January 2011 | आगळं! वेगळं !!!

हरवले सापडलेसाठी वेबसाईट

जेव्हा आपले किंवा कुणा इतरांचे वाहन अथवा व्यक्ती हरविल्याचा प्रसंग येतो, तेव्हा काय करावे हे लवकर न सुचणे स्वाभाविकच आहे. अशावेळी एकदम गांगरून न जाता धीर धरावा. आणि हरविलेल्या वाहनांचा किंवा व्यक्तींचा शोध घेण्यासाठी किंवा अशा हरविलेल्या अथवा सापडलेल्या व्यक्ती व वाहनांची माहिती नोंद करण्यासाठी भारत लॉस्ट अँड फाउंड डॉट कॉम ही एक वेबसाईट आपल्या मदतीसाठी उपलब्ध आहे याची आठवण ठेवावी.

मोबाईल कॉल दर वाढणार?

=> एफआयआरमध्ये अशोक चव्हाणांचे नाव; पण आरोपी नाही : आदर्श घोटाळा
  • या तत्वावर तर आमचीही नावे चालली असती की! : सर्व माजी मुख्यमंत्री

ब्लॉगसाठी अ‍ॅनिमेटेड घड्याळ




आपल्या ब्लॉगसाठी एक नविन ‍अ‍ॅनिमेटेड घड्याळ. यात आहे तारीख, वार, महिना, साल आणि तास, मिनिट व सेकंद म्हणजे सगळे काही. आणि यावर आपण जसा माउस फिरवाल तसे हे घड्याळ हालचाल करते. शिवाय हे घड्याळ चालू आणि बंद करण्यासाठी बटन सुद्धा आहे.

फायरफॉक्स ब्राऊजरसाठी मराठी अ‍ॅड ऑन

आपण जर फायरफॉक्स ब्राऊजर वापरत असाल तर, मराठीतून शुद्धलेखन तपासण्यासाठी (Spell Checking) मराठी डिक्शनरी ९.१ ही एक उत्तम अ‍ॅड ऑन सुविधा आपणासाठी उपलब्ध आहे.

क्रूरतेची परिसीमा

यशवंत सोनावणे, अप्पर जिल्हाधिकारी, मालेगाव यांची जिवंत जाळून हत्या. काल दुपारी विविध चॅनेल्सवर ही बातमी ऐकून आणि पाहून डोकं सुन्न झालं. आपला देश आज ६२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. आणि त्याच्या एक दिवस आधी ही अमानुष घटना घडतेय. हे किती दुर्देवी आणि लाजिरवाणे आहे.

यशवंत सोनावणे यांना हे मरण मिळालं ते त्यांच्या प्रामाणिकपणाच्या मोबदल्यात. त्यांना त्यांचा केवळ प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षपणाच नडला. जर त्यांनी 'तोडपाणी' केले असते तर त्यांना जीव गमवावा लागला नसता हे तर उघड सत्य आहे.

वरातीमागून घोडे

=> राष्टकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीच्या अध्यक्षपदावरून कलमाडींची हकालपट्टी
  • वरातीमागून घोडे!

ही तो पक्ष्याध्यक्षांची इच्छा

=> काळ्या पैशांच्या माहितीसाठी २०१२ पर्यंत प्रतीक्षा करा : स्विझर्लंडचा एक वरिष्ठ अधिकारी
  • 'जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा' : काळा

ब्लॉगवरील पोस्ट्स ट्विटरवर आणि फेसबुकवर आपोआप कशा प्रसिद्ध कराव्यात?


मी ब्लॉग सुरु केल्यापासून माझ्या ब्लॉगवरील पोस्ट्स ट्विटरवर आणि फेसबुकवर काही प्रसिद्ध होत नव्हत्या. आणि त्या आपोआप कशा प्रसिद्ध करायच्या याचीही मला कल्पना नव्हती. मग पुढे काही दिवसांनी गुगल फीड मध्ये Socialize एक नावाचा पर्याय यासाठी उपलब्ध आहे असं माझ्या लक्षात आलं.

डिझेल दरवाढीचा विचार नाही

=> रामानंद तिवारी अखेर निलंबित; आदर्श प्रकरण भोवले
  • लाला झाले, तिवारी गेले, बाकीच्यांचे काय?
=> परदेशी बँक खात्यांचा तपशील देता येणार नाही : पंतप्रधान
  • या खातेदारांच्या नावांची गुप्तता बाळगण्यास सरकार शेवटपर्यंत कटिबद्ध आहे !
=> डिझेल दरवाढीचा विचार नाही : पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी
  • तूर्त तरी नाही, आत्ताच तर कार्यभार स्वीकारलाय

देशभरात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सुरु

लवकरच येणार, आता सुरु होणार असा गाजावाजा करणाऱ्या मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवेला आज एकदाचा मुहूर्त लागला. काही ना काही तरी सबबी पुढे करून सतत वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यामुळे ही उशीरा सुरु झालेली  सेवा सर्वाच्याच चर्चेचा विषय ठरली होती.

