November 2010 | आगळं! वेगळं !!!

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) साठी ऑफर्स पे ऑफर्स

अखेर रोहटक, हरियाणा येथून मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी योजनेला सुरुवात झाली. आणि त्याच बरोबर मोबाईल कंपन्याही ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठीच्या युद्धाची सुरुवात फ्री कनेक्शन, फ्री जीपीआरएस देऊ करून बीएसएनएलने केली. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना ऑफर देणारी बीएसएनएल ही पहिली कंपनी ठरली आहे.

जे ग्राहक बीएसएनएलकडे येतील त्यांच्याकडून पोर्ट इन चार्जेस घेतले जाणार नाहीत, बीएसएनएलच्या रोहटक येथील कस्टमर सर्विस सेंटर मधून जे ग्राहक या योजनेत येतील त्यांना फर्स्ट रिचार्ज कुपनसुद्धा फ्री दिले जाणार आहे. अ‍ॅक्टीव्हेशनच्या वेळी या ग्राहकांना शंभर रुपयांचा अतिरिक्त टॉकटाईमही दिला जाणार आहे. इतकेच नाही तर यासोबतच एक महिनाभर अनलिमीटेड जीपीआरएससुद्धा बीएसएनएलने ऑफर केले आहे.

या ऑफर्स पे ऑफर्स खाजगी क्षेत्रातील कंपन्या कशा मागे रहातील? आता या युद्धात टाटा डोकोमो ही कंपनी देखील उतरली आहे. त्यांनी आपल्याकडे स्विच होणाऱ्या ग्राहकासाठी लोकल ऑन नेट कॉल्सचा दर १ पैसा /६ सेकंदासाठी आणि दरमहा १०० एमबी डाटा ६ महिने देऊ केला आहे. त्याचसोबत फुल टॉकटाईमपेक्षा अधिक म्हणजे २०० च्या रिचार्जवर २२०, ३०० च्या रिचार्जवर ३५०, व  ४०० च्या रिचार्जवर ५०० कोअर टॉकटाईम बेनिफिट जाहीर केला आहे. याचबरोबर थ्रीजी सेवेबाबतही काही ऑफर देऊ केली आहे. या सर्व ऑफर्स ३१ डिसेम्बर २०१०पर्यंत टाटा डोकोमो कडे स्विच होणाऱ्या ग्राहकांना देऊ करण्यात आल्या आहेत.

एकूणच मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी बाबत मोबाईल कंपन्यांचे ऑफर्स पे ऑफर्स युद्ध सुरु झाले आहे.व यात आणखीन इतर कंपन्या उतरल्यानंतर तर ते अधिकच घमासान होईल असे म्हणायला काही हरकत नाही.

सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? भाग-२

या आधीच्या सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? भाग-१ या लेखात आपण सुरक्षित व अभेद्य पासवर्ड तयार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पहिले. आता आपला पासवर्ड सहजपणे लक्षात रहाणारा कसा करता येईल, त्यासाठी कोणती युक्ती वापरायची ते पाहू.

समजा आता ahgo=>&do!tU's1f हा तुमचा सिक्युअर्ड पासवर्ड आहे, तर पहा बरे तुम्हाला तो लक्षात ठेवणे शक्य आहे का? नाही ना? तो तसा कितीही घोकला तरी लक्षात ठेवणे कठीणच आहे. पण तो तयार कसा केला आहे हे पाहिल्यास, मात्र लक्षात ठेवणे तुम्हाल सहज शक्य आहे ते पुढील उदाहरणावरुन स्पष्ट होईल.

यासाठी सर्वप्रथम सहज लक्षात रहाणारे एक वाक्य आपण येथे घेतले आहे, ज्याचा पासवर्ड तुम्ही वर पहिला आहे आणि जो लक्षात ठेवणे तुम्हाला कठीण वाटले आहे.

