बीएसएनएलची 'प्यारी जोडी' स्कीम | आगळं! वेगळं !!!

बीएसएनएलची 'प्यारी जोडी' स्कीम

नुकतीच बीएसएनएलची 'प्यारी जोडी' ही स्कीम आली आहे. याअंतर्गत लँडलाईन असणर्‍या ग्राहकांना एक प्रीपेड किंवा पोस्टपेड सिमकार्ड मोफत दिले जात आहे. या सीमकार्डवरून ग्राहकाकडे असलेल्या लँडलाईन फोनवर अमर्यादीत कॉल्स मोफत केले जाऊ शकतात. ही यातील एकमेव जमेची बाजू आहे.


मीही सदरचे मोफत सिमकार्ड आणले आहे. परंतु त्याचा वापर करताना बीएसएनएलच्या वाईट सेवेचा अनुभव घ्यावा लागत आहे.उदा.१) या वरून कोणताही कॉल एकदा डायल करून लागत नाही. त्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतात.२) काही वेळेस कॉल लागताच पलीकडील बाजूने उचलल्यावर कट होतात.३) या सिमकार्डच्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केल्यास "इस मार्ग की सभी लाईन्स व्यस्त है, आपण डायल केलेला नंबर तपासून पहा, आप जिस नंबरसे संपर्क करना चाहते है वह अभी व्यस्त है, असे संदेश ऐकावयास मिळतात. इतकेच नाही तर "आपण डायल केलेला क्रमांक कदाचीत चुकीचा आहे, अस्तित्वात नाही, तपासून पहा" हे ऐकवून बीएसएनएल आपल्या 'विनोदी' वृत्तीचे देखील दर्शन घडविते.

यावरून बीएसएनएलने एक जीबी इंटरनेट व दोन हजार एसएमएस फ्री देऊ केले आहेत. परंतु त्यासाठी किती कालमर्यादा आहे, त्याचा वापर किती झाला आहे व इंटरनेट. एसएमएसचा बॅलन्स किती शिल्लक आहे हे कसे तपासून पहायचे याबद्दल माहिती उपलब्ध नाही. व सर्वात कळस म्हणजे या सिमवर 'कस्टमर केअर' ही सेवाच उपलब्ध करून दिलेली नाही. तसा संदेश देखील आपणांस ऐकायला मिळतो.

आता प्रश्न असा आहे की, खाजगी कंपन्यांच्या स्पर्धेच्या युगात बीएसएनएल अशा प्रकारची सेवा देऊन आपले हसू करून घेत आहे का? आणि बीएसएनएल आपल्या सेवेत सुधारणा करेल असे आपणांस वाटते का?

महत्त्वाचे : याच पानावरील पोल मध्ये आपले मत अवश्य नोंदवा.

0 Comments:

Post a Comment