Extra Charge | आगळं! वेगळं !!!

Extra Charge

घेलाशेठ राजूच्या सलूनमध्ये केस कापून घेण्यासाठी गेले. तेव्हा राजू म्हणाला,"शेठ,  केस कापण्याचे तीस रुपये पडतील."

"अरे व्वा! राजू काय सध्या scheme चालू आहे वाटतं? तीस रुपयांत दाढी आणि कटींगसुद्धा?" "नाही शेठ, मी फक्त केस कापण्याचे तीस रुपये म्हणालो." राजू म्हणाला.


घेलाशेठ आधीच कंजूष मख्खीचूस माणूस. तो तणतण करायला लागला. "अरे, काय राजू मागच्या वेळी म्हणजेचं चार तर महिन्यापूर्वी वीस रुपयात केस कापले होते आणि आता तीस कसे?" त्यावर राजू म्हणाला, "हे बघा शेठ, आमच्या असोसिएशनचं दरपत्रक वाचा."

घेलाशेठने दरपत्रक वाचले, "अरे राजू, हे बघ यात तर केस कापण्याचे पंचेवीस रुपयेच दर आहे, आणि तू मला तीस कसे मागतो? उलट माझे केस आता पहिल्यापेक्षा भलतेच कमी झाले आहेत, त्यासाठी तर तू अजून कन्सेशन  द्यायला पाहिजे, ते सोडून तू मला पाच रुपये जास्त मागतोय."

त्यावर राजू म्हणाला, "शेठ, तुमचे केस कमी झालेत म्हणूनच पाच रुपये Extra Charge घेतोय, काय आहे शेठ, शोधून शोधून केस कापण्यासाठी जास्त वेळ लागतो ना म्हणून!"

घेलाशेठचा Dentist कडील किस्सा अवश्य वाचा.

0 Comments:

Post a Comment