टॉरेन्ट फाईल डाऊनलोड करा इंटरनेट डाऊनलोड मॅनेजरव्दारे
बरीचशी सॉफ्टवेअर्स, मूव्हीज आणि गेम्स आपल्याला टॉरेन्ट फाईलच्या माध्यमातून मिळतात. पण या टॉरेन्ट फाईल डाऊनलोड करण्यासाठी बराच वेळ लागतो. आणि तो कालावधी सीडस् आणि इतर काही गोष्टीवर अवलंबून असू शकतो. तसे पहाता टॉरेन्ट फाईल डाऊनलोड करणे ही एक प्रदिर्घ आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. निदान मोबाईलच्या माध्यमातून 2G च्या मंदगतीने इंटरनेटचा वापर करणारांना तरी हे विधान लागू पडते.
तरी पण ही कंटाळवाणी प्रक्रिया टाळून त्याऐवजी याच टॉरेन्ट फाईल्स आपणाला इंटरनेट डाऊनलोड मॅनेजरव्दारे अधिक वेगाने व जलदरित्या डाऊनलोड करुन घेणे शक्य आहे. त्यासाठी या वेबसाईटवर जाऊन तेथील बॉक्समध्ये टॉरेन्ट फाईलची लिंक किंवा मॅग्नेट लिंक पेस्ट करावी व गो वर क्लिक करुन नंतर फ्री वर क्लिक करावे. त्यानंतर आपण ही .झीप मध्ये रुपांतरीत झालेली टॉरेन्ट फाईल इंटरनेट डाऊनलो़ड मॅनेजरव्दारे वेगाने डाऊनलोड करुन घेऊ शकतो.