काढा आतील कडी' | आगळं! वेगळं !!!

काढा आतील कडी'

=> तृणमूलला २२९ तर कॉंग्रेसला ६४ ऐवजी ६५; प. बंगाल मधील जागावाटपाबाबत समझोता
  • काय सांगता? चक्क एक जागा वाढवून मिळाली? 'आत्मसन्मान' म्हणतात तो हाच!
=> हजार रुपयांत ढोसा 'मरे' पर्यंत दारू! उत्पादन शुल्क विभागाचा हजार रुपयांत आजन्म मद्यप्राशनाचा परवाना
  • परवानाधारक 'मेल्या' नंतर 'वारस' नोंदीची 'प्रमोशनल स्कीम' नाही का?
=> गुढीपाडव्याच्या निमित्ता ने 'काढा मनातील अढी : अजितदादांची विरोधकांना टोलेबाजी
  • तर मग तुम्हीही 'काढा आतील कडी' असे विरोधकही म्हणाले असतीलच की!

3 Comments:

  1. माझ्या लहानश्या प्रयत्नाला आपण प्रतिसाद दिला त्या बद्दल मी आपला आभारी आहे .
    धन्यवाद

    ReplyDelete
  2. तुमची टोलेबाजी भारी असते, कुठे ही सभ्यतेला न सोडुन... अश्लीलतेकडे न झुकता मार्मिक टोले हाणता तुम्ही, ये दिल मांगे मोर!!!!

    ReplyDelete
  3. माराठीनेटभेटकट्टा, गुरुनाथजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार!
    महागाईने त्रस्त झालेल्या आणि सध्याच्या सामाजिक, राजकीय घटनांनी वैतागून गेलेल्या सर्वसामान्य माणसाला, सध्याच्या आहे त्याच परिस्थितीतील विसंगती शोधून त्यावर, त्यांच्याच मनात उमटत असलेल्या प्रतिक्रिया 'टोल्यांच्या' स्वरुपात प्रसिद्ध करून क्षणभर विरंगुळा मिळवून देणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे, हाच या 'टोलेबाजी' मागील उद्देश आहे. आणि जेव्हा आपणासारखे रसिक वाचक या प्रयत्नाला दाद देतात, तेव्हाच ही वाटचाल योग्य मार्गाने सुरु असल्याची जाणीव होते. आणि अर्थातच, उत्साह ही दुणावतो. पुन्हा एकवार धन्यवाद!

    ReplyDelete