आता खालील वाक्याचे उदाहरण पहा.
Go ahead and do it yourself.
या वाक्यातील काही अक्षरे निवडून खालीलप्रमाणे शॉर्टफॉर्म केला आहे.
go ahead & do it slf
त्याचा पुन्हा खालीलप्रमाणे शॉर्टफॉर्म केला आहे.
go=>&do!tU's1f
यात ahead करिता => स्पेशल कॅरॅक्टर वापरले आहे. and साठी & हे स्पेशल कॅरॅक्टर वापरले आहे. i उलटे केल्यास ! सारखेच दिसते म्हणून i करिता ! हे स्पेशल कॅरॅक्टर वापरले आहे. एल l हे साधरणतः 1 सारखे दिसते त्यामुळे l ऐवजी 1 चा वापर केला आहे. yorself चा शॉर्टफॉर्म U's1f असा केला आहे.आता हा पासवर्ड yahoo साठी असल्याने सुरुवतीला ah वापरले आहे. ते कुठेही म्हणजे सुरुवतीला, मध्ये किंवा शेवटी वापरता येईल. याचप्रमाणे तुम्ही google साठी OO तर Microsoft साठी cr असे शॉर्टफॉर्मही वापरू शकता. फायनली हा पासवर्ड असा दिसेल.

ahgo=>&do!tU's1f

आणि बघता बघता हा झाला तयार तुमचा सुरक्षित व अभेद्य परंतु सहज लक्षात रहाणारा पासवर्ड, कारण तुम्ही Go ahead and do it yourself हे वाक्य लक्षात ठेवले की पटकन तुम्हाला तुमचा पासवर्ड नक्कीच आठवेल.

या प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीची एखाद्या कवितेची किंवा फिल्मी गाण्याची एखादी ओळसुध्दा यासाठी घेऊ शकता व तुमची कल्पना शक्ती वापरून त्याच्या शॉर्टफॉर्म मध्ये वेगवेगळे अंक व स्पेशल कॅरॅक्टर्स वापरू शकता.

म्हणजेच आता सुरक्षित आणि अभेद्य पण सहज लक्षात रहाणारा पासवर्ड तयार करणे सोपे तर आहेच पण मनोरंजकही तितकेच आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच.

सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? भाग - १

आजकाल प्रत्येक कॉम्पुटर वापरणार्‍या व्यक्तीला सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? असा जटील प्रश्न नेहमी पडत असतो. तसं ते काही कठीण काम नाही, पण असा पासवर्ड बनविण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी मात्र अवश्य घेतली पाहिजे.

पहिली गोष्ट म्हणजे पासवर्डसाठी तुमचा फोन नंबर मोबाईल नंबर, तुमच्या बँक अकाऊंटचा नंबर, तुमची अथवा कुटुंबातील कुणाचीही जन्मतारीख, घर नंबर, तुमच्या मुलामुलींची नावे, तुमचे टोपण नाव इत्यादींचा वापर चुकूनही करु नका, जेणेकरुन तुमच्या परिचितांना तुमच्या पासवर्डचा अंदाज येऊ शकेल. या सर्वांचा वापर कटाक्षाने टाळायलाच हवा.

दुसरी गोष्ट पासवर्ड अधिक सुरक्षित व अभेद्य करण्यासाठी तो क्लिष्ट बनविणे आवश्यक आहे. तो क्लिष्ट बनविण्यासाठी केवळ अक्षरांचाच न बनविता त्यात काही अंक व स्पेशल कॅराक्टर्सचा वापर करायलाच पाहिजे. तसेच त्याची लांबी किमान आठ कॅरॅक्टर्स इतकी तरी असावीच.

अशा काही गोष्टींची दक्षता घेतल्यास असा पासवर्ड बनविणे सोपे आहे पण तो लक्षात ठेवणे कठीण आहे. तेव्हा यापुढील लेखात आपण सुरक्षित व अभेद्य परंतु 'सहज लक्षात रहाणारा' पासवर्ड कसा तयार करायचा ते पाहू.

