लै महाग हाय | आगळं! वेगळं !!!

लै महाग हाय

ग्रामीण भागातील ग्राहकांची, विशेषतः महिलांची खरेदीबाबतची मानसिकता कशी असते ते स्पष्ट करणारा हा एक प्रत्यक्ष घडलेला खराखुरा किस्सा. भावात घासघीस करण्यासाठी बोलण्याची त्यांची पद्धत, भाव कमी करून घेण्यासाठी आपण किती चतुरपणे बोलून ती वस्तू स्वस्तात पदरात पाडून घेतो याचा त्यांना असलेला अभिमान, आणि ते सर्व इतरांना दाखविण्याचा अट्टाहास यातून घडलेला हा प्रसंग पहा.

एका तयार कपड्यांच्या दुकानात एक ग्रामीण भागातील जोडपे खरेदीसाठी आले होते. त्यांना हवे असलेले ड्रेस सेल्समन दाखवीत होता, त्यातील एक ड्रेस त्यांना पसंत पडला. त्या ड्रेसची किंमत नवऱ्याने विचारली. सेल्समन अजून किंमत सांगण्यासाठी त्या ड्रेसवरील लेबल पहात होता, तोच बायको म्हणाली, "लै महाग हाय" नवरा, सेल्समन, मालक आणि दुकानातील इतर ग्राहक गारच!
सेल्समन : "अहो ताई, पण मी अजून तुम्हाला किंमत सुद्धा सांगितली नाही की?"
नवरा : "आगं, पार तेन्ला आदी किंमत तर सांगू दे की, का उगं त्यज्या आदीच भाव लै हाय म्हन्तीस का?"
बायको : "हूं, तुमी गप बसा वो, तुमाला काय बी कळत न्हाय. भाव कमी करायचा म्हनल्यावर तसंच म्हनावं लागतय. आन आदी म्हन्लं म्हनून काय बिगडलं वो?, भाव सांगितल्यावर तर म्हणायचंच असतंय की?"

0 Comments:

Post a Comment