निजानंद | आगळं! वेगळं !!!

निजानंद

पेशंट : डॉक्टर मी आपला फार आभारी आहे.
डॉक्टर : (आश्चर्याने) पण मी तर आपणास आजच पाहतोय, त्यामुळे मी तुम्हाला काही ट्रीटमेंट दिली आहे असे मला तरी आठवत नाही. मग माझे आभार कशासाठी?

पेशंट : अहो, आपण कवी आहात ना?
डॉक्टर : (काव्यरसिकाची भेट झाल्याच्या आनंदाने) हो, हो काही महिन्यापूर्वीच माझा कवितासंग्रह 'निजानंद' प्रसिद्ध झालेला आहे. तुम्ही तो वाचला वाटतं?
पेशंट : वाचला तर, आणि त्यामुळेच मी आपले आभार मानायला आलोय डॉक्टर साहेब
डॉक्टर : (आनंदाने उकळ्या फुटत) असं? आपल्याला इतक्या आवडल्या त्यातील कविता?
पेशंट : अहो, मला निद्रानाशाचा विकार जडला होता आणि कोणत्याही गोळ्यांची सवय लावून घ्यायची माझी अजिबात इच्छा नव्हती, तेव्हा माझ्या एका मित्राने यावरचा उपाय म्हणून तुमचे 'निजानंद' पुस्तक मला भेट दिले आणि रात्रीच्यावेळी वाचायला सांगितले. आणि काय चमत्कार घडला म्हणता? मी आपल्या पुस्तकातील कविता वाचायला घेताच काही क्षणातच मला चांगली झोप येते. आता माझा निद्रानाशाचा विकार पार नाहीसा झालाय. म्हणून आपले आभार!

0 Comments:

Post a Comment