्पष्ट सांगण्याचे धाडस आपल्याला होत नाही, किंवा तसे सांगून त्याची नाराजी ओढवून घेणे आपल्याला परवडणार नसते.
प्रसंगानुसार काही काळ मोबाईल तर दुसऱ्याच्या स्वाधीन करायचा आहे, पण लॉक करुन दिला तर समोरच्या व्यक्तीवर विश्वास नाही हे स्पष्ट होते, ते टाळायचे आहे. आणि समोरची व्यक्ती अशी आहे की, तिला बॅलन्स कमी आहे, नेटवर्क प्रॉब्लेम आहे अशा सबबी सांगून उपयोग होणार नाही.
मग अशा परिस्थीत एक अशी युक्ती करावी लागेल, की जी कुणाच्याही लक्षात येणार नाही. आणि आपल्या मोबाईल वरुन आपल्या अपरोक्ष कॉल्सही होणार नाहीत. आता येथे जी ट्रीक सांगितली आहे, ती  सॅमसंग कंपनीच्या हँडसेटवर टेस्ट केलेली आहे.
ट्रीक
मेनू मधून सेटींग्जमध्ये जा. त्यातून अप्लीकेशन सेटींग्जमध्ये जाऊन कॉल हा पर्याय निवडा. त्यातील ऑल कॉल्स पर्याय निवडून शो माय नंबर पर्याय निवडा. त्यात 1) बाय नेटवर्क, 2) सेन्ड व 3) हाईड असे तीन पर्याय दिसतील. त्यापैकी हाईड पर्याय चेक करा व सेव्ह करा.
Menu > Settings>Application Settings>Call>All Calls>Show My Number>1)By Network 2)Send 3)Hide>Check Hide and Save.
आता या मोबाईलवरुन तुम्ही कोणत्याही क्रमांकावर कॉल लावण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नेटवर्कचा कोणताही संदेश ऐकू येणार नाही, तर फक्त एरर टोन ऐकू येईल आणि मोबाईलच्या स्क्रीनवर Service Not Allowed असा संदेश दिसून कॉल डिसकनेक्ट होईल.
या मोबाईल वरुन कॉल्स का करता येत नाहीत याचा कुणीही शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी, सेटींग्ज मध्ये केलेल्या या बदलामुळे कॉल्स लागत नाहीत हे इतरांच्या लक्षात येणे कठीणच आहे.
आपले काम झाल्यावर व मोबाईल पुन्हा आपल्या ताब्यात घेतल्यानंतर पूर्ववत By Network हा पर्याय चेक करुन सेव्ह करायला विसरु नका.


टीप : या ट्रीकचा आणखीन एक उपयोग स्वतःसाठीसुध्दा करता येऊ शकेल. समजा तुमच्या मोबाईलवर फ्री कॉल्सचा एखादा पॅक सुरु आहे, पण मधूनच उपटणारे व्हॅलेंटाईन डे सारखे ब्लॅक आऊट डेज आपल्या लक्षात येत नाहीत. आणि त्यादिवशी फ्री समजून केलेल्या कॉल्सचे पडलेले बिल पाहून आपणाला हळहळ वाटते. तर अशा ब्लॅक आऊट डे दिवशी स्वतः कडून किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून सुध्दा अनावधानाने कॉल्स होऊ नयेत यासाठी सुध्दा याचा कल्पकतनेने उपयोग करता येऊ शकेल.

मोबाईलवरुन फ्री बोलत रहाण्याची ट्रीक

How to get free Talktime?


