नविन मंत्र्यांच्या खास प्रतिक्रिया | आगळं! वेगळं !!!

नविन मंत्र्यांच्या खास प्रतिक्रिया

नविन मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं आणि काही मंत्र्यांच्या खाजगी प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या त्या अशा :

अजितदादा पवार : "आमच्या सर्व मंत्र्यांना 'उर्जा' देणं हे मी माझं कर्तव्य मानतो. माझ्या म्हणण्याचा 'अर्थ' तुम्हाला कळला असेलच."

 
नारायण राणे : "बंदर विकास" म्हणजे माकडांचा माणूस करायचा असं तुम्हाला कुणी सांगितलं?"
 
छगन भुजबळ : "स्व'गृह' सोडून 'पर्यटन' करत 'सार्वजनिक' ठिकाणी 'बांधकाम' करायचं याचा 'अर्थ' काय? आणि यात किती 'उर्जा' वाया जाईल?"
 
आर. आर. पाटील : "मी 'स्वगृही' आनंदी आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे 'गृह' कलह नाही."
 
पतंगराव कदम : "मदत आणि पुनर्वसन' ते इतरांसाठी ठीक आहे हो, पण आमच्या नशिबी यंदाही पुन्हा 'वनवास' आहेच."
 
बाळासाहेब थोरात : "अहो नावाप्रमाणेच आमचं नशीब यावेळी जोरात आहे.सर्वांचा डोळा असलेलं 'महसूल' म्हणजे 'पैका वसूल'च की."

0 Comments:

Post a Comment