प्रामाणिक दुधवाला भैय्या | आगळं! वेगळं !!!

प्रामाणिक दुधवाला भैय्या

मागील पाच-सहा दिवसापासून दुध पातळ येत असल्यामुळे मालतीबाई चिडलेल्या होत्या. पण रोज भैय्याला त्याबद्दल बोलायला सांगूनही पंत आणि मुले ही गोष्ट काही मनावर घेत नव्हते, त्यामुळे भैय्याला कुणीच काही सुनावत नसल्याने आज मालतीबाईंनी स्वतःच भैय्याला फैलावर घ्यायचे ठरविले होते.


दारावरची बेल वाजली तसे मालतीबाई दुधाचे भांडे घेवून दार उघडायला पुढे झाल्या. दार उघडले तर दारात दुधवाला भैय्याच होता. तसे मालतीबाईंनी भांड्यात दुध घेतले आणि पदर कमरेला खोचून म्हणाल्या, "काय रे भैय्या, मागच्या पाच-सहा दिवसापासून मी बघतेय तू दुध का पातळ वाढतोय? भाव वाढवताना आपलं काय ठरलं होतं ते विसरलास काय?"

"हा वो मुझे याद है मालकीन जी, आपके दो लिटर दुध में एक गिलास से जादा पानी नाही मिलाना है, और गंगा मैया की कसम मालकीन जी, आजतक तो हम आपके दुध में एक गिलास से जादा पानी नाही मिलावत है." भैय्या उत्तरला.

"एक ग्लासपेक्षा जास्त पाणी मिसळत नाही म्हणतो तर मग दुध कसं पातळ यायला लागलय? मी खोटं बोलते असं तुला म्हणायचय का?" मालतीबाई चिडल्या.

"अरे नाही नाही मालकीन जी, हम आपको झुठा नाही कहत है, हम तो आपके दो लिटर दुध में एक ही गिलास पानी मिलावत है, लेकिन ऊका का है मालकीन जी, आजकल भरोसा किसपर करना यह भी मुस्कील हुई गवा है." भैया

"आता तू अजून कुणाच्या भारोश्याबद्द्ल बोलतोयस?" मालतीबाई फणकारल्या.

"अब आपका का बताये मालकीन जी, मिलावट करने में ई ससुरे कार्पोरेसनवाले भी पिछे नाही रहे है, हमरे घर में जो पानी आवत है ना, ऊ भी अब पहलेसे बहुत पतला आवत है. ई ससुरे कार्पोरेसनवाले आजकल पानी में भी मिलावट करने लगे है." शेवटी भैय्याने आपल्या प्रामाणिकपणाचा पुरावा सादर केलाच.

0 Comments:

Post a Comment