राशिभविष्य | आगळं! वेगळं !!!

राशिभविष्य

मागे एकदा संपादकांनी आम्हाला राशिभविष्य लिहायला सांगितले. आता हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने आम्ही कन्या राशीला लिहिले होते की 'सुखद घटना घडेल व दिवस आंनदात जाईल.'

तुम्हाला सांगतो त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही प्रेसच्या ऑफिसमधून घरी जात असताना, वाटेत आमचा एक कन्या राशीवाला परममित्र दिन्या भेटला.
चल चल म्हणून बळेच हॉटेलात घेऊन गेला, आणि मिसळ, भजे अन् चहा अशी ऑर्डर दिली. यालाच उम्मीदसे तीगना म्हणतात की काय? असे त्याला विचारावे वाटत असतानाच तो म्हणाला अरे यार काय परफेक्ट भविष्य लिहिलंयस तू? तसे आम्ही म्हणालो का रे काय झालं?

त्यावर भजे तोंडात कोंबत तो म्हणाला की, अरे तुझी वाहिनी माझ्याशी सकाळीच भांडण करून माहेरी निघून गेलीय. त्यावर आम्ही कपाळावर हात मारून घेतला आणि ठरवले की आता यापुढे राशिभविष्य लिहायचे नाही.

1 Comments: