आगळं! वेगळं!!! वर फोरमची सुरुवात
आजपासून "आगळं! वेगळं!!!" च्या वाचकांसाठीही 'चर्चा-पीठ' या फोरमची सुरुवात केली आहे. ''आगळं! वेगळं!!!'' च्या मेनूबार वरील FORUM या बटणावर क्लिक केले असता चर्चा-पीठ आपणासमोर येईल.
आपले या चर्चा-पीठात (चर्चा करून पीठ पडणारच आहे म्हणून चर्चा-पीठ हे नाव दिले आहे) स्वागत आहे. यातून काही विचारमंथन व्हावे हा यामागील हेतू आहे. चला तर मग सुरुवात करु या 'इंगजी शब्दांना मराठीत प्रतिशब्द सुचवा' या एका नव्या विषयाने.
आज मी काही इंगजी शब्दांना मराठीत प्रतिशब्द सुचवा' ह्या नविन विषयाने याची सुरुवात केली आहे. यात उपस्थीत केलेल्या इंग्रजी शब्दांना कोणते मराठी प्रतिशब्द वापरायचे याची चर्चा झाल्यास तुमच्या आणि माझ्याही ज्ञानात भरच पडेल.
चर्चेला उत्तर देण्यासाठी Reply या पर्यायाचा उपयोग करा. जर नविन विषयावर चर्चा सुरु करायची असेल तर, New Topic या पर्यायाचा उपयोग करा.
चर्चेला उत्तर देण्यासाठी Reply या पर्यायाचा उपयोग करा. जर नविन विषयावर चर्चा सुरु करायची असेल तर, New Topic या पर्यायाचा उपयोग करा.
आणि असेच काही ज्ञानवर्धक, मनोरंजक, माहितीपूर्ण चर्चेचे विषय आपणाकडूनही अपेक्षित आहेत.
या संबंधात श्री. नरेंद्र गोळे यांची एक अनुदिनी प्रसिद्ध होत असते, त्यात इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवले आहेत. ती खाली देत आहे.
ReplyDeleteमंगेश नाबर
http://shabdaparyay.blogspot.com/
खुप चांगली कल्पना आहे. आपण सर्वांनी ब्लॉगच्या ऎवजी ई- भाष्य कट्टा हा शब्द वापरला तर ? Blog Spot ला " ई-भाष्य कट्टा " हा अत्यंत समर्पक मराठी शब्द आहे अस माझं प्रामाणिक मत आहे. जगाची व्यवहार भाषा, संपर्क भाषा आपली माय मराठी व्हावी असं स्वप्न मी जागेपणीच पाहात आहे.
ReplyDeleteमैत्रेय १९६४
http://maitrey1964.blogspot.com
mannb, मैत्रेय१९६४, आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार!
ReplyDelete