मोबाईल ग्राहकात फसवणूकीची भावना

मोबाईल कंपन्यांनी सुमारे पाच वर्षापूर्वी ९९५ रुपयांत लाईफटाईम योजना जाहीर केली तेव्हा दरमहा रिचार्ज करायला कंटाळलेल्या अथवा दरमहा तितका वापर नसल्याने जबरदस्तीने रिचार्ज करून आपला बॅलन्स अधिकच फुगवायला नाऊत्सुक असलेल्या असंख्य ग्राहकांनी त्यावेळी अक्षरशः हजार हजार रुपयांनी आपले खिसे खाली केले आणि या मोबाईल कंपन्यांच्या तिजोऱ्या भरल्या.

त्यावेळी मोबाईल कंपन्यांनी भविष्यातील प्रत्येक रिचार्जवर फुल टॉकटाईम देण्याचे आश्वासन दिले होते. पण या मोबाईल कंपन्या ते आश्वासन सोयीस्करपणे विसरून गेल्या आहेत.आज तर या मोबाईल कंपन्या ग्राहक आपल्याकडे खेचण्यासाठी सिमकार्ड चक्क फुकट वाटत आहेत. तसेच नविन ग्राहकांना अधिक आकर्षक योजना देऊ करत आहेत.

हे सर्व संतापजनक आहे. हजारो रुपयांना नागवल्या गेलेल्या ग्राहकांना सापत्न भावनेने वागणूक दिली जात आहे. फुकटात ग्राहक झालेल्यांना अधिक लाभ आणि जुन्या ग्राहकांना त्यांच्यापेक्षा काहीच वेगळा फायदा नाही.यामुळे अशा पूर्वीच्या मोबाईल ग्राहकात या मोबाईल कंपन्याविषयी फसवणूकीची भावना निर्माण झाली आहे. आपण मूर्खात निघाल्याची खंत त्यांच्या मनात कुठेतरी आहे. पण या मोबाईल कंपन्या केवळ अशा ग्राहकांच्या असंघटितपणाचा फायदा उचलत आहेत, व त्यांची मनमानी करत आहेत.

अशा जुन्या ग्राहकात वाढीस लागलेली ही भावना संपवायची असेल तर या कंपन्यांनी त्या ग्राहकांना पूर्वी कबूल केल्याप्रमाणे सर्व रिचार्जवर फुल टॉकटाईम तसेच दरमहा अधिक काही आकर्षक सवलतींचा फायदा देणे गरजेचे आहे.असंघटित ग्राहकांनीही संघटीतपणे आपल्या हक्काच्या मागण्या लावून धरणे ही काळाची गरज आहे.

चार सिमचा मोबाईल फोन 4 SIM Mobile

आत्तापर्यंत तुम्ही एक, दोन व जास्तीतजास्त तीन सिमकार्डचे मोबाईल फोन पहिले असतील.पण आता ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल असा चार सीमचा एक मोबाईल फोन आता मार्केटमध्ये आला आहे. GFive या चायनाच्या कंपनीने GF 90 4 SIM नावाने हा मोबाईल मार्केटमध्ये उतरवला आहे. हा केवळ चार सिमचा मोबाईल नसून त्यात उत्तम मल्टीमिडीया फिचर्सही समाविष्ट केलेली आहेत.

यात तुम्ही एकाचवेळी चार सिमकार्ड घालू शकता. आणि त्यापैकी दोन सिमकार्डच्या (स्टँडबाय एकावेळी दोन सिमकार्ड) सहाय्याने आपण बिजनेस व फॅमिली यांच्या संपर्कात राहू शकता.