या सेवेमुळे आता केवळ सध्याचा क्रमांक बदलू नये म्हणून नाईलाजाने त्याच ऑपरेटरची सेवा वापरण्याचे दिवस गेले. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवेमुळे ग्राहकांना मोबाईल ऑपरेटर बदलण्याच्या अधिकार व संधी प्राप्त झाली आहे. आता ग्राहकांना त्यांचा सध्याचा असलेला क्रमांक कायम ठेवून हवा तो मोबाईल ऑपरेटर निवडण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाल्याने एक प्रकारे मोबाईल ऑपरेटर्सची एकाधिकारशाही व मनमानी समाप्त झाली असे म्हणायला हरकत नाही.

'टू-जी' पाठोपाठ आता 'कोल ब्लॉक' महाघोटाळा

=> केंद्रीय मंत्रिमंडळात आज मोठे फेरबदल काही मंत्र्यांना वगळणार
  • चला निदान आज तरी डोक्यावरचं 'अवजड' ओझं कमी होईल असं काहींना वाटतयं

'अभ्यास' हा शासनाचा आवडता उपक्रम

=> स्वीस बँकेतील खात्यांची माहिती 'विकीलीक्स' कडे; २००० नावांची यादी जाहीर होणार
  • आता हा 'विकी' कुणाकुणाला 'क्लिक' करून 'लिक' करणार बरे? आम्ही तर अस्वस्थ झालोय.

मिळून सारेजण

=> भ्रष्टाचाराचा 'आदर्श' जमीनदोस्त करा : पर्यावरण मंत्रालयाकडून इमारत पाडण्याची शिफारस
  • पण जयरामजी आम्हाला 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' याच तत्वाची सवय आहे.

गाडीत पेट्रोल भरितां नाम घ्या सरकारचे

=> पेट्रोल महागले, आजपासून लिटरमागे अडीच रुपये दरवाढ; सहा महिन्यात सहा झटके
  • गाडीत पेट्रोल भरितां नाम घ्या सरकारचे, सुसह्य जगणे होते नाम घेता मनमोहनाचे, विरोधक करीती टीका, तरी सत्ता भोगू ही पूर्णटर्म, पेट्रोल दरवाढ नोहे जाणिजे संक्रांतीचे गोड मर्म (जय जय सोनिया गांधी समर्थ)

भारत सरकार गुप्ततेच्या बाबत अधिक दक्ष

=> आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयातील लीपिकाला बदडले; मंत्रालय कर्मचाऱ्यांनी केला निषेध
  • आता पोलिसांनी बच्चू कडूंना पोलीस स्टेशनमध्ये पाऊण तास बसवून ठेवून नंतर बेदम मारहाण करायला ते मनसेचे हर्षवर्धन जाधव थोडेच आहेत?

महागाई हे संपन्नतेचे प्रतिक

=> मौका सभी को मिलता है : राज ठाकरे
  • 'राज' से दुश्मनी बहुत महेंगी पडेगी आरार, याद रखना

ब्लॉगचा पेज लोड स्पीड कसा वाढवाल?

आपल्या ब्लॉगचे पेज लोड होण्यास लागणाऱ्या वेळेकडे आणि वेगाकडे आपण कधीतरी लक्ष दिले आहे का? नसल्यास या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही दुर्लक्षिली जाणारी गोष्टच वाचकांवर बरा किंवा वाईट प्रभाव टाकत असते.

ब्लॉगच्या हेडरमध्ये बॅनर कसे लावावे?



ब्लॉगच्या हेडरमध्ये लावलेली बॅनर प्रकारातील जाहिरात पटकन्‌ वाचकांच्या नजरेत भरते. अ‍ॅडसेन्स रेडी प्रकारच्या ब्लॉग टेम्प्लेटमध्ये अशी जाहिरात करण्याची सोय आधीच असते. पण जर अशी सोय नसेल तरीही ब्लॉगच्या हेडरमध्ये बॅनर जाहिरात कशी करावी हे आपण पाहू.

सोने व्यापाऱ्यांच्या खात्यावर 'नजर'

=> सोने व्यापाऱ्यांच्या खात्यावर 'नजर'; 'काळा' पैसा असल्याची शक्यता : रिझर्व बँकेची वाणिज्यिक बँकांना सूचना
  • 'नजर' लागू नये म्हणूनच 'काळं' वापरण्याची प्रथा आहे, हे बहुधा रिझर्व बँकेला माहिती नसावं.

