गाडीत पेट्रोल भरितां नाम घ्या सरकारचे
=> पेट्रोल महागले, आजपासून लिटरमागे अडीच रुपये दरवाढ; सहा महिन्यात सहा झटके
- गाडीत पेट्रोल भरितां नाम घ्या सरकारचे, सुसह्य जगणे होते नाम घेता मनमोहनाचे, विरोधक करीती टीका, तरी सत्ता भोगू ही पूर्णटर्म, पेट्रोल दरवाढ नोहे जाणिजे संक्रांतीचे गोड मर्म (जय जय सोनिया गांधी समर्थ)
=> रामानंद तिवारी राज्यपालांना भेटणार; बिनचूक कारवाईची राजभवनाची तयारी
- जरा होशियारीसे, कहीं निशाना चूँक न जाये
=> आघाडीच्या राजकारणावरून कॉंग्रेसची कसरत; मुख्यमंत्र्यांनीही निर्णय प्रक्रियेतील अडचणीवर ठेवले बोट
- हे तर 'गजर' बंद करण्यासाठी घड्याळावर ठेवलेले (राहुल बाबाच्या) हाताचे बोट
=> नको म्हणाल एवढी वीज दोन वर्षात मिळेल; केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांची माहिती
- आम्ही तर आत्ता सुद्धा नको नकोच म्हणतोय!
मस्त खुप छान आहे तुमची टोलेबाजी.
ReplyDelete