ब्लॉगच्या हेडरमध्ये बॅनर कसे लावावे? | आगळं! वेगळं !!!

ब्लॉगच्या हेडरमध्ये बॅनर कसे लावावे?



ब्लॉगच्या हेडरमध्ये लावलेली बॅनर प्रकारातील जाहिरात पटकन्‌ वाचकांच्या नजरेत भरते. अ‍ॅडसेन्स रेडी प्रकारच्या ब्लॉग टेम्प्लेटमध्ये अशी जाहिरात करण्याची सोय आधीच असते. पण जर अशी सोय नसेल तरीही ब्लॉगच्या हेडरमध्ये बॅनर जाहिरात कशी करावी हे आपण पाहू.


१. ब्लॉगच्या डॅशबोर्डमधून डिझाईनवर क्लिक करा.
२.  Edit HTML पर्याय निवडा.
३. महत्त्वाचे : सर्वप्रथम आपल्या ब्लॉगच्या टेम्प्लेटचा बॅकअप् घ्या.
४. आता Expand Widget Templates हा बॉक्स चेक करा.
५. CTRL + F च्या सहाय्याने सर्च बॉक्स मध्ये <b:includable id='main'> हा कोड टाकून सर्च करा.
६. आता खालील कोड <b:includable id='main'> च्या खाली आणि <b:if cond='data:useImage'> च्या वर अशाप्रकारे दोन्हीच्या मध्ये टाका.


<div class='ads'>PLACE YOUR BANNER CODE HERE </div>
</div>

७. याप्रमाणे कोड बरोबर टाकल्याची खात्री केल्यानंतर स्क्रोलिंग करून ]]></b:skin> ही लाईन शोधा.
८. आता बरोबर या लाईनच्या आधी खालील लाईन टाका.

/* Header Banner
----------------------------------------------- */
#header .ads{width:480px; height:80px; float:right; padding:20px 0px 0px 0px}

९. सेव्ह करा.
१०. PLACE YOUR BANNER CODE HERE च्या ठिकाणी तुम्हाला जी जाहिरात करायची आहे, त्याचा कोड टाका.
११. आता तुमच्या ब्लॉगच्या हेडरमध्ये बॅनर प्रकारातील जाहिरात दिसू लागेल.

5 Comments:

  1. Blog la read more kase jodave yavishayi madat kara
    kedar
    www.mahapooja.co.cc

    ReplyDelete
  2. ब्लॉगचा पेज लोड स्पीड कसा वाढवाल? हा लेख वाचा.

    ReplyDelete
  3. tumhi mala mazya blogchya var menu bar ksa add karava ya baddal sangu shakal ka pls

    ReplyDelete
  4. ब्लॉग साठी कोणते domaine योग्य राहील

    ReplyDelete
    Replies
    1. .com ठीक राहिल, पण तरीही आपल्या आवडीनुसार व बजेटनुसार कोणतेही निवडू शकता.

      Delete