डोमेन नेम विकत घेताना...भाग २


आता हा फायद्या-तोट्याचा विचार जरी बरोबर असला तरी, आपल्याला पाहिजे असलेले नाव जर .com मध्ये उपलब्धच नसेल तर किंवा आपली गरज जर .in चीच असेल तर त्याप्रमाणेच डोमेन नेम खरेदी करणे भाग आहे. अशावेळी फायदा-तोटा दुर्लक्षित करावा लागेल.


डोमेन नेम विकत घेताना...भाग १

हल्ली कशाकशाचा सेल सुरु असेल ते सांगता येत नाही, कारण सध्या डोमेन नेम्सचा ही सेल सुरु आहे. अगदी ९९ रुपया पासून तुम्हाला या सेलमध्ये .in, .co.in अशा प्रकारची डोमेन नेम्स उपलब्ध होतील. त्यामुळे साहजिकच फक्त शंभर रुपयात तर डोमेन नेम रजिस्ट्रेशन होतंय तर मग काय हरकत आहे. चला आपली स्वतःची एक वेबसाईट चालू करून टाकू किंवा आपल्या ब्लॉगसाठी एक डोमेन नेम घेऊन टाकू असे विचार मनात डोकावणे साहजिकच आहेत.

ब्लॉगवर 'ताज्या प्रतिक्रिया' (Recent Comments) कशा दर्शवाव्यात?

तुम्हाला जर तुमच्या ब्लॉगवर जर 'ताज्या प्रतिक्रिया' (Recent Comments) दाखवायच्या असतील तर, एका फार सोप्या पद्धतीने तुम्ही त्या दाखवू शकता.

१. प्रथम डॅशबोर्ड मधून Design -> Page Elements हा पर्याय निवडा.

मराठी ब्लॉग्स डिरेक्टरी

सध्या मराठी ब्लॉग्जची नोंदणी करणारी मराठी ब्लॉग विश्व, मराठीसूची, मराठी मंडळी, मराठी ब्लॉग जगत, ब्लॉगकट्टा नेटभेट ही संकेतस्थळे तर सर्वपरिचित आहेतच, पण आणखीन एक 'मराठी ब्लॉग्स डिरेक्टरी' या नावाचे बऱ्याच लोकांना फारसे माहित नसलेले एक मराठी ब्लॉगची नोंदणी करणारे संकेतस्थळ सुरु झालेले माझ्या पाहण्यात आले आहे.

ब्लॉगच्या मुखपृष्ठावर लेखांची फक्त शीर्षकेच कशी दाखवावीत?

ब्लॉगच्या मुखपृष्ठावर सर्वसाधारणपणे नेहमी लेखाचे शीर्षक, चित्रे व मजकूर असे चित्र  वाचकांना दिसत असते.

पण त्याऐवजी ब्लॉगच्या मुखपृष्ठावर लेखांची फक्त शीर्षकेच (Links Only) कशी दाखविता येतील ते आज आपण या लेखात पहाणार आहोत.

गुगलच्या अ‍ॅडसेन्ससाठी प्रयत्न करताय?

जर तुमचा मराठी ब्लॉग असेल, आणि तुम्ही जर त्यावर जाहिराती मिळाव्यात म्हणून गुगलच्या अ‍ॅडसेन्ससाठी प्रयत्न करत असाल तर गुगलच्या अ‍ॅडसेन्स संदर्भातील काही धोरणांची माहिती होण्यासाठी हा लेख अवश्य वाचावा.

न्याय व्यवस्था; इंडियन स्टाईल

=> पंतप्रधानांनी 'लोकलेखा'पुढे जाण्याची गरज नाही : प्रणव मुखर्जी
  • 'वजीर' बोले 'प्रजा' मान डोले; काय करता? विलाजच नाही.

तुमच्या ब्लॉगच्या टेम्प्लेटचे डिझाईन तुम्ही स्वतःच करा

तुमच्या ब्लॉगसाठी तुम्ही अनेक टेम्प्लेट पहिल्या असतील, त्यातील काही वापरल्या असतील. पण असे करताना तुम्हाला प्रत्येक टेम्प्लेटमध्ये काही गोष्टी पाहिजे होत्या अथवा नको होत्या असे वाटलेही असेल, पण प्रोग्रामिंग लँग्वेजेसची माहिती नसणाऱ्या नविन ब्लॉगर्सना असे काही बदल करणे शक्य नाही. पण म्हणून त्यांनी नाराज होण्याचे कारण नाही.

स्वागत नव्या वर्षाचे...

 
आपणांस नविन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा!


- रमण कारंजकर