तात्पुरता ईमेल आयडी कसा मिळवाल? | आगळं! वेगळं !!!

तात्पुरता ईमेल आयडी कसा मिळवाल?

इंटरनेटवरुन आपण नियमितपणे आपल्याला आवश्यक असलेली विविध प्रकारची सामग्री डाऊनलोड करुन घेत असतो. पण बऱ्याच वेळेस, बऱ्याच वेबसाईटवर डाऊनलोड करण्यासाठी रजिस्ट्रेशनही अनिवार्य असते. अशा ठिकाणी भविष्यात त्रासदायक ठरु शकणाऱ्या व नको असलेल्या ईमेलचा भडिमार टाळण्यासाठी आपला खरा ईमेल आयडी देण्याची आपली इच्छा नसते, पण रजिस्ट्रेशनसाठी तो तर द्यावाच लागतो.

मग अशावेळी वेळ मारुन नेण्यासाठी जर तात्पुरता ईमेल आयडी आपल्याला उपलब्ध झाला तर किती बरे होईल? असा विचार तुमच्या मनात येत असेल. आणि तसा तात्पुरता ईमेल आयडी आपणाला उपलब्ध होऊ शकतो. त्याचीच माहिती आज आपण येथे घेणार आहोत.

तात्पुरता ईमेल आयडी आणि तोही मोफत मिळण्यासाठी मी तुम्हाला एक वेबसाईट सुचवित आहे. या साईटवर जाऊन तुम्ही काही सेकंदातच तुमचा तात्पुरता ईमेल आयडी मिळवू शकता व लगेच तो वापरुही शकता. यासाठी तुम्हाला येथे रजिस्ट्रेशन करण्याचीही आवश्यकता नाही, किंवा तुमचा खरा ईमेल आयडी देण्याचीही गरज पडत नाही. केवळ Create या पर्यायावर क्लिक करुन तेथील बॉक्समध्ये तुम्हाला हवे असलेले नांव टाईप करा आणि कॅप्चा टाईप करा. आणि झाला तुमचा नविन ईमेल आयडी वापरण्यासाठी तयार. हा ईमेल आयडी 14 दिवस अस्तित्वात रहातो. या ईमेल आयडीवर आलेले ईमेल तुम्ही Check या पर्यायावर क्लिक करुन तपासू शकता.

0 Comments:

Post a Comment