मोबाईलवरुन फ्री बोलत रहाण्याची ट्रीक


शीर्षक वाचून विचारात पडलात ना? पण असे घडू शकते. तुम्ही तुमच्या प्रीपेड मोबाईल वरुन महिनेच्या महिने फ्री बोलत राहू शकता अगदी कोणत्याही नेटवर्कवर. ही हॅकींग ट्रीक नाही किंवा कोणतीही बेकायदेशीर कृतीही नाही. उत्सुकता वाढली ना, चला तर मग सांगूनच टाकतो हे कसं शक्य आहे ते.
या युक्ती लाभ कुणालाही घेता येईल, मात्र त्यसाठी तुमच्याकडे TATA DOCOMO कंपनीचे प्रीपेड कनेक्शन असणे आवश्यक आहे. आणि रुपये 251 एकवेळेस खर्च करावे लागतील. (पण ज्यांच्याकडील मोबाईल मध्ये आधीच 251 रुपयांहून अधिक बॅलन्स शिल्लक असेल, त्यांनी तर डायरेक्ट ही ट्रीक वापरावी, त्यानी पुन्हा 251 रुपये वेगळे खर्च करण्यची गरज नाही.) TATA DOCOMO चे एक 251 रुपयांचे Combo voucher आहे. ते रिचार्ज केल्यास 251 रुपयांचा पूर्ण टॉकटाईम मिळतो, व त्याची Validity लाईफटाईम आहे, आणि त्यासोबत 30 दिवसांसाठी TATA To TATA नेटवर्कसाठी 250 मिनीटे (15,000 सेकंद) व  इतर सर्व नेटवर्ककरितां लोकल 250 मिनीटे (15,000 सेकंद) असे एकूण 500 मिनीटे म्हणजेच 30,000 सेकंद फ्री मिळतात.
आता तुम्ही म्हणाल की, हे रिचार्ज केल्यावरच जर हे 30,000 सेकंद मिळत असतील तर मग त्यात काय विशेष. पण विशेष तर पुढच्या ट्रीकमध्येच आहे. सर्वप्रथम तुम्हाला एकवेळेस हे 251 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर 30 दिवस मनसोक्त बोलून या फ्री 30,000 सेकंदांचा आनंद घ्या (अर्थातच फ्री सेकंदांच्या मर्यादेत राहून, आणि जर का त्याहून अधिक बोलणे झाले तर बॅलन्समधून वजा होतील).
आता असं बघा की, तुम्ही 251 रुपये एकदाच खर्च केले आहेत. तेही टॉकटाईमच्या रुपाने तुम्हाला परत मिळाले आहेतच, आणखीन वर 30,000 सेकंद फ्री. म्हणजेच तुमचा एक पैसाही खर्च झालेला नाही. पण टॉकटाईमध्ये गुंतला आहे इतकेच.

आता वेळ झाली आहे ट्रीक वापरण्याची
 
  • कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन रिचार्ज हा पर्याय निवडा

तुम्ही पहिले 251 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर 30 दिवसा नंतर एक पैसाही खर्च न करता हे 30,000 सेकंद पुन्हा पुन्हा कसे मिळवायचे ते पहा. 251 रुपयांचे रिचार्ज करण्यापूर्वी तुमचा आधीचा थोडाफार बॅलन्स निश्चीतच शिल्लक असेल. आणि तुमचे या महिन्यातील बोलणे फ्री सेकंदांच्या मर्यादेत झाले असे गृहित धरले तर, तुमच्या मोबाईल अकाउंटमध्ये 251 रुपयांहून अधिक बॅलन्स शिल्लक होता तो तसाच आताही असणार आहे. आता पुन्हा तुम्हाला हे 30,000 सेकंद फ्री मिळण्यासाठी पुन्हा 251 रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यक आहे. पण त्यासाठी प्रत्यक्ष 251 रुपये तुम्ही आता पुन्हा खर्च करण्याची गरज नाही.
ट्रीक
 तर त्यासाठी तुम्ही TATA DOCOMO कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन रिचार्ज हा पर्याय निवडायचा आहे. तेथील बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप केल्यावर तीन पर्याय दिसतील त्यापैकी Special Recharge हा पर्याय निवडून त्यातील रु.251 चे व्हाऊचर सिलेक्ट करा. त्यानंतर पेमेंटचे 1)  Pay by Your Current Mobile Balance व 2) Pay by Net banking, Credit/debit card असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी 1) Pay by Your Current Mobile Balance या पर्यायाची निवड करा. त्यानंतर एक व्हेरीफिकेशनचा कोड नंबर तुमच्या मोबाईलवर एसएमएसने प्राप्त होईल. तो कोड साईटवर दिसत असलेल्या बॉक्समध्ये टाईप करा. म्हणजे रिचार्जची प्रक्रिया पूर्ण होईल.
  
  • तीन पर्यायापैकी Special Recharge हा पर्याय निवडा

  • त्यापैकी रु.251 चे व्हाऊचर सिलेक्ट करा

  • पेमेंटसाठी Pay by Your Current Mobile Balance हाच पर्याय निवडा

आता तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करा म्हणजे तुम्हाला कळून येईल की, काय घडले आणि काय बिघडले ते. खरे तर काहीच घडले नाही. तुमच्याच बॅलन्समधून 251 रुपये वजा झाले आणि पुन्हा तेच पूर्ण टॉकटाईम म्हणून तुमच्या बॅलन्समध्ये जमा झाले. आणि पुन्हा 30 दिवसांकरिता 30,000 सेकंद फ्री मिळाले. म्हणजेच ही युक्ती वापरल्यामुळे पुन्हा एक पैसाही खर्च न करता 30,000  सेकंद फ्री मिळाले, आणि बॅलन्स आहे तेवढा आहेच. याप्रमाणे दर महिन्याला ही ट्रीक वापरुन तुम्ही काहीही खर्च न करता फ्री बोलत राहू शकता.
महत्वाचे अपडेट : दि. 28 फेब्रु. 2013 पासून या ट्रीकसाठी आवश्यक असलेला Pay by Your Current Mobile Balance हा पर्याय कंपनीने काढून टाकला आहे. त्यामुळे आता ही ट्रीक निरुपयोगी ठरली आहे. वाचकांनी याची नोंद घ्यावी.