2011 | आगळं! वेगळं !!!

आकाश टॅब्लेट पीसी रु.2500 मध्ये उपलब्ध

बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असा सर्वांनाच उत्सुकता असलेला आकाश टॅब्लेट पीसी आता केवळ रु.2500/- मध्ये उपलब्ध झाला आहे.

पर्सनल काँप्युटरवरचा डाटा आता शेअर करा कुठूनही!

कोणत्याही केबल जोड शिवाय आपल्या स्वतःच्या काँप्यूटरमधील ऑफीस फाईल्स, म्युझिक, व्हिडीओ इत्यादी डाटा दुसऱ्या काँप्यूटरमध्ये शेअर करता येईल काय? याचे उत्तर आता होय असेच द्यावे लागेल. कारण चेन्नई येथील लक्स अनंतरामन याने iTwin नावाची USB ड्राईव्हची जोडी बनविली असून त्याद्वारे केबलविना दोन काँप्यूटरमध्ये सुरक्षितरित्या डाटा शेअरींग करणे शक्य झाले आहे. यासाठी इतर कोणत्याही वेगळ्या  सॉफ्टवेअरची आवश्यकता लागत नाही, मात्र इंटरनेट कनेक्टीव्हीटी आवश्यक आहे.

हात आणि घड्याळाचं जमलं!

=> साखरेचे दर पुन्हा कडाडले; प्रतिक्विंटल १०० रुपयांची वाढ
  • वाईट वाटून घेऊ नका; आम्ही पेट्रोल किती 'प्रचंड' स्वस्त केले त्याची आठवण करा!
=> अभिनेत्री काजोल आता अँकारिंग करणार
  • उतरत्या लोकप्रियतेला छोट्या पडद्याचा आधार!
=> हात आणि घड्याळाचं जमलं! महापालिका निवडणुकासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी; जागावाटप स्थानिक पातळीवर
  • आता घड्याळ हातावर बसणार की घड्याळाचा 'गजर' हात बंद करणार?

गांधीवादाची 'प्रॅक्टिकल' परीक्षा

=> आघाडीत पुन्हा कडाडली वीज; ऊर्जामंत्र्यांना टाळून कॉंग्रेसचे 'सीएम'ना साकडे
  • सर्वसामान्यांच्या घरात अंधार केल्यावर 'कडाडून' प्रकाश पाडायला नको का?
=> पंतप्रधानांच्या पत्राची दखल का नाही? सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले
  • आम्हाला वाटलं नेहमीप्रमाणे 'टोपली'म्हणून...
=> हल्ल्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा : अण्णा हजारे
  • गांधीवादाची 'प्रॅक्टिकल' परीक्षा

'पट' की 'चित'

=> आता व्यवस्थाच बदलायला हवी : लालकृष्ण अडवाणी
  • व्यवस्था नवीन पण कामकाज जुनेच
=> भाजपविषयी नरमाई का? खुल्या पत्रातून दिग्विजयसिंह यांचा अण्णा हजारेंना सवाल
  • 'नरम' 'गरम' धोरण 'तपासणी तज्ञ' दिग्विजयसिंह
=> 'पत' राखण्यासाठी 'पट' दडपला; शिक्षण खात्याकडून पडताळणी अहवालाचे आज सादरीकरण
  • आज होणार फैसला 'पट' की 'चित'

"आगळं! वेगळं!!!"ची वर्षपूर्ती

आज माझ्या "आगळं! वेगळं!!!" या ब्लॉगला १ वर्ष पूर्ण झालं. बरोबर १ वर्षांपूर्वी म्हणजे ३१ ऑगस्ट २०१० रोजी मी हा ब्लॉग सुरु केला. मी ज्यावेळी ब्लॉग सुरु केला त्यावेळी मी ही ब्लॉगबाबतच्या प्रत्येक बाबीविषयी नवखाच होतो. जिज्ञासेने प्रत्येक गोष्ट जाणून घेत प्रगती करत राहिलो. कोणतीही व्यक्ती आयुष्यभर विद्यार्थीच असते, असे मी मानतो. अजूनही शिकण्यासारखे पुष्कळ काही आहे, त्यामुळे अजूनही विद्यार्थी होऊन शिकतच राहायचे आहे.

भारताच्या ६५ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आता कुठे आहेत युवराज?

मंगळवार दि.९ ऑगस्ट २०११ रोजी म्हणजेच क्रांतीदिनी मावळ भागातील जलवाहिनीवरून एक्सप्रेस हायवेवर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार करत तीन आंदोलकांना टिपले. क्रांतिदिनाचे हे दुर्दैव म्हणायचे. या ठार झालेल्या आंदोलकांना सर्वप्रथम श्रध्दांजली!

भारताची 'पत'ही धोक्यात

=> अमेरिकेला सर्दी, जगाला शिंका; सर्व शेअर बाजार आपटले; भारतात पाच कोटींचा फटका
  • अखेर अमेरिका 'गारठली'

'कॅग'चा अहवाल संसदेत सादर


=> संसदेला तुमची गरज नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा कलमाडींना दणका, १ लाखाचा दंड

  • पण मला संसदेची आहे ना... 

अण्णांचे आंदोलन भरकटणार तर नाही?

सोळा ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या अण्णांच्या उपोषणाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. आणि विविध प्रसारमाध्यमातून आपण ती पहात आहोत. या सर्व चर्चेतून वारंवार अण्णांचे हे आंदोलन 'भरकट'णार तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. या चर्चेत सहभागी होणारी तज्ञ, विचारवंत मंडळी हे आंदोलन चुकीच्या मार्गाने जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करताहेत.

रुतला विकासाचा गाडा

=> अधिवेशनापूर्वीच खडाजंगी, भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान आक्रमक
  • कुणाच्या भ्रष्टाचाराबाबत? भाजपच्या...?

नारळाची बर्फी

=> पाक परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार प्रसारमाध्यमांच्या 'फॅशन आयकॉन' म्हणून केलेल्या उल्लेखामुळे अस्वस्थ
  • हाय रब्बा! हिंदुस्थान में मैं क्या करने आई थी, यह भी मुझे नही याद आ रहा है

संतशिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे चरणी विनम्र अभिवादन!

 
 
नाचू कीर्तनाचे रंगी
ज्ञानदीप लाऊ जगी

असा भक्तिचा संदेश देत भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतभर फडकविण्याचे अलौकिक कार्य करणाऱ्या संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांची आज (आषाढ कृष्ण १४) ६६१ वी पुण्यतिथी. त्यानिमित्त संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन!

इतरवेळी संतशिरोमणी श्री नामदेव महाराजांच्या साहित्यातील उतारे, अभंग रचना विविध प्रसंगी आपल्या लेखात उधृत करणाऱ्या 'प्रिंट मिडीयाला' दरवर्षी या पुण्यतिथीचा विसर पडतो, हे दुर्दैव!

