अंतरजालावर संचार करा अनामिकपणे
अंतरजालावर संचार करताना आपली ओळख म्हणजे आपल्या संगणकाचा आय.पी. हीच असते. अंतरजालावर संचार करताना आपल्या संचार करण्याच्या सवयींवर बऱ्याच वेबसाईटस वॉच ठेवून असतात. आपण कुठल्या संकेतस्थळांना वारंवार भेट देतो, गुगल सारख्या शोध यंत्राच्या माध्यमातून कशाचा शोध घेतो, अंतरजालावरील आपल्या आवडी-निवडी काय आहेत, कोणत्या गोष्टीबद्दल विशेष रुची आहे अशा अनेक गोष्टींची टेहळणी आपल्या परस्पर केली जात असते. आपल्या दृष्टीने या नसत्या उठाठेवी आहेत, पण
त्यांच्या दृष्टीने मात्र धंद्याच्या गोष्टी. गुगलव्दारे आपण जेव्हा काही सर्च करतो तेव्हा नेमक्या आपण करीत असलेल्या शोधासंदर्भातीलच जाहिराती गुगलपेजच्या सर्वात वरील भागात व उजव्या बाजूकडील भागात आपल्याला दिसून येतात या एका साध्या उदाहरणावरुन याची आपल्याला कल्पना येईल.
त्यांच्या दृष्टीने मात्र धंद्याच्या गोष्टी. गुगलव्दारे आपण जेव्हा काही सर्च करतो तेव्हा नेमक्या आपण करीत असलेल्या शोधासंदर्भातीलच जाहिराती गुगलपेजच्या सर्वात वरील भागात व उजव्या बाजूकडील भागात आपल्याला दिसून येतात या एका साध्या उदाहरणावरुन याची आपल्याला कल्पना येईल.
असे असले तरी, व्हीपीएन म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कच्या माध्यमातून आपली खरी ओळख लपवून अंतरजालावर अनामिकपणे संचार करणे आपल्याला सहज शक्य आहे. अशा प्रकारची व्हीपीएन सेवा देणाऱ्या अनेक वेबसाईटस् आहेत. त्यापैकी माझ्या माहितीनुसार तुलनात्मकरित्या सिक्युरीटी किस ही एक सहज सुलभ वेबसाईट आहे.
या वेबसाईटव्दारे या सेवेचा उपयोग करण्यासाठी कोणतेही रजिस्ट्रेशन करावे लागत नाही व ही सेवा मोफत वापरता येते. मोफत प्लॅनसाठी प्रतिदीन 300 एमबी डाऊनलोड इतकी मर्यादा आहे. याचाच अर्थ दरमहा सुमारे 9 जीबी वापर आपल्याला मोफत करता येईल. यासाठी केवळ या साईटवरुन सिक्युरीटी टनेल हे एक छोटेसे अॅप्लीकेशन डाऊनलोड करुन ते आपल्या संगणकावर इन्स्टॉल करावे लागेल. आणि लगेचच आपल्याला त्याचा वापर सुरु करता येईल.
त्याचा वापर करण्याची पध्दतही सुलभ आहे. सर्वप्रथम त्यावर उपलब्ध असलेल्या जर्मनी, फ्रान्स, युके, यूएस अशा विविध देशांच्या नऊ सर्व्हरपैकी आपल्याला पाहिजे तो पर्याय निवडावा, अप्लाय बटनवर क्लिक करुन मग कनेक्टवर क्लिक करावे. काही सेकंदातच आपण या सेवेशी जोडले गेल्यानंतर आपली खरी ओळख लपवून निवडलेल्या देशाच्या आय.पी. अॅड्रेसची ओळख देत अंतरजालावर मुक्तपणे संचार
करु शकतो.
0 Comments:
Post a Comment