कॉम्पुटर लँग्वेज | आगळं! वेगळं !!!

कॉम्पुटर लँग्वेज

केशव दहावी नापास असलेला तरूण. एका कॉम्पुटर इन्स्टीट्यूटमध्ये नोकरीस लागला होता. आपल्याला कॉम्पुटरमधील बरेच समजते असे दाखविण्याची त्याची नेहमीच धडपड असे. त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता तो इन्स्टीट्यूटची चावी आणायला देशपांडे सरांच्या घरी सकाळी गेला,
पाहतो तो सर बाहेर जाण्याच्या गडबडीत बाहेर आलेले दिसले. केशवला पाहताच सर म्हणाले, "अरे केशव, बरे झाले तू आलास. हे बघ, आज आणि उद्या इन्स्टीट्यूटला सुट्टी आहे." त्यावर केशव आश्चर्याने म्हणाला, "सुट्टी कशामुळे सर?"

देशपांडे सर म्हणाले. "अरे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत ना, त्यांच्या वडिलांचे आज निधन झाले आहे, आता तू इन्स्टीट्यूटवर जा आणि नोटीस बोर्डवर याबद्दलची सूचना लिहून लगेच अध्यक्षांच्या घरी ये, मी ही तिकडेच निघालोय."

तसा केशव लगोलग इन्स्टीट्यूटकडे गेला, आणि आपले कॉम्पुटरचे ज्ञान दाखविण्याची संधी त्याने बिलकुल दडविली नाही. त्याने नोटीस बोर्डवर लिहलेली सुचना अशी :

"कळविण्यास अत्यंत दु:ख होते की, आपल्या संस्थेच्या अध्यक्षांचे वडील आज सकाळी 'पर्मनंट डिलीट' झाले आहेत.त्यामुळे इन्स्टीट्यूट आज व उद्या 'शट डाऊन' राहील, व परवा दिवशीपासून पुन्हा 'रिबूट' होईल याची सर्वानी नोंद घ्यावी."

0 Comments:

Post a Comment