ऑफ सिझन डिस्काऊंट

=> भ्रष्टाचाराच्या खाणीत येडीयुरप्पा; लोकायुक्तांच्या अहवालात ठपका
  • भ्रष्टाचार के इस सफर में, तू अकेला ही नहीं है, हम भी तेरे हमसफर हैं...

'अर्धे' भारतीय

=> मुंबई बॉम्बस्फोट तपासाबाबत स्कॉटलंड यार्डची मदत घेणार : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
  • फक्त दिग्विजयसिंह याचीच मदत पुरेशी होईल

काँगेसचा दिग्गीराजा तो 'बाब्या'

काँगेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह उर्फ दिग्गीराजा पुन्हा बरळले. अर्थातच ते नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला निशाना बनविण्यास चुकले नाहीत. त्यांचीही मजबुरी असेल कदाचित्‌! हायकमांडला खुश करण्यासाठी काय काय करावे लागते, त्याचा समृद्ध अनुभव त्यांच्या पाठीशी आणि गाठीशी आहेच.

वृत्तवाहिन्यांचे भान सुटले

अलीकडे टीआरपी वाढविण्याच्या हव्यासापोटी विविध वृत्तवाहिन्या आपले तारतम्य सोडून बातम्या दाखवत आहेत असे दिसते. आणि विशेषतः जेव्हा कधी मुंबईवर अतिरेकी हल्ले किंवा बॉम्बस्फोट होतात तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवते. या नादात वृत्तवाहिन्या आपणच 'गुप्तचर' असल्याच्या अविर्भावात, (जेव्हा की तपासयंत्रणा अजून घटनास्थळावरून सॅम्पल गोळा करत होत्या, त्यानंतर त्यांची तपासणी होऊन त्याचे निष्कर्ष जाहीर होणार त्याआधीच) स्फोटके कोणती वापरली गेली, या बॉम्बस्फोटामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे फक्त आपल्यालाच 'कळले' अशा थाटात बातम्या दाखवताना दिसत होत्या.

बॉम्बस्फोट आणि मुंबईकर

१३ जुलै २०११ रोजी सायंकाळी मुंबईत ३ ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाने, मुंबई सुरक्षित आहे हे राज्य सरकारने वेळोवेळी केलेले दावे फोल ठरवले आहेत. आणि मुंबईकर आजही असुरक्षित आहेत हे पुन्हा एकवार अधोरेखित झाले आहे.

बॉम्बस्फोट करण्यासाठी लागणारी स्फोटके आणि इतर साधनसामग्री मुंबईची सुरक्षाव्यवस्था भेदून अतिरेकी पार आतपर्यंत घेऊन येऊ शकतात ही एकच गोष्ट सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यास पुरेशी आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही दाव्यावर मुंबईकरांनी विसंबून रहाण्याचे कारण नाही.

मंत्री व्हायचेच कशाला?

=> महाराष्ट्राचे पंख कापले; गुरुदास कामत यांचा 'नाराजीनामा'
  • केंद्रीय नेतृत्वाला निदान एक तरी 'गुरु' भेटला

दिग्विजयसिंह यांची मुक्ताफळे

=> पाच किलोमीटर धावा आणि पोलीस व्हा! भरतीचे निकष बदलले; तोंडी परीक्षा झाली बंद
  • नवा निकष : प्राप्त परिस्थितीला 'तोंड' न देता 'पळता' येणे आवश्यक

भूमी अधिग्रहण कायदा

=> मंत्रीमंडळ फेरबदलाबाबत सोनिया, मनमोहनसिंग चर्चा; द्रमुककडून नावे न देण्याचा निर्णय
  • बरोबर आहे, कुणाला 'बाळू' अन् कुणाला 'टाळू' ही भानगडच नको

बीएसएनएलची ओबीसी टू ओबीसी फ्री कोंलिंग योजना

बीएसएनएल ओबीसी टू ओबीसी फ्री कोंलिंग योजना सादर करणार ही बातमी सकाळनेच सोमवार दि.४ जुलै रोजी दिली आणि अपेक्षेप्रमाणे त्यावर प्रतिक्रियांचे वादळ उठले. ही बातमी ई-सकाळच्या http://72.78.249.107/esakal/20110704/4700594298586467547.htm या लिंकवर वाचता येईल.

जातींच्या पेटवा ज्योती

=> राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी अण्णांचा खांदा कशाला?
  • म्हणजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कशाला? असचं ना?

सोशल इंजिनिअरिंग

=> कलमाडींना 'व्हीआयपी' ट्रीटमेंट; कारागृह अधिक्षकांची उचलबांगडी
  • 'चहापाण्यासाठी' एवढे आकांडतांडव कशाला?

टाईम

=> मी दुबळा नाही : पंतप्रधान मनमोहनसिंग
  • 'रामलीला' वरील कारवाईवरून ते तुमच्या लक्षात आलं असेलच!

वन्समोअर!

=> सरकारने योगगुरूंना उघडे पाडले : कपिल सिब्बल
  • ते आधीच उघडे आहेत

नाईलाज

=> न लढताच हरले मुंडे; सुषमा स्वराज यांच्याशी चर्चेनंतर पक्षातच राहणार असल्याची घोषणा
  • कॉंग्रेसने केली 'कोंडी' आणि मुंडेंची उडाली 'दांडी'

च्युईंग गम!

=> मुंडे चालती कॉंग्रेसची वाट, प्रदेश कॉंग्रेसचा धरुनिया हात
  • मुंडेंनी 'पाहिली' वाट, पण पक्षाने 'लावली' वाट 

खास मनोरंजक कार्यक्रम

=> मुंडेंना देण्यासारखे 'राष्ट्रवादी'कडे काहीच नाही : शरद पवार
  • त्यांच्याकडून घेण्यासारखे काही असेल तर पहावे लागेल

खास फॉर्मुला

=> हे तर जोकपाल विधेयक; अण्णा व सहकाऱ्यांची टीका
    • समितीतले 'लोक' ही आता करायला लागले 'जोक'

    काडीमोड

    => राज्यात मुंडेंसाठी राजकीय 'स्पेस' नाही; हा संघर्ष भाजपला महागात पडणारा : अण्णा डांगे
    • मुंडेंच्या 'साईज'ची 'स्पेस' हुडकण्यासाठी डांगेंची केवढी ही 'पायपीट'

    सुदृढतेचं लक्षण!

    => संरक्षण खात्यातूनही 'आदर्श'शी संबंधित कागदपत्रे गायब; संरक्षण खात्याच्या वकिलाची आयोगापुढे माहिती
    • आम्ही देशाचे संरक्षण करतो, कागदपत्रांचे नाही

    निवडून न आलेले हुकूमशहा

    => ओबीसी कनेक्शन; मुंडेंनी आजमावले (भुज)बळ
    • गडकरी, पाहतायत ना तुम्ही आमची गळाभेट?

    मंत्रालयातील उंदीरमामा

    => कारवाईशिवाय पर्यायाच नव्हता; पोलीस कारवाईबाबत पंतप्रधानांचे प्रथमच वक्तव्य
    • तुम्हाला म्हणून सांगतो, कारवाई केली नसती तर आमचंच काही खरं नव्हतं बघा!

