ब्लॉगपोस्टच्या खाली सही कशी कराल?
ब्लॉगवरील प्रत्येक पोस्टच्या खाली आपली मस्त वळणदार सही असल्यास कशी दिसेल? अर्थातच चांगलीच दिसणार. तुम्हालासुद्धा तुमची सही ब्लॉगपोस्टच्या खाली करता येऊ शकते.
त्यासाठी तुम्हाला आधी तुमची सही तयार करून त्याची इमेज अपलोड करावी लागेल. ऑनलाईन सही तयार करण्यासाठी बऱ्याच वेबसाईट आहेत. त्यापैकी आपण http://www.mylivesignature.com/ ही वेबसाईट बघू. सही करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचे पर्याय येथे उपलब्ध आहेत. त्यापैकी Using the signature wizard या मोफत पर्यायाचाच येथे आपण विचार केला आहे.
१. येथे तुमचे नाव टाईप करा. यात जास्तीतजास्त २५ अक्षरापर्यंतचे नाव टाईप करता येते.
२. १०० हून अधिक वळणदार इंग्रजी भाषेतील फॉन्ट येथे उपलब्ध आहेत, या फॉन्टमधून तुम्हाला हवा तो फॉन्ट निवडा.
३. त्यासाठी साईज, रंग आणि तीरपेपणासुद्धा निवडण्याची सोय आहे.
४. ही सही आपल्या संगणकावर डाऊनलोड करून घ्या.
५. पिकासा किंवा तत्सम वेबसाईटवर अपलोड करून त्याची इमेज लिंक कॉपी करा.
६. ही लिंक तुम्ही goo.gl किंवा bit.ly अशा साईटवरून शॉर्ट करुन घेऊ शकता.
ही झाली तुमची सही तयार.
१. आता ब्लॉगच्या डॅशबोर्डवरून तुमच्या ब्लॉगवरील Design मधून Edit HTML पर्याय निवडा.
२. Expand Widget Templates या चौकटीत बरोबरची खूण करा.
३. Ctrl+F च्या सहाय्याने
post-footer-line post-footer-line-1
किंवा
<p class='post-footer-line post-footer-line-1>
किंवा
<div class='post-footer-line post-footer-line-1'>
यापैकी कोणताही एक कोड शोधा
४. या कोडच्या खाली
<img src='IMAGE URL' style='border: none; background: transparent;' /><br/>
हा कोड टाका. हा कोड असा दिसेल
५. यातील IMAGE URL या ठिकाणी तुमच्या सहीच्या इमेजची लिंक टाका.
६. प्रिव्ह्यू पहा.
७. सेव्ह करा.
0 Comments:
Post a Comment