February 2012 | आगळं! वेगळं !!!

ऑनलाईन शॉपींगसाठी एक किफायतशीर वेबसाईट

मला काही दिवसांपूर्वी वायफाय राऊटर खरेदी करायचा होता. त्यादृष्टीने मी इंटरनेटवर शोध घेतला. शेवटी बेल्कीन कंपनीचे एक मॉडेल पसंत केले. मग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी ऐकिवात असलेल्या FlipCart(बंगळूरुस्थित) या साईवर मी पसंत केलेल्या मॉडेलची किंमत या साईटवर रु.2273 (सर्व करांसहित व फ्रि होम डिलेव्हरी) इतकी दिसली. मी खरेदी करण्याचे ठरविले आणि ऑर्डर प्लेस करण्याचा प्रयत्न केला परंतु चेकआऊट प्रोसेसमध्ये मी रहात असलेल्या शहराच्या पिनकोड क्रमांकासाठी सेवा देण्यास असमर्थ असल्याचा संदेश कंपनीने दाखविला. ते उत्पादन मिळण्यासाठी मी पत्ता बदलू शकतो हे नमूद करायला कंपनी विसरली नाही. मी थोडासा नाराज झालो.

मग इंटरनेटवर पुन्हा शोध सुरु झाला. letsbuy (गुरगांव हरियाणास्थित) या वेबसाईटवर याच मॉडेलची किंमत रु.2099 (सर्व करांसहित व फ्रि होम डिलेव्हरी) आढळली, पण तिथेही वर उल्लेखलेली गोष्टच अडचणीची ठरली. bitfang (मुंबईस्थित) या वेबसाईटवर याच मॉडेलची किंमत रु.2050 इतकी दिसली. पण डिलेव्हीरी चार्जेसचा आधी कुठेही उल्लेख न करता, अगदी ऐनवेळी चेकआऊट प्रोसेसमध्ये रु.150 डिलेव्हरी चार्जेस अॅड केलेले दिसल्यामुळे मी येथे खरेदी करणे टाळलेprimeabgb (लॅमींग्टन रोड,मुंबईस्थित) या वेबसाईवरील किंमती योग्य वाटल्या, पण तेथे बेल्कीन कंपनीचे प्रॉडक्टच आढळले नाही.

शोध घेता घेता फारसे नांव ऐकिवात नसलेली discountsvu (चेन्नईस्थित) वेबसाईटवर या मॉडेलची किंमत रु.1999 (सर्व करांसहित व फ्रि होम डिलेव्हरी) दिसून आली. पण या कंपनीचे, वेबसाईटचे नांव ऐकिवात नसल्याने मनात धाकधूक होती. फसवणूक होईल का अशी शंका वाटत होती. त्या वेबसाईटवरील ग्राहकांच्या शिफारसी (Testimonials) वाचल्या, आणि धाडस करण्याचे ठरविले. या वेबसाईवर मात्र माझ्या पत्त्यासाठी डिलेव्हरीची अडचण आली नाही. मी बेल्कीनचा वायफाय राऊटर या वेबसाईटवरुन ऑनलाईन खरेदी केला.

त्यांनीही उत्तम पॅकींग करुन ते प्रॉडक्ट डीटीडीसी कुरीयरने त्याचदिवशी रवाना केले. व तसे मला ईमेलने त्वरित कळविले. त्यामुळे कुरीयर कंपनीच्या वेबसाईटवर ते पार्सल कुठपर्यंत आले आहे, त्याचे ट्रॅकिंग मला करता येत होते. 3 फेब्रुवारीला खरेदी केलेले प्रॉडक्ट मला मध्ये आलेला सुट्टीचा दिवस रविवार धरुन चौथ्या दिवशी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी मिळालेही. अस्सल (Genuine) प्रॉडक्ट, व्हॅट टॅक्स पेड बिलासहित उत्तम पॅकींगमध्ये व विनाविलंब मिळाले. तेही इतर सर्व ऑनलाईन शॉप्सपेक्षा अत्यंत कमी किंमतीत व कोणत्याही छुप्या चार्जेसशिवाय. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या पिनकोडसाठी या वेबसाईटवर कोणतीही अडचण आली नाही.

मला आलेला हा ऑनलाईन शॉपींगचा अनुभव मी आपणांपुढे मांडला आहे. असे अनुभव शेअर करण्यामुळे इतरांनाही त्याचा फायदा होऊ शकतो, किंवा इतरांना याबाबत काही वाईट अनुभव आले असल्यास आपणही सावध होऊ शकतो असे मला वाटते.

फेसबुक टाईमलाईन साठी जरा हटके कव्हर


तुमच्या फेसबुक वरील टाईमलाईन साठीचे तुमचे कव्हर जरा हटके असावे असे तुम्हाला वाटत असेल तर, या साईटचा उपयोग करुन पहा. या साईटवरील गेट स्टार्टेड या बटनावर क्लिक करुन तुमचे फेसबुक अकाउंट अॅक्सेस करायला परवानगी दिल्यावर, ही साईट तुमच्या प्रोफाईलमधील फोटो व तुमचे नांव यांचे वेगवेगळ्या प्रकारे मिक्सिंग केलेले अनेक नमुन्यांचे कव्हरचे प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवते. तर त्याखाली असलेला रिमिक्स फोटोज् हा पर्याय वापरुन फोटोमध्ये बदल करुन तुम्हाला हवं ते कॉम्विनेशनसुध्दा निवडता येईल. 


वेगवेगळे कॉम्बिनेशन्स पाहून एकदा तुम्ही तुम्हाला हवे असलेले कव्हर सिलेक्ट केले की मग, मेक माय कव्हर या बटनावर क्लिक करा. त्यानंतर ही साईट हे पेज आपोआप तुमच्या फेसबुक अकाउंटवर रिडायरेक्ट करेल. आता तुम्ही तुमच्या फेसबुक अकाऊंटवरील चेंज कव्हर या ड्रॉपडाऊन मेनूमधील चूज फ्रॉम फोटोज हा पर्याय निवडून हे जरा हटके असलेले कव्हर सेट करु शकता.