    रामदेवाबांचे आंदोलन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून

    लोकशाहीचा खून

    अखेर रामदेवबाबांना अटक करून त्यांचे आंदोलन चिरडण्यात सरकार यशस्वी झाले. लोकशाहीचा उदोउदो करणाऱ्या कोंग्रेस सरकारला लोकशाहीचाच खून पाडण्याचे आदेश देताना जराही लाज वाटली नाही. मध्यरात्री उशिरा सगळा देश आणि मिडिया झोपेत असताना दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच दिल्ली पोलिसांनी ही कारवाई स्वतः केली असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. बराच खल करून अशी कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान मनमोहनसिंग व कोंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले होते असा विरोधकांचा आरोप आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे

    अजित पवार यांनी कोणताही संदर्भ नसताना अचानकपणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेली टीका, आणि राष्ट्रवादीने काहीही कारण नसताना केलेली दादर स्टेशनच्या नामांतराची मागणी या दोन्ही गोष्टी साहजिक वाटत असल्या तरी या दोन्ही गोष्टी सहजपणे घडलेल्या नाहीत, तर त्या राष्ट्रवादीच्या कूटनीतीचा एक भाग आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अचानक आणि अनपेक्षितपणे केलेली टीका आणि दादर स्टेशनच्या नामांतराची मागणी करण्यात राष्ट्रवादीने काही गोष्टीवर निशाना साधल्याचे लक्षात येते. एक म्हणजे आठवले शिवसेनेसोबत गेले त्याचे शल्य राष्ट्रवादीला बोचत आहे, त्याहीपेक्षा दलित मतांचा गठ्ठा गेला त्याचे दुखः अधिक आहे. त्यामुळे त्या नैराश्यापोटी आणि महानगरपालिकेची निवडणूक डोळयासमोर ठेवून जाणीवपूर्वक आखलेली ही रणनीती आहे असे म्हणता येईल. दुसरे म्हणजे पवार कुटुंबियावर अनेक प्रकरणात होत असलेल्या आरोपामुळे राष्ट्रवादी अस्वस्थ आहे, त्यामुळे दुसरा एखादा मुद्दा फोकस झाल्यावर जनतेचे लक्ष आपोआपच तिकडे जाईल या हेतूनेही ही टीका आणि मागणी केली आहे असे म्हणायला जागा आहे.

    बॉलीवूडचा नवा मंत्र

    => योगगुरू रामदेवबाबा हे तर संन्यासी नसून उद्योगपती आहेत : कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह
    • कॉंग्रेस पक्षात दिग्विजयसिंह हे एकमेव 'साक्षात्कारी' सरचिटणीस आहेत

    'रामलीला'

    => धान्यापासून मद्यनिर्मिती बंद!
    • आरारा! सगळाच घोटाळा झाला की, 'प्यायला' मिळाल्याशिवाय धान्य 'खायचं' कसं?

    'रिमोट'मध्ये गडबड

    => काळ्या पैशाचे होणार सर्वेक्षण; अर्थमंत्रालयाने सोपविली तीन प्रमुख संस्थांवर जबाबदारी
    • आमच्या आगामी 'सर्वेक्षणात' आम्ही विचारलेल्या प्रश्नांची 'खरीखुरी' उत्तरे द्यायची बरं का!
    => गुणवत्तेनुसार पोलिसांना पदोन्नती; त्रुटी लवकरच दूर करणार : आर.आर.पाटील

    भगवं-निळं

    => तंबाखूच्या पुड्यांवर १ डिसेंबरपासून अधिक कडक इशारा
    • म्हणजेच आता आपल्या तंबाखूचा स्वाद होणार आणखी कडक आणि लज्जतदार!

    खरे 'भारतरत्न'चे मानकरी

    => राज्यपालांविरुद्ध काहीही बोलणार नाही : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा
    • दोन कारणे, पाहिलं सगळं काही बोलून झालंय, दुसरं कुणी ऐकायलाही तयार नाही

    'लेटेस्ट व्हर्जन'

    => गरज पडल्यास पुन्हा पाकमध्ये घुसू; बराक ओबामांचा तालिबानींना इशारा
    • असे इशारे देण्यास शिकण्यासाठी भारताने अमेरिकेकडे ट्युशन लावावी

    हेच खरं दुखणं!

    => सीमेवर बिनधास्त फिरता यावे; फारूक अब्दुल्लांचे स्वप्न
    • अशी स्वप्ने स्वप्नातच पूर्ण होतात

    विठ्ठला कुणाचा झेंडा घेऊ हाती?

    => भारताची अब्रू चव्हाट्यावर; आणखी एक 'मोस्ट वाँटेड' आढळला मुंबईतच; चौकशीचे आदेश
    • निदान यादीत नावे टाकल्यावर तरी यांनी असे कुठेही आढळणे चुकीचे आहे

    हार्ड टू स्लिप डिस्क

    => कर्नाटकाबाबत निर्णयाची केंद्राला घाई नाही; राज्यपालांनी घाईगडबडीत अहवाल पाठविला असल्याचे मत
    • कारभारी दमानं, होऊ द्या दमानं!

    आघाडीचा धर्म जखमी

    => भारत अमेरिकेसारखी कारवाई करणार नाही : पंतप्रधान मनमोहनसिंग
    • भारतीयांची तुमच्याकडून 'ती' अपेक्षाही नाही

    'मारुतीचं' शेपूट

    => अयोध्या निकालाला स्थगिती; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा 'चमत्कारिक' निर्णय : सर्वोच्च न्यायालय
    • रामजी की लीला है न्यारी

    सडक्या मेंदूच्या राजपुरोहितला हाकला

    भाजप मुंबई शहराध्यक्ष राजपुरोहितला गरळ ओकताना काल वाहिन्यांवर पाहिलं. आणि कोणत्या तरी भैय्याने त्याला पाजलेल्या पहिल्या धारेच्या नशेत तो बोलत होता हे लगेचच लक्षात आलं. त्या भैय्याची ती स्पेशल स्ट्राँग धार त्याला भलतीच चढलेली दिसत होती.

    निजानंद

    पेशंट : डॉक्टर मी आपला फार आभारी आहे.
    डॉक्टर : (आश्चर्याने) पण मी तर आपणास आजच पाहतोय, त्यामुळे मी तुम्हाला काही ट्रीटमेंट दिली आहे असे मला तरी आठवत नाही. मग माझे आभार कशासाठी?

    आयजीच्या जीवावर बायजी उदार!

    => लादेन त्याज्यच; पण शिक्षेचा अधिकार अमेरिकेला कसा? मुस्लीम संघटनांचा सवाल
    • वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ल्याचा लादेनला अधिकार होता तसाच! 

    हे मात्र 'चीटींग'

    => राणेंच्या आरोपांचे समर्थन केलेले नाही : मुख्यमंत्री, ते आरोप राणेंचे; कॉंग्रेसचे नव्हेत : माणिकराव ठाकरे
    • आता 'सुपारी' फोडा नारायणराव

    ये तो अपना धंदाच है भाय!