आता याच्या वैशिष्ट्याकडे एक नजर टाकूया. हा कॅन्डीबार फोन आहे, ड‍युएल सीम स्टँडबाय, ड‍युएल कॅमेरा, एफएम रेडिओ, ब्लूटूथ, म्युझिक/व्हिडिओ प्लेयर, टॉर्च ही याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

याला २.२ इंचाचा टीएफटी एलसीडी कलर डिस्प्ले आहे. यात प्रत्येकी 300K pixels पिक्सेलचे दोन कॅमेरे (पुढे व मागे) देण्यात आले आहेत. याच्या डीजीटल झूमच्या सहाय्याने तुम्ही 30fpsने व्हिडीओसुद्धा कॅप्चर करू शकता. तुमच्या पीसी सोबत जोडण्यासाठी याला हायस्पीड २.० युएसबीची सुविधा आहे. वायरलेस ट्रान्सफरसाठी इतर ब्लूटूथ डिव्हायसेस सोबत स्टिरीओ साऊंड प्लेबॅक करण्यासाठी ब्लूटूथ २.० A2DP सह दिलेला आहे. हा फोन चार जीबी मेमरी कार्डला (माइक्रो एसडी) सपोर्ट करतो. WAPद्वारे तुम्ही याच्यातील इनबिल्ट ब्राऊजरच्या सहाय्याने इंटरनेट अ‍ॅक्सेस करू शकता. या फोनच्या पॅकिंगमध्ये हँडसेट, बॅटरी, चार्जर, इयरफोन, युएसबी केबल, युजर मॅनुअल व मिनी साऊंड बॉक्स समाविष्ट आहे.

याशिवाय यात Alarm, Calendar, Calculator, To Do list, Notepad, Timer, Stopwatch, TXT format reading. Clock, call time reminder, vibration, user profiles, hands-free, animation screensaver, contacts with image and ringtones, flight mode यासारखी फिचर्सही आहेतच.

GFive GF90 मोबाईल फोनची Specification याप्रमाणे:

    * 2.2 inches TFT LCD Colors display
    * Dimensions 114.1×49.5×14 MM
    * Camera resolution of 640 x 480 Pixels with Video capture with audio at 30fps
    * Supports MP4, 3GP, AVI Video Formats
    * Polyphonic, MP3 ring tone and FM Radio
    * Includes Li-ion 1200 mAh battery
    * Talk time up to 294 minutes
    * Provides stand by time up to 336 hours
    * WAP Browser, GPRS, Bluetooth v2.0
    * Up to 4 GB external memory support
    * Wireless high-speed data transmission
    * Wireless Bluetooth stereo sound
    * USB 2.0 high speed transmission
    * MP3, AAC, WMA music formats with 2.5mm Audio Jack
    * 300K Pixels dual camera on front and back with digital zoom.
    * Colours: Black with Red
    * Special Features: Quad SIM

ब्लॅक आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनमधील हा फोन मार्केटमध्ये २८५० रुपयांत उपलब्ध आहे.

'मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी' (Mobile Number Portability)

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी' उर्फ (Mobile Number Portability)आता लवकरच येत आहे. त्याच्या प्रसूतीकळा काही कंपन्यांना यायला ही लागल्या आहेत. तेव्हा याचा जन्म झाल्याची वार्ता (हायटेक भाषेत 'फ्लॅश न्यूज, ब्रेकिंग न्यूज' म्हणा हवं तर) कधीही येऊ शकते.

तुम्ही म्हणाल की यात एवढे प्रतीक्षा करण्यासारखे काय आहे? अर्थात त्याला कारणेही तशीच आहेत. मोबाईल हा आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे यात शंकाच नाही.

आपण पहिला मोबाईल हँडसेट घेतो तेव्हाच आपल्या आवडीचा एक 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर' निवडतो. काही दिवस जातात तसे नव्या नवलाईचे दिवसही संपतात. मग आत्ताच घेतलेला हँडसेटही जुना वाटायला लागतो. मग दुसरा एक नविन हँडसेट, पुन्हा त्याचे कौतुक.

तसे पहिले तर हीच गोष्ट 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर'च्या बाबतीतही लागू होते. पण फरक इतकाच की हँडसेटप्रमाणे 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर' मात्र लगेच बदलणे कठीण होते. हँडसेटप्रमाणेच काही दिवसात आपण वापरत असलेल्या कंपनीच्या सेवेतील गुणदोष आपल्या लक्षात यायला लागतात.

