'पोस्टशंभरी' | आगळं! वेगळं !!!

'पोस्टशंभरी'

आज माझी 'पोस्टशंभरी'. म्हणजेच मी आज लिहलेली पोस्ट शंभरावी आहे. ३१ ऑगस्ट २०१० रोजी ब्लॉग सुरु केला, दररोज किमान एक पोस्ट लिहायचे ठरविले होते. त्याच प्रयत्नाचे फळ म्हणून बघताबघता आज ही शंभरावी पोस्ट लिहायचा योग आला आहे.

त्याच सोबत माझ्या ब्लॉगच्या पेजव्ह्यूजनेही आता पाच हजारांचा टप्पा पार केला आहे. हा ही या 'पोस्टशंभरी' बाबत एक योगायोगच म्हणावा लागेल.

अर्थातच याचं सर्व श्रेय आपण सर्व रसिक वाचकांना आहे. (का असू नये? काहीही लिहलेलं वाचायचं म्हणजे सहनशीलतेचा अंतच नाही का?)

तसेच मला ब्लॉगिंग बद्दल प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करणाऱ्या नेट गुरूंना आहे. त्या नेट गुरूंचा मी ऋणी आहे, की ज्यांनी नविन ब्लॉगर्सना उपयुक्त ठरतील असे लेख मायमराठी भाषेत लिहून ठेवले आहेत. या क्षेत्रात येणाऱ्या सर्व नविन मंडळींना ते सतत मार्गदर्शक ठरतील यात शंकाच नाही.

आता हे ब्लॉगिंग करत असताना व्यावसायिक दृष्टिकोन म्हणजेच जाहिरातींच्या माध्यमातून अर्थप्राप्तीची अपेक्षा बाळगणे काही गैर नाही, किंबहुना सर्व मराठी ब्लॉगर्सनी असा व्यावसायिक दृष्टिकोन अवश्य बाळगावा असे माझे वैयक्तिक मत आहे.  (सर्व ब्लॉगर्सनी या संदर्भातील निलेश बने यांचा मराठी ब्लॉगवरचा सायबर'ब्लॉक' हा  लेख अवश्य वाचवा.)

त्यामुळे त्या दिशेने वाटचाल करताना गुगलच्या मराठी भाषेतील ब्लॉग्जना जाहिराती द्यायच्या नाहीत या आडमुठ्या धोरणामुळे आता काही लेख इंग्रजीमध्ये लिहणे मला अपरिहार्य आहे. (मनसेची जर 'ई शाखा' असेल तर त्यांनी हा मुद्दा हाती घ्यायला काहीच हरकत नाही. गुगलवर मराठी भाषेतील ब्लॉग्जना केवळ 'इंग्रजीच्या' मुद्द्यावर न अडवता जाहिराती देण्यासाठी मनसेवाले गुगलवर दबाव आणतील का किंवा 'ई राडा' करतील का? हा प्रश्न आहे.)

मात्र त्यामुळे आपणांस विनंती आहे की, या ब्लॉगवरील आपला स्नेह कमी होऊ नये, हीच यानिमित्ताने आपणा सर्व रसिकांना नम्र विनंती आहे. आपणा सर्वांचे पुन्हा एकवार मन:पूर्वक आभार!

0 Comments:

Post a Comment