    => 'सुपारी'चे पुरावे दिलेत, तर शिवसेनाप्रमुख पद सोडतो : बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
    • बोला चव्हाण साहेब, आहे का तयारी 'सुपारी' फोडायची?

    दार उघड बये आता दार उघड

    => कायदा हा सर्वासाठी समान आहे.कोणती व्यक्ती कोणत्या पदावर आहे, याचा कायद्याशी काहीही संबंध नसतो : मुंबई उच्च न्यायालय
    • तळं राखेल तोच पाणी चाखेल या प्रवृत्तीला हे कोण समजावणार?

    'कर' ही नाही आणि 'डर' ही नाही

    => सेनेच्या 'सुपारी'ची माहिती नाही : गृहमंत्री आर.आर.पाटील
    • तंबाखू तर सोडाच पण आबा 'सुपारी' सुद्धा खात नाहीत

    भ्रष्टाचारामुळे समाज अस्वस्थ

    => मुख्यमंत्री बिनविरोध निवडून येणार; युतीचा उमेदवार नाही
    • जैतापूरच्या पार्श्वभूमीवर युती झाली 'मॅनेज'

    'पानसुपारी'चा विडा अधिक रंगणार

    => महाराष्ट्र कर्जाच्या विळख्यात : क‍ॅगचा अहवाल
    • याच्या बाहुपाशातच सरकार रोम‍ँटिक मुडमध्ये असते 

    कान्हाची जंगल सफारी न्यारी

    कार्यकर्त्यांच्या अंगावर काठीचे वळ
    कोकणात आंदोलक खाती गोळ्या
    तापलेल्या जैतापुरच्या तव्यावर
    राजकारणी भाजून घेती पोळ्या

    मराठी भाषेतील पहिलाच व एकमेव "ग्राहक तक्रार मंच"

     मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"




    कुठे तक्रार करायची सोयच नाही अशी सगळ्यांचीच तक्रार असते. पण आता मात्र असं म्हणण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. कारण केवळ तक्रारी करण्यासाठीच "ग्राहक तक्रार मंच" नावाने एक स्वतंत्र मंच (Forum) सुरु झाला आहे. पण येथे फक्त तक्रारीच आहेत अशी तक्रार मात्र तुम्ही करु नका बरं का!

    सध्याचे मिरवणुकांचे चित्र कधी बदलणार?

    काल भगवान महावीर जयंती झाली, त्यानिमित्ताने ठिकठीकाणी शोभायात्रा निघाल्या. प्रतिवर्षाप्रमाणे आमच्याही गावात कालच ही शोभायात्रा संपन्न झाली. भगवान महावीर जयंती निमित्ताने जैन समाजातर्फे दरवर्षी निघणारी ही मिरवणूक लहानपणापासूनच माझ्या आकर्षणाचा विषय ठरत आलेली आहे.

    'रिअॅलिटी'

    => मुलायम, अमरसिंग, शांतीभूषण यांच्या संवादाच्या सीडीमुळे लोकपाल मसुदा समितीतील भूषण पितापुत्र संशयाच्या भोवर्‍यात
    • प्रत्यक्ष भ्रष्टाचार करून पाहिल्याशिवाय लोकपालाचा मसुदा खरा कसा उतरणार?

    अकरा योजनांचा 'बारावा'

    => राणाच्या कबुलीजबाबाबाबत पाकिस्तानला जाब विचारणार; परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा यांचे प्रतिपादन 
    • कृष्णासाहेब, उत्तर आम्हीच सांगतो, पाकिस्तान कानावर हात ठेवणार, पुढे तुमचं काय म्हणणं आहे बोला?

    आपलं जैतापूर सुरक्षित

    => २६/११ चा कट पाकिस्तानचाच; तहव्वूर राणाच्या कबुलीजबाबाने पर्दाफाश
    • अशा आरोपांनी व्यथित झालेल्या पाकला आम्ही क्रिकेट डिप्लोमसीने आधार देणे हे आमचे कर्तव्यच ठरते 

    लोका संगे ब्रम्हज्ञान

    => आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 'लीलावती' हॉस्पिटलवर आयकर खात्याचे छापे
    • तेरी 'लीला' सबसे न्यारी न्यारी 'हरी हरी'

    पीएच. डी. सर्वासाठी खुल्ली!

    => महिला, दुर्बलांना सत्तेत वाट द्यावा : शरद पवार यांचे औरंगाबादेतील सरपंच महापरीषदेत आवाहन
    • पण वाटा कुणी द्यायचा?
    => शांतीभूषण व प्रशांतभूषण या दोघांचा समावेश म्हणजे 'घराणेशाही' : रामदेवबाबा ; रामदेवबाबांनी

    जंतरमंतरवर छु-मंतर

    सत्ताधारी आणि विरोधक
    आहेत केवळ भांडायला
    वेळ कुणाकडे आहे
    लोकांच्या समस्या मांडायला

    टोमणे आणि डिवचणे

    => भरगच्च वेळापत्रकामुळे खेळाडूंची दमछाक होईल; 'कॅप्टन कुल' धोनीचा इशारा
    • आधीच 'अ‍ॅडस् शूटिंगच्या' बिझी शेड्युलमुळे बिचाऱ्यांची दमछाक होतीय ती वेगळीच

    प्रामाणिक दुधवाला भैय्या

    मागील पाच-सहा दिवसापासून दुध पातळ येत असल्यामुळे मालतीबाई चिडलेल्या होत्या. पण रोज भैय्याला त्याबद्दल बोलायला सांगूनही पंत आणि मुले ही गोष्ट काही मनावर घेत नव्हते, त्यामुळे भैय्याला कुणीच काही सुनावत नसल्याने आज मालतीबाईंनी स्वतःच भैय्याला फैलावर घ्यायचे ठरविले होते.

    कौतुक मराठी ब्लॉग्जचे

    रविवार दि. २७ मार्च २०११ रोजी सकाळी सहजपणे टीव्ही लावला असता, स्टार माझा वाहिनीवर मराठी ब्लॉगर्सना स्टार माझातर्फे आयोजित केलेल्या पारितोषक व प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा पाहण्यात आला. ज्यांचे ब्लॉग आपण नेहमी पाहतो, वाचतो त्या ब्लॉग्जधारकांना प्रत्यक्षपणे टीव्हीवर पारितोषिके स्वीकारताना व आपले मनोगत व्यक्त करताना बघून

    सगळं कसं शिस्तीत झालं पाहिजे!