इकडे तर मार्केटमध्ये नविन ग्राहक गळाला लावण्याची सर्व कंपन्यांची स्पर्धा सुरूच असते. त्यासाठी नविन आकर्षक योजनांच्या जाहिरातींचा भडीमार सतत सुरु असतो. आपण आधीच आपल्या कंपनीच्या सेवेबाबत काही बाबतीत नाराज असतोच. मग आपण इतर कंपनीच्या जाहिरातीशी आपल्या कंपनीची नकळत तुलना करायला लागतो.

उदाहरणार्थ, अमुक एक कंपनी एक पैसा बिलिंगसाठी अमुक इतकाच चार्ज करते, डोकोमो कंपनी तर कोणताही चार्ज न लावताच एक पैसा सेकंदाचे बिलिंग करते, आणि साला आपली आयडीया कंपनी तर एक पैसा बिलिंगसाठी चार्ज आकारून फक्त स्वतःच्याच नेटवर्कसाठी एक पैसा बिलिंग आणि इतर नेटवर्कसाठी १.२ पैसा बिलिंग करते. तसेच डोकोमो इंटरनेट सेवेकरिता एक महिन्यासाठी पंच्याण्णव रुपये आकारून सहा जीबी डाऊनलोडची सुविधा देते, आणि त्यापुढील प्रत्येक एमबी वापरासाठी पन्नास पैसे इतका चार्ज आकारते, तर आपण वापरत असलेली आयडियाची इंटरनेट सेवा दरमहा अठ्ठ्याण्णव रुपयांत फक्त दोन जीबी, त्यातही रोजच्या वापरावर सत्तर एमबीचे बंधन व त्यापुढील प्रत्येक एमबी वापरासाठी पाच रुपये कापून आपल्या बॅलन्सचा मुडदाच पाडते. शिवाय डोकोमोप्रमाणे इंटरनेटसह इतर सर्व प्रकारचा बॅलन्स केवळ एका एसएमएसद्वारे तपासण्याची आपल्या आयडीयात सोय नाही.

छे वैतागलो बुवा या आयडीयाला. अशाप्रकारे आपण मनाशी चरफडत असता. पण आपला नाईलाज असतो. इतर कंपन्यांच्या काही सेवा कितीही आकर्षक वाटल्या तरी, किती सिमकार्ड गोळा करणार? किती हँडसेट जवळ बाळगणार? बरं, 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर' बदलायचा म्हटलं तर सध्याचा मोबाईल क्रमांक बदलणार त्यामुळे पुन्हा पंचाईत. अशा प्रकारे आपण अडचणीत येत असतो.

काही जण मागचा पुढचा विचार न करता पहिले सिमकार्ड टाकून देतात आणि सरळ दुसरा 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर' निवडतात, आणि हव्या असलेल्या सेवेचा आनंद घेतात, पण बहुतेकांची मात्र क्रमांक बदलू नये म्हणून 'अपरिहार्यता' असते. त्यामुळे ते मनापासून इच्छा असूनही 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर' बदलू शकत नाहीत.

पण आता 'मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी'मुळे ते शक्य झाले आहे. आपला सध्याचा असलेला क्रमांक कायम ठेवून आपणांस पाहिजे असलेला मनपसंत 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर' आता आपण निवडू शकता.

आणि यामुळेच सर्वत्र याची चर्चा आहे आणि प्रतीक्षाही. आणि आता ती वेळही जवळ आली आहे. तेव्हा बहुतेक तुम्हीही याचा लाभ घेण्याच्या विचारात असालच, आणि तुमचा नविन 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर' ही तुम्ही आधीच चॉइस करून ठेवला असेलच. तर आता आपण  कोणत्या 'मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर'ला प्राधान्य देणार आहात ते पाहायचे आहे.

