Home » Archives for December 2011
पर्सनल काँप्युटरवरचा डाटा आता शेअर करा कुठूनही!
कोणत्याही केबल जोड शिवाय आपल्या स्वतःच्या काँप्यूटरमधील ऑफीस फाईल्स, म्युझिक, व्हिडीओ इत्यादी डाटा दुसऱ्या काँप्यूटरमध्ये शेअर करता येईल काय? याचे उत्तर आता होय असेच द्यावे लागेल. कारण चेन्नई येथील लक्स अनंतरामन याने iTwin नावाची USB ड्राईव्हची जोडी बनविली असून त्याद्वारे केबलविना दोन काँप्यूटरमध्ये सुरक्षितरित्या डाटा शेअरींग करणे शक्य झाले आहे. यासाठी इतर कोणत्याही वेगळ्या सॉफ्टवेअरची आवश्यकता लागत नाही, मात्र इंटरनेट कनेक्टीव्हीटी आवश्यक आहे.