डोमेन नेम विकत घेताना...भाग २
आता हा फायद्या-तोट्याचा विचार जरी बरोबर असला तरी, आपल्याला पाहिजे असलेले नाव जर .com मध्ये उपलब्धच नसेल तर किंवा आपली गरज जर .in चीच असेल तर त्याप्रमाणेच डोमेन नेम खरेदी करणे भाग आहे. अशावेळी फायदा-तोटा दुर्लक्षित करावा लागेल.
तसेच डोमेन नेम विकत घेताना आपल्याला पेमेंट कोणत्या पद्धतीने करायचे आहे आणि तशी सोय त्या कंपनीकडे आहे का तेही तपासून पहाणे गरजेचे आहे.
म्हणजे समजा तुमच्याकडे ऑनलाईन खरेदीसाठी कोणत्याही डेबिट/क्रेडीट प्रकारचे कार्ड नसेल आणि तुम्हाला ही खरेदी ऑफलाईन पद्धतीने करायची असेल तर त्यासाठी त्या कंपनीकडे कोणकोणते ऑफलाईन पेमेंटचे पर्याय उपलब्ध आहेत हे बघावे लागतील.
उदा. डायरेक्ट बँक डीपॉझीट, चेक, डीडी, मनीऑर्डर इ. पैकी डायरेक्ट बँक डीपॉझीट हा पर्याय बिनखर्चाचा ठरतो. त्या कंपनीच्या बँक अकाऊंटमध्ये रोख पैसे जमा करून त्यांना तसे कळविले की, ते अकाऊंट चेक करून पैसे जमा झाल्याची खात्री करतात आणि त्वरित पुढची कार्यवाही सुरु होते. माझ्या माहितीप्रमाणे हीच एक बिनखर्चाची, झटपट आणि सुरक्षित पध्दत आहे. (क्रेडीट किंवा तत्सम कार्ड वापरून ऑनलाईन खरेदी करताना धोका अधिक असू शकतो हे कुणीही नाकारणार नाही.)
अजून एका गोष्टींचा विचार करावा असे माझे मत आहे, ती म्हणजे आपण डोमेन नेम ज्या कंपनीकडून घेणार आहोत त्या कंपनीचे कार्यालय कुठे आहे? म्हणजे भविष्यात काही अडचण आल्यास किंवा समक्ष भेटण्याची पाळी आल्याससुद्धा ते सोयीस्कर असावे. म्हणजे याचे उदाहरण असे की, जर तुम्ही महाराष्ट्रात रहात असाल तर तुम्हाला मुंबईची कंपनी सोईस्कर पडेल की दिल्ली, हरियाणाची? याचा विचार करावा. शिवाय असे करण्यामुळे तुम्हाला स्थानिक भाषेतसुद्धा सपोर्ट मिळतो.
तुम्हाला डोमेन नेम खरेदीची आवश्यकता असेल तेव्हा इंटरनेटवर सर्च करून याबाबतची माहिती मिळू शकते. तरीही माझ्या माहितीप्रमाणे 'बिग रॉक' ही कंपनी आपल्या निकषात बसू शकते. या कंपनीकडे ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पेमेंटचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. ही कंपनी मुंबई मध्ये आहे, आणि आपण त्यांना मराठीतून ईमेल करून मराठीतून माहिती व सपोर्टची मागणी केल्यास आपल्याशी मराठीतून संपर्क साधला जातो.
शेवटी सांगायचं इतकचं की, डोमेन नेम खरेदीपूर्वी काळजीपूर्वक व विचाराअंती निर्णय घ्या. आपल्या मनात जर काही शंका असतील तर संबंधित कंपनीकडून त्यांचे निरसन करून घ्या, आणि मगच खरेदी करा.
एक महत्वाची सूचना : मोफत म्हणून जाहिरात केले जाणारे .co.cc हे डोमेन नेम नसून सब-डोमेन आहे. आणि ते कायम स्वरूपी मोफत मिळेलच याची खात्री नाही, याची नोंद घ्यावी. आणखी एक महत्वाचे म्हणजे आपण जर "गुगल अॅडसेन्स" मिळण्याच्या दृष्टीने डोमेन नेम घेणार असाल तर गुगल अॅडसेन्स अशा सब-डोमेनला मान्यता देत नाही हे लक्षात घ्यावे.
अधिक माहितीसाठी या domrev फोरमवरील “Is “co.cc”domain name FREE forever or just free for one year? याविषयीची चर्चा वाचा. त्या चर्चेतील एक टिप्पणी खालीलप्रमाणे :
yourname.co.cc is not a real domain name, it is called a sub-domain. The “co” is the domain name under the “.cc” tld. Now, none of these can guarantee free forever because they rely on advertisements to stay in business. If the ads are not making enough money they’ll go out of business unless they charge more money. There have been many similar services that have gone under without any notice. Now if stability is important you may want to spend $10 to get a real .com domain name.
यापूर्वीचा लेख डोमेन नेम विकत घेताना...भाग १ वाचा.
यामधे वेब होस्टींग काय असते याची महिती मिळेल का ??
ReplyDeleteआणि १ दा डोमेन घेतल्यावर दर वर्षाची रक्कम सोडुन आनखी काही खर्च असतो का ??
१. आपली वेबसाईट वेबहोस्टींग करणाऱ्या कंपनीमार्फत इंटरनेटवर प्रदर्शित करणे, ही चार्जेबल सर्विस असते. परंतु याचा विचार करण्याची गरज नाही. ऑलरेडी आपला ब्लॉग गुगलच्या वेबहोस्टींग सर्विसमार्फत इंटरनेटवर मोफत प्रदर्शित होतच असतो.
ReplyDelete२. डोमेन नेमसाठी दरवर्षी रिन्युअल फी सोडून इतर खर्च नाही.