 लेटेस्ट अपडेट वाचा : देशभरात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सुरु

बीएसएनएलची 'प्यारी जोडी' स्कीम

नुकतीच बीएसएनएलची 'प्यारी जोडी' ही स्कीम आली आहे. याअंतर्गत लँडलाईन असणर्‍या ग्राहकांना एक प्रीपेड किंवा पोस्टपेड सिमकार्ड मोफत दिले जात आहे. या सीमकार्डवरून ग्राहकाकडे असलेल्या लँडलाईन फोनवर अमर्यादीत कॉल्स मोफत केले जाऊ शकतात. ही यातील एकमेव जमेची बाजू आहे.

आता खेळू खेळ नवा

कोंडी कायम संसद ठप्प
विरोधक जेपीसीवर ठाम
दगडालाही फुटेल पाझर
आम्हाला नाही फुटत घाम

रंग गेला तर पैसे परत

ग्राहक : या ड्रेसची किंमत किती आहे?
दुकानदार : दीडशे रुपये फक्त ताई.
ग्राहक : पण याच्या रंगाची गॅरंटी आहे का? याचा रंग जाणार का?

धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय

=> अखेर पंतप्रधानांनी 'मौन' सोडले : दोषींवर कारवाई करणार
  • 'एऽऽ राजा' 'तेरी भी चूप मेरी भी चूप' असं म्हणण्यामुळेच ही वेळ आली, आता धरलं

नविन मंत्र्यांच्या खास प्रतिक्रिया

नविन मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं आणि काही मंत्र्यांच्या खाजगी प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या त्या अशा :

अजितदादा पवार : "आमच्या सर्व मंत्र्यांना 'उर्जा' देणं हे मी माझं कर्तव्य मानतो. माझ्या म्हणण्याचा 'अर्थ' तुम्हाला कळला असेलच."

'बाबा' गाडी

'संधी' साधूंना मिळाली
'बाबा' गाडीत जागा
तर लाल दिव्याची गाडी
हुकली म्हणून कुणाचा त्रागा

नव्या बाटलीत 'जुनी' दारू

इतराकडे बोट दाखवून
घोळ घालण्याची परंपरा
कायम टिकवायची असते.
सस्पेन्सच्या नावाखाली

'लेट नाईट शो'

=> मंत्रीमंडळ विस्तार आजही नाहीच? सोनीया गांधीशी चर्चेनंतरही मंत्र्यांची नावे निश्चित नाहीत.
  • कोणत्याही जाहीर केलेल्या कार्यक्रमाची वेळ पाळायचीच नाही, हेच तर आमचे खास वैशिष्ट्य आहे.

बावळटच आहेस

मॅडम : तुमच्या पसंतीसाठी जर एकीकडे डोकं ठेवलं  आणि दुसरीकडे  पैसा तर तुम्ही काय पसंत कराल?

'इडियट बॉक्स'

'मुर्खा' सारखे तासनतास
टीव्ही समोर
बसणारे लोक

हाडांचे शिक्षक

"हाडांचे शिक्षक"
विद्यार्थ्यांना

चाळीस लाखाची सदनिका

हे देवा तूच आमचा त्राता
माझी पुंजी आहे चार लाख
मिळवून दे एक तरी
सदनिका मला मुंबईत आता

राष्ट्रवादीची कसरत

=> मंत्रीपदे देताना राष्ट्रवादीची कसरत
  • आधीच तर 'गृहकलह' संपविता संपविता नाकेनऊ आलेत.

क्षेपणास्त्र 'पृथ्वी'

सोडले आहे क्षेपणास्त्र
'पृथ्वी' दिल्लीतून थेट
पहायचे आहे आता
भ्रष्टाचाराचा करील का भेद

याचसाठी केला होता अट्टाहास

मिळाली असती संधी
तर करायचे होते सोने
राणे गात आहेत
नाराज होऊन गाणे

आले 'गॉडमदरच्या' मना

आले 'गॉडमदरच्या' मना,
केंद्रातून 'चव्हाणांचे' 'पार्सल' केले रवाना,
आमदारांची मते जाणून घेण्याची नाटके,

