'रिमोट'मध्ये गडबड | आगळं! वेगळं !!!

'रिमोट'मध्ये गडबड

=> काळ्या पैशाचे होणार सर्वेक्षण; अर्थमंत्रालयाने सोपविली तीन प्रमुख संस्थांवर जबाबदारी
  • आमच्या आगामी 'सर्वेक्षणात' आम्ही विचारलेल्या प्रश्नांची 'खरीखुरी' उत्तरे द्यायची बरं का!
=> गुणवत्तेनुसार पोलिसांना पदोन्नती; त्रुटी लवकरच दूर करणार : आर.आर.पाटील


  • आत्तापर्यंत 'क्वालिटी'बाबत 'तडजोड' करण्यासाठीच 'त्रुटी' ठेवलेल्या होत्या की काय?
=> खापर कलमाडींच्या माथी; राष्ट्रकुल आयोजन समितीने केले हात वर
  • आयोजन समितीने 'खापरा'सह हात वर करायला आणि कलमाडींचे 'माथे' नेमके तिथेच वर असायला एकच गाठ पडली
=> राजकीय पक्षांना ठेवावे लागणार कंपन्यासारखे हिशोब
  • उदाहरणार्थ 'सत्यम' सारखे!
=> अतिरेकी अड्डे उध्वस्त करा : पंतप्रधानांचे पाकिस्तानला आवाहन
  • माफ करा! आम्ही अतिरेकी अड्डे, ओसामा, दाउद या प्रकारच्या कोणत्याही व्हरायटीज् ठेवत नाही
=> पंतप्रधान चांगले पण 'रिमोट'मध्ये गडबड : अण्णा हजारे
  • मग 'टीव्ही' कितीही 'चांगला' असून काय उपयोग?

0 Comments:

Post a Comment