    => हिंदू राष्ट्रवाद म्हणजे भाजपाचे संधीसाधू राजकारण; विकिलीक्सचा बॉम्बगोळा : अरुण जेटली यांचा मात्र या विधानाचा इन्कार
    • विकिलीक्सवर आमच्या पक्षाविषयी जे काही प्रसिद्ध होईल, त्यास आमचा कायमस्वरूपी इन्कार समजावा, मात्र विरोधी पक्षाविषयी केलेल्या आरोपाबाबत आमचा पूर्ण होकार समजावा

    लवकरच करावी लागेल 'नवग्रह' शांती

    => क्रिकेट डिप्लोमसी! मी मोहलीवर असेलच...झरदारी, गिलानी तुम्हीपण या! : पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे पाकला निमंत्रण
    • येताना 'दाउद'लाही आणा, आम्हीपण हसणाऱ्या अफजल गुरूला आणि टाळ्या वाजवणाऱ्या कसाबला आणणार आहोत

    हायटेक हुरडा

    => सध्या आम्ही तोंड चालविण्यापेक्षा ते बंद ठेवण्याच्या प्रयत्नात आहोत : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पोंटिंग
    • नको तिथे तोंड घालणं महागात पडतं हे समजलं वाटतं!

    वृत्तपत्रात अस्सल मराठी वापरावी का

    लोकमतच्या औरंगाबाद (मराठवाडा) आवृत्तीचे निवासी संपादक चक्रधर दळवी यांचे 'मराठीच्या पिंडावरील कावळे' हे भाष्य नुकतेच वाचण्यात आले. त्यात ते म्हणतात, एखाद्या प्रसंगात एखाद्या व्यक्तीने अविवेकी भाषा वापरली असेल, आणि त्या प्रसंगाची बातमी करायची असेल तर वृतपत्रांनी काय करावे? बातमीत ही भाषा वापरावी का 'फुल्या-फुल्या' मारून वेळ मारून न्यावी? परवा एका वाचकाचा फोन आला होता, तेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला. जे काही घडले ते जसेच्या तसे कळणे, हा वाचक या नात्याने आमचा हक्क आहे. इंग्रजी वृतपत्रे असभ्य ठरविलेल्या शब्दांचे रिपोर्टिंगही करतात. मराठीत ते का घडू नये, असे या वाचकाने ठणकावून सांगितले. याला निमित्त ठरले लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेली एक बातमी. जनगणना कर्मचाऱ्यावर चिडलेल्या एका महिलेने या कर्मचाऱ्याला 'भाड्या' म्हनून शिवी हासडली. लोकमतने हे वाक्य जसेच्या तसे उचलले. त्यावर या वाचकाने फोन करून लोकमतचे अभिनंदन केले.

    काढा आतील कडी'

    => तृणमूलला २२९ तर कॉंग्रेसला ६४ ऐवजी ६५; प. बंगाल मधील जागावाटपाबाबत समझोता
    • काय सांगता? चक्क एक जागा वाढवून मिळाली? 'आत्मसन्मान' म्हणतात तो हाच!

    लवचिक 'आत्मसन्मान'

    => बिनचूक खेळण्याचा भारतीयांचा निर्धार; उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश दडपण नसल्याने निश्चिंती
    • त्यातूनही काही चुकलेच तर ते 'चुकीने' घडले असे समजण्यात यावे

    कस्टमर केअर उर्फ ग्राहक छळवाद केंद्र

    हल्ली मोबाईल कंपन्याकडून ग्राहकांच्या बॅलन्सची नकळतपणे कत्तल सुरु आहे. जे ग्राहक आपल्या बॅलन्सबाबत बेफिकीर असतात, त्यांना हे लक्षात येत नाही. मात्र जे ग्राहक सतत आपल्या बॅलन्सकडे लक्ष ठेवून असतात त्यांच्या निदर्शनास ही बाब लगेच येते. आपल्या मोबाईलवर जे प्रमोशनल कॉल्स आणि एसएमएस येत असतात, प्रमुखाने त्यांचेच हे प्रताप असू शकतात.

    ब्रम्हानंदी लागली टाळी

    => माफियांना संरक्षण देणाऱ्या सरकारला जनतेनेच खाली खेचावे : गडकरी
    • माफ करा गडकरी जी! खेचाखेचीचे डावपेच जनतेला अजून कुणी शिकविलेच नाहीत

    भाजपा बदनाम

    => महिला आरक्षण विधेयक तूर्त लांबणीवर; अधिवेशनानंतर तो विषय : मुख्यमंत्री
    • अरेरे! राष्ट्रवादीने आजच अर्धा पानाच्या रंगीत जाहिराती की हो दिल्या!

    माफीयाराज उध्वस्त करणार

    => महागाईचा दर अखेर एकेरी आकड्यात; फेब्रुवारी अखेर ९.५२ टक्के
    • यासाठी सर्वसामान्य जनतेने सरकारची पाठ थोपटण्याची गरज आहे

    मुरलेले राजकारणी

    => हसन अली शस्त्रांचाही व्यापारी? दहशतवादाचाही गुन्हा दाखल करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश
    • सरकारचा नाकर्तेपणा; न्यायसंस्थेला बनावे लागले 'तपास यंत्रणा'

    'झंडू बाम' पेक्षा नवा 'स्ट्राँग फॉर्म्युला'

    => मी 'पळपुटा' नाही; तर दुसऱ्यांना 'पळवितो' : खा. सुरेश कलमाडी
    • आता सीबीआय चेच उदाहरण पहा ना!

    तेवढं सोडून बोला!

    => अमीर बनला ऋतीकचा 'फॅन'
    • उन्हाळा आला वाटतं!
    => हसन अली मुंबईतील रुग्णालयात, पण कोणत्या? : 'चार्टर्ड अकाऊंटंट' ची माहिती
    • तेवढं सोडून बोला!
    => 'बोफोर्स'ला मुठमाती, खटला बंद करण्याच्या सीबीआयच्या विनंतीला मान्यता
    • तपासासाठी देशाला अडीचशे कोटींचा चुना!

    अफजल गुरुला फाशी का दिली जात नाही?

    देशाच्या संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला आणि आजही तुरुंगात खितपत पडलेल्या अफजल गुरूने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे प्रलंबित असल्याचे आजपर्यंत भासवले जात होते, परंतु राष्टपतीभवनाकडून त्याचा अर्ज गृहमंत्रालयाकडे विचारणा करण्यासाठी मागेच पाठविला असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे ही दिरंगाई राष्ट्रपतींच्याकडून नव्हे तर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून होत असल्याचे सत्य आता समोर आले आहे.

    कुठे आहेत मराठी वाहिन्या?


    आजकाल जिकडे पहावे तिकडे घराच्या छतावर छत्र्यांचे पिक उगवलेले दिसते. आता केबल ऑपरेटरकडून कनेक्शन घेण्याऐवजी स्वतःच्या मालकीची डिशअँन्टेना घराच्या छतावर लावून वाहिन्या पहाणे लोकप्रिय होत आहे. यात विविध सशुल्क खाजगी कंपन्यासोबतच देशातील पहिली संपूर्णतः मोफत वाहिन्या दाखविणारी DD DirectPlus ही दूरदर्शनची डिशअँन्टेना आजही आपली लोकप्रियता कायम टिकवून आहे.

    काय ह्या हल्लीच्या घोड्यांचा तोरा!

