भक्तीसंगीताचा अनमोल खजिना | आगळं! वेगळं !!!

भक्तीसंगीताचा अनमोल खजिना

आपणापैकी बरेच जण इंटरनेटवरून संगीताचा आस्वाद घेत असतात. संगीताची आवड ही प्रत्येक व्यक्तीनुसार भिन्न असणे स्वाभाविकच आहे. आजपर्यंत तुम्ही संगीताविषयीच्या पुष्कळ वेबसाईट पहिल्या असतील.

पण आज आपण अशा एका वेबसाईट विषयी माहिती घेणार आहोत, की जेथे आहे भारतीय हिंदू धर्माच्या भक्ती संगीताचा अध्यात्मिक, धार्मिक सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारा विशाल अनमोल खजिना.


या खजिन्यात तुम्हाला अशी काही अनमोल रत्ने सापडतील की जी तुम्ही याआधी कुठेही पहिली नसतील, किंवा तुम्ही ती मिळावी अशी इच्छा असूनही व शोध घेऊन ही सापडली नसतील.

या यादीकडे नजर टाकल्यास थोडक्यात तुमच्या लक्षात येईल की या खजिन्यात काय काय आहे. येथे आहे, आरती, श्लोक, मानसिक शांती मंत्र, गुरुस्मरण, लक्ष्मी स्तोत्रम, बीजमंत्र, दुर्गाकवच, सहस्त्रनाम, अनुप जलोटा भजन, गीता, भज गोविंदम, कृष्ण भजन, गणेशमंत्र, शिवमंत्र, दुर्गामाता भजन, गायत्रीमंत्र, गुरु गीता, गुरु मां ध्यान, हनुमान भजन, शनी भजन व आरती, मां लक्ष्मी दुर्गा सरस्वती संतोषी गंगा वैष्णोदेवी भजन, बासुरी संगीत, ओम, रामायण, रामचरितमानस, ऋग्वेद, साईबाबा भजन, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद असे आणखीन बरेच काही तुम्हाला येथे पहावयास मिळेल.

हे पाहून काय डाऊनलोड करून घ्यावे आणि किती घ्यावे असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल. या सध्याच्या स्पर्धेच्या, धावपळीच्या युगात तणावपूर्ण जीवन जगताना हरवलेली मानसिक शांती व सुख मिळवायचे असेल, अध्यात्मिक प्रगती करायची असेल तर या शांत, मधुर व पवित्र अशा मानसिक तणाव दूर करणाऱ्या‍ भक्तीसंगीताला पर्याय नाही.

तर मग http://www.yogausa.com येथे देणार ना भेट? या साईटची भाषा इंग्रजी असून ती Google Translate द्वारे हिंदीमध्ये बदलण्याची सोय सुद्धा येथे उपलब्ध आहे.

0 Comments:

Post a Comment