लै महाग हाय

ग्रामीण भागातील ग्राहकांची, विशेषतः महिलांची खरेदीबाबतची मानसिकता कशी असते ते स्पष्ट करणारा हा एक प्रत्यक्ष घडलेला खराखुरा किस्सा. भावात घासघीस करण्यासाठी बोलण्याची त्यांची पद्धत, भाव कमी करून घेण्यासाठी आपण किती चतुरपणे बोलून ती वस्तू स्वस्तात पदरात पाडून घेतो याचा त्यांना असलेला अभिमान, आणि ते सर्व इतरांना दाखविण्याचा अट्टाहास यातून घडलेला हा प्रसंग पहा.

तल्लफ

दुकानदार : तुम्ही कृपया माझ्यासमोर सिगारेट ओढू नका.

लोणकढी थाप

"एने, साला जे थापाड्या लै च्यान्गली थाप मारेल तेला मी आज रोक शंबर रुपये बक्षीस देईल." घेलाशेठच्या या घोषणेवर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि का नाही होणार हो? घेलासेठ आधीच कंजूष मक्खीचूस माणूस, स्वतःच्या कापल्या करंगुळीवर मुततानाही तीनदा विचार करणारा, त्यात त्याने भर सभागृहात शंभर रुपये देण्याचं कबूल केल्याने लोकही आश्चर्यचकित झाले.
घेलासेठ एका संस्थेने आयोजित केलेल्या 'लोणकढी थाप' स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली, एकेक स्पर्धक स्टेजवर येऊन आपापल्या एकापेक्षा एक सरस 'थापा' सादर करू लागले. शेवटी टाळ्यांच्या कडकडाटात स्पर्धेचा शेवट झाला. सुत्रसंचालकाने परीक्षकांचा निर्णय जाहीर केला तो असा,सर्वोत्कृष्ट "लोणकढी थापबहाद्दर" म्हणून सर्व परीक्षकांनी एकमताने घेलाशेठ यांची निवड केली आहे."

पंचाईतच आहे!

आपले दात बघून,
दात विचकणाऱ्या

आतल्या वर्तुळातून

"साहेब हा आमच्या पक्ष कार्यालयाच्या आत बाहेर संशयास्पदरित्या फिरताना आढळला म्हणून तुमच्याकडे आणलाय याला." दोन कार्यकर्ते एका भेदरलेल्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आले होते.
इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला अपादमस्तक न्याहाळले, आणि तो एक निरुपद्रवी सामान्य माणूस आहे, हे त्यांनी ताडले.
इन्स्पेक्टर : "काय रे, का फिरत होतास तू यांच्या कार्यालयात?"
सामान्य माणूस : "काही नाही साहेब, मी केवळ कुतूहलापोटी तेथे गेलो होतो."
इन्स्पेक्टर : "असं, कसलं कुतूहल?"
सामान्य माणूस : "साहेब, मी सामान्य माणूस आहे, दररोज पेपर वाचतो, त्यातील बातम्यात नेहमी उल्लेख केले जाणारे,'राजकीय वर्तुळ, आतले वर्तुळ, अधिकृत सूत्र, आतला गोट याच्याबद्दल मला कुतूहल आहे."
इन्स्पेक्टर :"बर मग काय करत होतास तू तिथे?"
सामान्य माणूस : "साहेब, मला पहायचं होतं की, हे राजकीय वर्तुळ कुठे आखलेलं असतं? त्याच्या आतील भागात असलेल्या त्या आतल्या वर्तुळातून बाहेरचं जग कसं दिसतं? अधिकृत सूत्र म्हणजे लहान दोरा असतो की मोठी दोरी? आणि आतला गोट म्हणजे कसा असतो? जाडजूड का कसा? कारण मला शिंपी लोक कपड्यांना गोट लावतात तेवढाच माहित आहे."
यावर इन्स्पेक्टर साहेब व त्या दोन कार्यकर्त्यांनी कपाळावर हात मारून घेतला नसता तरच नवल!