    => राज्यभरात 'कॉपीमुक्त' अभियानातही 'कॉपी' जोरातच!
    • 'कॉपी'करांच्या दृष्टीतून हे 'कॉपीमुक्ती' अभियान म्हणजे "करा कॉपी आणि मिळावा टेन्शनमुक्ती!"

    आगळं! वेगळं!!! वर फोरमची सुरुवात


    आजपासून "आगळं! वेगळं!!!" च्या वाचकांसाठीही 'चर्चा-पीठ' या फोरमची सुरुवात केली आहे. ''आगळं! वेगळं!!!'' च्या मेनूबार वरील FORUM या बटणावर क्लिक केले असता चर्चा-पीठ आपणासमोर येईल.

    आपले या चर्चा-पीठात (चर्चा करून पीठ पडणारच आहे म्हणून चर्चा-पीठ हे नाव दिले आहे) स्वागत आहे. यातून काही विचारमंथन व्हावे हा यामागील हेतू आहे. चला तर मग सुरुवात करु या 'इंगजी शब्दांना मराठीत प्रतिशब्द सुचवा' या एका नव्या विषयाने.

    राजकारणातील काही 'गुळगुळीत' वाक्ये

    राजकारणात नेहमी वापरली जाणारी काही वाक्ये वर्षानुवर्षे वापरून इतकी 'गुळगुळीत' झालेली आहेत की, लोक त्यावरून घसरून सुद्धा पडतील, पण जरी घसरून पडले तरी त्यांनाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा काही 'गुळगुळीत' नमुने :

    आधी पदग्रहण आणि मग निवडणूक

    आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधान परिषदेची निवडणूक लढविणार आहेत. कारण सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे त्यांना आवश्यक आहे. म्हणजे 'आधी हनिमून आणि मग लग्न' अशातला हा प्रकार आहे. 

    निवडणुका आधी 'पंतप्रधान'

    => 'मनसे' म्हणजे 'झंडू बाम' : शिवसेनाप्रमुख; बाटली खिशातच ठेवण्याचा मुंडेंना इशारा
    • कदाचित जैन-खडसे 'डोकेदुखी' वर सुद्धा उपयोगी ठरेल

    हम है CID






    खून के सिवा हमे कुछ दिखता ही नहीं
    खुनी को पकडे बिना हम रहते भी नहीं

    शशी थरूर यांना साडेतेरा लाख रुपये 'मोबदला'

    => भारताचे परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांनी वाचले 'चुकीचे' भाषण; कृष्णा म्हणतात 'चूक' नाहीच!
    • आमचे 'मास्तर' मात्र 'चुकीचे' वाचले की 'कान पिरगाळतात'

    अखेर अजितदादा पवारच जिंकले

    नांदेड येथील सभेतून अजितदादा विरुद्ध पत्रकार अश्या सरू झालेल्या वादावर, पुतण्याच्या वतीने काका शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीनंतर पडदा पडला. या रंगलेल्या नाट्याला उभ्या महाराष्ट्राची जनता साक्ष आहे. हा प्रश्न दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेचा केला होता, मात्र यात सरशी दादांचीच झाली आहे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.

    मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीची आकडेवारी

    आपल्या देशात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) सेवेची सुरवात २५ नोव्हेंबर २०१० मध्ये प्रथम हरियाणा येथून करण्यात आली. आणि २० जानेवारी २०११ पासून ही सेवा संपूर्ण देशभर उपलब्ध करून देण्यात आली.

    'पत्रकार मंत्री' वरून आबा अडचणीत?

    => 'जेपीसी' बाबत कॉंग्रेस मवाळ; संसदेचे कामकाज चालू देण्यास प्राधान्य
    • देशाचे व संसदेचे एकही मिनिटाचे आणि एकही रुपयाचे नुकसान न होऊ देता असे 'बुलेट स्पीडने' निर्णय घेण्याची क्षमता फक्त कोंग्रेसकडेच आहे, याबाबत आमच्या मनात शंकाच नाही.

    अनाहूत कॉल्स व एसएमएस पासून मुक्तता

    मोबाईल ग्राहकांची नको असलेल्या कॉल्स व एसएमएस पासून मुक्तता करण्यासाठी दूरसंचार नियामक मंडळाने म्हणजेच 'ट्राय'ने आता नवीन नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. याचे वैशिष्ट्य असे की, यात सात प्रकारात वर्गीकृत केलेल्या आपल्या आवडीच्या वर्गातले एसएमएस पूर्णतः किंवा अंशतः प्राप्त करण्याचे अथवा बंद करण्याचे पर्याय उपलब्ध केले असून आठवा पर्याय वापरून नको असलेले सर्वच कॉल्स व एसएमएस बंद करता येतील.

    निघाली 'कॉमेडी एक्स्प्रेस'

    => विलासरावांना मंत्रीपदी ठेवणे लज्जास्पद : सर्वोच्च न्यायालयाची टीका
    • आम्ही फक्त 'गॉडमदर' चेच आदेश पाळतो.

    भाजप-सेना युती टिकणार की तुटणार?

    => खऱ्या बातम्या द्यायला शिका, नाही तर तुमच्यावर गंडांतर; कॅमेरेवाले आणि वार्ताहरांना अशा कार्यक्रमात प्रवेश देणे बंद केले पाहिजे  : उपमुख्यमंत्री अजित पवार
    • त्यासाठी आजच आमच्या 'कार्यशाळेत' प्रवेश निशित करा, उशीर केल्यास 'प्रवेशबंदी' शक्य.

    धोनीकडून लाखो भारतीय क्रिकेटप्रेमींचा अपमान

    कालच दोन बातम्या वाचण्यात आल्या. एक बातमी वाचण्यात आली त्यात धोनी म्हणतोय की "सचिनला वर्ल्डकप गिफ्ट करायचाय" विजेतेपदाचा चषक भेट करुन सचिनची शेवटची विश्वचषक स्पर्धा साजरी करु असं वक्तव्य त्याने केलंय. आणि त्याचसोबत दुसरी एक बातमी वाचली, "वर्ल्डकप सचिनपुरताच नाही" असं कपिलदेवचं मत आहे. पुढे कपिलदेव म्हणतो की, सचिन महान खेळाडू असून त्याने भारतीय क्रिकेटची अनमोल सेवा केली आहे, पण स्पर्धेत सचिन एकटाच खेळत नाही, संघापेक्षा तो नक्कीच मोठा नाही. कपिलदेवच्या ह्या स्पष्टवक्तेपणाला सर्वानीच 'दाद' आणि सादही द्यायला हवी.

    ब्लॉगपोस्टच्या खाली सही कशी कराल?

    ब्लॉगवरील प्रत्येक पोस्टच्या खाली आपली मस्त वळणदार सही असल्यास कशी दिसेल? अर्थातच चांगलीच दिसणार.  तुम्हालासुद्धा तुमची सही ब्लॉगपोस्टच्या खाली करता येऊ शकते. 

    फ्री मोबाईल रिचार्ज

    प्रत्येक प्रिपेड मोबाईल धारकांना रिचार्ज तर करावेच लागते. पण हेच रिचार्ज जर फ्री झाले तर कुणाला आवडणार नाही?

