आता खेळू खेळ नवा | आगळं! वेगळं !!!

आता खेळू खेळ नवा

कोंडी कायम संसद ठप्प
विरोधक जेपीसीवर ठाम
दगडालाही फुटेल पाझर
आम्हाला नाही फुटत घाम


जाऊ द्यात वाया कितीही
आठवडे अन् दिवस
करा कितीही विनंत्या
आणि बोला कुणालाही नवस

आता खेळू खेळ नवा
आमचा राजा तुमचा येडीयुरप्पा
खुळी प्रजा मारेल गप्पा
मग पुढच्या घोटाळ्यांना
पुन्हा मार्ग होईल सोप्पा

0 Comments:

Post a Comment