    हरवले सापडलेसाठी वेबसाईट

    जेव्हा आपले किंवा कुणा इतरांचे वाहन अथवा व्यक्ती हरविल्याचा प्रसंग येतो, तेव्हा काय करावे हे लवकर न सुचणे स्वाभाविकच आहे. अशावेळी एकदम गांगरून न जाता धीर धरावा. आणि हरविलेल्या वाहनांचा किंवा व्यक्तींचा शोध घेण्यासाठी किंवा अशा हरविलेल्या अथवा सापडलेल्या व्यक्ती व वाहनांची माहिती नोंद करण्यासाठी भारत लॉस्ट अँड फाउंड डॉट कॉम ही एक वेबसाईट आपल्या मदतीसाठी उपलब्ध आहे याची आठवण ठेवावी.

    मोबाईल कॉल दर वाढणार?

    => एफआयआरमध्ये अशोक चव्हाणांचे नाव; पण आरोपी नाही : आदर्श घोटाळा
    • या तत्वावर तर आमचीही नावे चालली असती की! : सर्व माजी मुख्यमंत्री

    ब्लॉगसाठी अ‍ॅनिमेटेड घड्याळ




    आपल्या ब्लॉगसाठी एक नविन ‍अ‍ॅनिमेटेड घड्याळ. यात आहे तारीख, वार, महिना, साल आणि तास, मिनिट व सेकंद म्हणजे सगळे काही. आणि यावर आपण जसा माउस फिरवाल तसे हे घड्याळ हालचाल करते. शिवाय हे घड्याळ चालू आणि बंद करण्यासाठी बटन सुद्धा आहे.

    फायरफॉक्स ब्राऊजरसाठी मराठी अ‍ॅड ऑन

    आपण जर फायरफॉक्स ब्राऊजर वापरत असाल तर, मराठीतून शुद्धलेखन तपासण्यासाठी (Spell Checking) मराठी डिक्शनरी ९.१ ही एक उत्तम अ‍ॅड ऑन सुविधा आपणासाठी उपलब्ध आहे.

    क्रूरतेची परिसीमा

    यशवंत सोनावणे, अप्पर जिल्हाधिकारी, मालेगाव यांची जिवंत जाळून हत्या. काल दुपारी विविध चॅनेल्सवर ही बातमी ऐकून आणि पाहून डोकं सुन्न झालं. आपला देश आज ६२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. आणि त्याच्या एक दिवस आधी ही अमानुष घटना घडतेय. हे किती दुर्देवी आणि लाजिरवाणे आहे.

    यशवंत सोनावणे यांना हे मरण मिळालं ते त्यांच्या प्रामाणिकपणाच्या मोबदल्यात. त्यांना त्यांचा केवळ प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षपणाच नडला. जर त्यांनी 'तोडपाणी' केले असते तर त्यांना जीव गमवावा लागला नसता हे तर उघड सत्य आहे.

    वरातीमागून घोडे

    => राष्टकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीच्या अध्यक्षपदावरून कलमाडींची हकालपट्टी
    • वरातीमागून घोडे!

    ही तो पक्ष्याध्यक्षांची इच्छा

    => काळ्या पैशांच्या माहितीसाठी २०१२ पर्यंत प्रतीक्षा करा : स्विझर्लंडचा एक वरिष्ठ अधिकारी
    • 'जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा' : काळा

    ब्लॉगवरील पोस्ट्स ट्विटरवर आणि फेसबुकवर आपोआप कशा प्रसिद्ध कराव्यात?


    मी ब्लॉग सुरु केल्यापासून माझ्या ब्लॉगवरील पोस्ट्स ट्विटरवर आणि फेसबुकवर काही प्रसिद्ध होत नव्हत्या. आणि त्या आपोआप कशा प्रसिद्ध करायच्या याचीही मला कल्पना नव्हती. मग पुढे काही दिवसांनी गुगल फीड मध्ये Socialize एक नावाचा पर्याय यासाठी उपलब्ध आहे असं माझ्या लक्षात आलं.

    डिझेल दरवाढीचा विचार नाही

    => रामानंद तिवारी अखेर निलंबित; आदर्श प्रकरण भोवले
    • लाला झाले, तिवारी गेले, बाकीच्यांचे काय?
    => परदेशी बँक खात्यांचा तपशील देता येणार नाही : पंतप्रधान
    • या खातेदारांच्या नावांची गुप्तता बाळगण्यास सरकार शेवटपर्यंत कटिबद्ध आहे !
    => डिझेल दरवाढीचा विचार नाही : पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी
    • तूर्त तरी नाही, आत्ताच तर कार्यभार स्वीकारलाय

    देशभरात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सुरु

    लवकरच येणार, आता सुरु होणार असा गाजावाजा करणाऱ्या मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवेला आज एकदाचा मुहूर्त लागला. काही ना काही तरी सबबी पुढे करून सतत वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यामुळे ही उशीरा सुरु झालेली  सेवा सर्वाच्याच चर्चेचा विषय ठरली होती.

    या सेवेमुळे आता केवळ सध्याचा क्रमांक बदलू नये म्हणून नाईलाजाने त्याच ऑपरेटरची सेवा वापरण्याचे दिवस गेले. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवेमुळे ग्राहकांना मोबाईल ऑपरेटर बदलण्याच्या अधिकार व संधी प्राप्त झाली आहे. आता ग्राहकांना त्यांचा सध्याचा असलेला क्रमांक कायम ठेवून हवा तो मोबाईल ऑपरेटर निवडण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाल्याने एक प्रकारे मोबाईल ऑपरेटर्सची एकाधिकारशाही व मनमानी समाप्त झाली असे म्हणायला हरकत नाही.

    'टू-जी' पाठोपाठ आता 'कोल ब्लॉक' महाघोटाळा

    => केंद्रीय मंत्रिमंडळात आज मोठे फेरबदल काही मंत्र्यांना वगळणार
    • चला निदान आज तरी डोक्यावरचं 'अवजड' ओझं कमी होईल असं काहींना वाटतयं

    'अभ्यास' हा शासनाचा आवडता उपक्रम

    => स्वीस बँकेतील खात्यांची माहिती 'विकीलीक्स' कडे; २००० नावांची यादी जाहीर होणार
    • आता हा 'विकी' कुणाकुणाला 'क्लिक' करून 'लिक' करणार बरे? आम्ही तर अस्वस्थ झालोय.

    मिळून सारेजण

    => भ्रष्टाचाराचा 'आदर्श' जमीनदोस्त करा : पर्यावरण मंत्रालयाकडून इमारत पाडण्याची शिफारस
    • पण जयरामजी आम्हाला 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' याच तत्वाची सवय आहे.

    गाडीत पेट्रोल भरितां नाम घ्या सरकारचे

    => पेट्रोल महागले, आजपासून लिटरमागे अडीच रुपये दरवाढ; सहा महिन्यात सहा झटके
    • गाडीत पेट्रोल भरितां नाम घ्या सरकारचे, सुसह्य जगणे होते नाम घेता मनमोहनाचे, विरोधक करीती टीका, तरी सत्ता भोगू ही पूर्णटर्म, पेट्रोल दरवाढ नोहे जाणिजे संक्रांतीचे गोड मर्म (जय जय सोनिया गांधी समर्थ)

    भारत सरकार गुप्ततेच्या बाबत अधिक दक्ष

    => आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयातील लीपिकाला बदडले; मंत्रालय कर्मचाऱ्यांनी केला निषेध
    • आता पोलिसांनी बच्चू कडूंना पोलीस स्टेशनमध्ये पाऊण तास बसवून ठेवून नंतर बेदम मारहाण करायला ते मनसेचे हर्षवर्धन जाधव थोडेच आहेत?

    महागाई हे संपन्नतेचे प्रतिक

    => मौका सभी को मिलता है : राज ठाकरे
    • 'राज' से दुश्मनी बहुत महेंगी पडेगी आरार, याद रखना

    ब्लॉगचा पेज लोड स्पीड कसा वाढवाल?

    आपल्या ब्लॉगचे पेज लोड होण्यास लागणाऱ्या वेळेकडे आणि वेगाकडे आपण कधीतरी लक्ष दिले आहे का? नसल्यास या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही दुर्लक्षिली जाणारी गोष्टच वाचकांवर बरा किंवा वाईट प्रभाव टाकत असते.

    ब्लॉगच्या हेडरमध्ये बॅनर कसे लावावे?



    ब्लॉगच्या हेडरमध्ये लावलेली बॅनर प्रकारातील जाहिरात पटकन्‌ वाचकांच्या नजरेत भरते. अ‍ॅडसेन्स रेडी प्रकारच्या ब्लॉग टेम्प्लेटमध्ये अशी जाहिरात करण्याची सोय आधीच असते. पण जर अशी सोय नसेल तरीही ब्लॉगच्या हेडरमध्ये बॅनर जाहिरात कशी करावी हे आपण पाहू.

    सोने व्यापाऱ्यांच्या खात्यावर 'नजर'

    => सोने व्यापाऱ्यांच्या खात्यावर 'नजर'; 'काळा' पैसा असल्याची शक्यता : रिझर्व बँकेची वाणिज्यिक बँकांना सूचना
    • 'नजर' लागू नये म्हणूनच 'काळं' वापरण्याची प्रथा आहे, हे बहुधा रिझर्व बँकेला माहिती नसावं.

    डोमेन नेम विकत घेताना...भाग २


    आता हा फायद्या-तोट्याचा विचार जरी बरोबर असला तरी, आपल्याला पाहिजे असलेले नाव जर .com मध्ये उपलब्धच नसेल तर किंवा आपली गरज जर .in चीच असेल तर त्याप्रमाणेच डोमेन नेम खरेदी करणे भाग आहे. अशावेळी फायदा-तोटा दुर्लक्षित करावा लागेल.


    डोमेन नेम विकत घेताना...भाग १

    हल्ली कशाकशाचा सेल सुरु असेल ते सांगता येत नाही, कारण सध्या डोमेन नेम्सचा ही सेल सुरु आहे. अगदी ९९ रुपया पासून तुम्हाला या सेलमध्ये .in, .co.in अशा प्रकारची डोमेन नेम्स उपलब्ध होतील. त्यामुळे साहजिकच फक्त शंभर रुपयात तर डोमेन नेम रजिस्ट्रेशन होतंय तर मग काय हरकत आहे. चला आपली स्वतःची एक वेबसाईट चालू करून टाकू किंवा आपल्या ब्लॉगसाठी एक डोमेन नेम घेऊन टाकू असे विचार मनात डोकावणे साहजिकच आहेत.

    ब्लॉगवर 'ताज्या प्रतिक्रिया' (Recent Comments) कशा दर्शवाव्यात?

    तुम्हाला जर तुमच्या ब्लॉगवर जर 'ताज्या प्रतिक्रिया' (Recent Comments) दाखवायच्या असतील तर, एका फार सोप्या पद्धतीने तुम्ही त्या दाखवू शकता.

    १. प्रथम डॅशबोर्ड मधून Design -> Page Elements हा पर्याय निवडा.

    मराठी ब्लॉग्स डिरेक्टरी

    सध्या मराठी ब्लॉग्जची नोंदणी करणारी मराठी ब्लॉग विश्व, मराठीसूची, मराठी मंडळी, मराठी ब्लॉग जगत, ब्लॉगकट्टा नेटभेट ही संकेतस्थळे तर सर्वपरिचित आहेतच, पण आणखीन एक 'मराठी ब्लॉग्स डिरेक्टरी' या नावाचे बऱ्याच लोकांना फारसे माहित नसलेले एक मराठी ब्लॉगची नोंदणी करणारे संकेतस्थळ सुरु झालेले माझ्या पाहण्यात आले आहे.

    ब्लॉगच्या मुखपृष्ठावर लेखांची फक्त शीर्षकेच कशी दाखवावीत?

    ब्लॉगच्या मुखपृष्ठावर सर्वसाधारणपणे नेहमी लेखाचे शीर्षक, चित्रे व मजकूर असे चित्र  वाचकांना दिसत असते.

    पण त्याऐवजी ब्लॉगच्या मुखपृष्ठावर लेखांची फक्त शीर्षकेच (Links Only) कशी दाखविता येतील ते आज आपण या लेखात पहाणार आहोत.

    गुगलच्या अ‍ॅडसेन्ससाठी प्रयत्न करताय?

    जर तुमचा मराठी ब्लॉग असेल, आणि तुम्ही जर त्यावर जाहिराती मिळाव्यात म्हणून गुगलच्या अ‍ॅडसेन्ससाठी प्रयत्न करत असाल तर गुगलच्या अ‍ॅडसेन्स संदर्भातील काही धोरणांची माहिती होण्यासाठी हा लेख अवश्य वाचावा.

    न्याय व्यवस्था; इंडियन स्टाईल

    => पंतप्रधानांनी 'लोकलेखा'पुढे जाण्याची गरज नाही : प्रणव मुखर्जी
    • 'वजीर' बोले 'प्रजा' मान डोले; काय करता? विलाजच नाही.

    तुमच्या ब्लॉगच्या टेम्प्लेटचे डिझाईन तुम्ही स्वतःच करा

    तुमच्या ब्लॉगसाठी तुम्ही अनेक टेम्प्लेट पहिल्या असतील, त्यातील काही वापरल्या असतील. पण असे करताना तुम्हाला प्रत्येक टेम्प्लेटमध्ये काही गोष्टी पाहिजे होत्या अथवा नको होत्या असे वाटलेही असेल, पण प्रोग्रामिंग लँग्वेजेसची माहिती नसणाऱ्या नविन ब्लॉगर्सना असे काही बदल करणे शक्य नाही. पण म्हणून त्यांनी नाराज होण्याचे कारण नाही.

    स्वागत नव्या वर्षाचे...

     
    आपणांस नविन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा!


    - रमण कारंजकर